Public Mirror News
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
Public Mirror News
No Result
View All Result

किशोरवयीन मुलींना या वयात मानसिक आणि भावनिक आधार आवश्यक : प्रकल्प अधिकारी डॉ. चंद्रकांत पवार

Mahesh Patil by Mahesh Patil
March 10, 2025
in राज्य
0
किशोरवयीन मुलींना या वयात मानसिक आणि भावनिक आधार आवश्यक : प्रकल्प अधिकारी डॉ. चंद्रकांत पवार

नंदुरबार l प्रतिनिधी

 

किशोरवयीन मुलींना या वयात मानसिक आणि भावनिक आधार आवश्यक आहे असे प्रतिपादन प्रकल्प अधिकारी डॉक्टर चंद्रकांत पवार यांनी केले.

 

 

 

मेट्रोपोलिस फाउंडेशन आणि भारतकेअर्स यांच्या संयुक्त विद्यमाने नंदुरबार जिल्ह्यात राबविण्यात येणाऱ्या ‘स्वास्थ्य सहेली’ उपक्रमांतर्गत ‘किशोरी मंच सन्मान व प्रेरणा समारंभ -एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प कार्यालय, नंदुरबार येथे पार पडला त्यावेळी ते बोलत होते. या विशेष सोहळ्यासाठी नंदुरबार जिल्ह्यातील 202 शाळांमधून 10 उत्कृष्ट किशोरी मंच गटांची निवड करण्यात आली.

 

 

यावेळी कार्यक्रमाला आदिवासी विकास विभागाचे प्रकल्प अधिकारी डॉ.चंद्रकांत पवार,सहायक प्रकल्प अधिकारी सायराबानो हिप्परगे, सहायक प्रकल्प अधिकारी नंदकुमार साबळे,कार्यालय अधीक्षक के. के. पाडवी, श्री. सोनार आदी उपस्थित होते.

यावेळी बोलताना श्री. पवार पुढे म्हणाले की,किशोरवयीन मुलींना या वयात मानसिक आणि भावनिक आधार खूप गरजेचा असतो. त्यांना समजून घेऊन त्यांच्या विकासासाठी सकारात्मक वातावरण तयार करणे ही सर्वांची जबाबदारी आहे असे सांगत किशोरी मंच उपक्रमाच्या योगदानाचे कौतुक केले आणि पुढील कार्यासाठी प्रेरणा दिली.

 

*किशोरी मंच गटांचा गौरव आणि शिक्षकांचा सन्मान*

समारंभात निवडलेल्या 10 किशोरी मंच गटांतील 21 प्रिय सखींचा सन्मान करण्यात आला. या किशोरींनी आरोग्य, शिक्षण आणि समाजकल्याण या विषयावरील उपक्रमांची प्रभावी अंमलबजावणी करत सातत्यपूर्ण सहभाग नोंदवला आहे. तसेच, या उपक्रमात महत्त्वाची भूमिका बजावणाऱ्या 12 शिक्षकांचाही विशेष सन्मान करण्यात आला.

यावेळी सह्याद्री किशोरी मंच – अनुदानित प्राथमिक व माध्यमिक आश्रमशाळा, कोळदा ता – नंदुरबार, शीतल विष्णू पाडवी, संध्या रघुनाथ जगताप, नम्रता रवींद्र पाडवी मार्गदर्शक शिक्षिका: भारती भामरे, लक्ष्मीबाई किशोरी मंच – शासकीय आश्रमशाळा, पानबारा ता.नवापूर

प्रिय सखी: सुरंजली मौल्या गावित, रोशनी अमृतसिंग गावित मार्गदर्शक शिक्षिका: चारुशीला रणदिवे, सरस्वती किशोरी मंच. अनुदानित प्राथमिक व माध्यमिक आश्रमशाळा, कोपर्ली ता – नंदुरबार पल्लवी विनायक पाडवी, वैशाली राम गांगुर्डे मार्गदर्शक शिक्षिका: संघमित्रा माहिरे, यमुना किशोरी मंच – पी. ए. सोडा सार्वजनिक मराठी हायस्कूल व ज्यु. कॉलेज, नवापूर, जयसेजल इसाक गावित, सोनम गुलाबसिंग कोकणी मार्गदर्शक पर्यवेक्षिका: मेघा पाटील,सत्यम किशोरी मंच – अनुदानित माध्यमिक आश्रम शाळा, भरडू (ता. नवापूर), एंजल बिसन गावित, प्रतीक्षा दासू गावित मार्गदर्शक: ज्योती विसावे, झेंडू किशोरी मंच – अनुदानित प्राथमिक आश्रम शाळा, सोनखांब (ता. नवापूर), प्रतीक्षा देसाई, हेतल गावित

मार्गदर्शक अधिक्षिका: रेखा खेडकर, ज्ञानगंगा किशोरी मंच – लाडकोरबाई प्राथमिक व माध्यमिक विद्यालय, शहादा, जान्हवी अविनाश कुलकर्णी, खुशी जितेंद्र अहिरे मार्गदर्शक मुख्याध्यापिका: सुनंदा अरुण तांबोळी, राणी लक्ष्मीबाई किशोरी मंच – माध्यमिक विद्यालय, विद्याविहार, शहादा

प्रिय सखी: अंजली शांतिलाल कोळी, अश्विनी रित्तम पावरा मार्गदर्शक शिक्षिका: सुनीता पटेल, बहिणाबाई किशोरी मंच – कै. बी. डी. पाटील माध्यमिक विद्यालय, शिरूड दिगर, शहादा

प्रिय सखी: सुष्मिता लक्ष्मण समुद्रे, स्वाती जगदीश निकुंभे मार्गदर्शक शिक्षिका: सरला पाटील, रचना किशोरी मंच – गुरूवर्य गोविंद श्रीपत पाटील माध्यमिक विद्यालय, पारिवर्धा, छाया गणेश मराठे, सोनम एकनाथ शेवाळे मार्गदर्शक शिक्षिका: भारती भट

 

 

कार्यक्रमाचे मान्यवर आणि त्यांचे मार्गदर्शन

या सोहळ्याला एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प कार्यालय, नंदुरबार येथील मान्यवर उपस्थित होते. त्यांनी किशोरी मंच उपक्रमाच्या योगदानाचे कौतुक केले आणि पुढील कार्यासाठी प्रेरणा दिली.

 

 

कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी विशेष मेहनत

या कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी ‘स्वास्थ्य सहेली’ टीममधील श्रद्धा दोषी, निकिता टेकाळे,राधा वाघमारे, जयश्री कोळी, भाग्यश्री सांजराय या सदस्यांनी प्रभावी समन्वय साधत आणि उत्कृष्ट नियोजन करत कार्यक्रमाची यशस्वी अंमलबजावणी केली.

बातमी शेअर करा
Previous Post

शहादा येथे 70 एकर जागेत पंडित प्रदीप मिश्रा यांची कथा, एक एप्रिल पासून श्री शिवमहापुराण कथेचे आयोजन,मंडपाचे झाले भूमिपूजन

Next Post

मुलांनो तुमचे आईबाप तुमचे खरे देव : प्रा. वसंत हंकारे

Next Post
मुलांनो तुमचे आईबाप तुमचे खरे देव :  प्रा. वसंत हंकारे

मुलांनो तुमचे आईबाप तुमचे खरे देव : प्रा. वसंत हंकारे

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

कोपर्ली येथील आर.सी .इंदानी विद्यालयात दहावीत अर्चना राऊळ प्रथम

कोपर्ली येथील आर.सी .इंदानी विद्यालयात दहावीत अर्चना राऊळ प्रथम

May 15, 2025
डेंग्यू आजाराला प्रतिबंध करण्यासाठी नागरीकांनी सहकार्य करावे

डेंग्यू आजाराला प्रतिबंध करण्यासाठी नागरीकांनी सहकार्य करावे

May 15, 2025
रमाई आवास योजनेअंतर्गत घरकुलासाठी प्रस्ताव सादर करावेत

रमाई आवास योजनेअंतर्गत घरकुलासाठी प्रस्ताव सादर करावेत

May 15, 2025
प्रकाशा येथील अल्पवयीन मुलीचा नियोजित बालविवाह थांबविण्यात जिल्हा प्रशासनाला यश

प्रकाशा येथील अल्पवयीन मुलीचा नियोजित बालविवाह थांबविण्यात जिल्हा प्रशासनाला यश

May 15, 2025
१५ मे रोजीचा जनसुरक्षा विधेयक विरोधी जनआक्रोश मोर्चा तुर्त स्थगित

१५ मे रोजीचा जनसुरक्षा विधेयक विरोधी जनआक्रोश मोर्चा तुर्त स्थगित

May 15, 2025
भालेर येथील शिवदर्शन विद्यालयात दहावीला आरती पाटील प्रथम

भालेर येथील शिवदर्शन विद्यालयात दहावीला आरती पाटील प्रथम

May 14, 2025

Total Views

  • 4,142,612 hits

मुख्य संपादक

श्री.महेश शांताराम पाटील
9404747458

At.post.Umarde Khurde ta.dist Nandurbar
मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458

  • Home
  • Sample Page

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

कॉपी करू नका.
WhatsApp Group