नंदुरबार l प्रतिनिधी
अक्कलकुवा येथील बीएसएनएल कार्यालयातून चोरट्याने बॅटऱ्यांसह लोखंडी पाईप असा सुमारे २२ हजाराचे साहित्य लंपास केले.
याबाबत पोलिस सूत्रांनी दिलेल्या माहितीनूसार, अक्कलकुवा येथे बीएसएनएल कार्यालय आहे. सदर कार्यालयाच्या जिन्याचे मागील भिंतीस असलेल्या सिमेंट जाळीला छिद्र पाडून चोरट्याने आत प्रवेश केला. कार्यालयात असलेल्या १८ हजार ४०० रुपये किंमतीच्या दोन जुन्या बॅटऱ्या व ३ हजार २०० रुपये किंमतीचे ८ लोखंडी पाईप असे एकूण २१ हजार ६०० रुपये किंमतीचे साहित्य चोरट्याने चोरुन नेले. याबाबत विकासकुमार दुर्गालाल महावर यांच्या फिर्यादीवरुन अक्कलकुवा पोलिस ठाण्यात अज्ञाताविरोधात भादंवि कलम ४५७, ३८० प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोहेकॉ.जाधव करीत आहेत.








