Public Mirror News
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
Public Mirror News
No Result
View All Result

चोरी गेलेल्या 13 मोटारसायकली हस्तगत,स्थानिक गुन्हे शाखेची कामगिरी

team by team
December 30, 2024
in क्राईम
0
चोरी गेलेल्या 13 मोटारसायकली हस्तगत,स्थानिक गुन्हे शाखेची कामगिरी

नंदुरबार l प्रतिनिधी-

चोरी गेलेल्या 13 मोटारसायकली हस्तगत करण्यात आल्या असून स्थानिक गुन्हे शाखेने कारवाई केली आहे.

.तळोदा पोलीस ठाणे हद्दीतील रहिवासी रविंद्र मधु ठाकरे यांची बजाज कंपनीची मोटर सायकल ही उमरी ता. तळोदा येथील फिर्यादीचे घरासमोरुन चोरी झालेबाबतची फिर्यादवरुन तळोदा पोलीस ठाण्यात आज्ञाताविरुद्ध भा.द.वि कलम 379 प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला होता,

त्याअनुषंगाने स्थानिक गुन्हे शाखेकडुन समांतर तपास सुरू असतांना स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक हेमंत पाटील यांना गुप्त बातमीदामार्फत बातमी मिळाली की, तळोदा शहरातील कॉलेज चौफुली परिसरात दोन इसम विना क्रमांकाचे दुचाकी मोटारसायकल विक्री करण्याचे उददेशाने फिरत आहेत, अशी खात्रीशीर माहिती मिळाल्यावरुन पोलीस अधीक्षक श्रवण दत्त. एस यांचे मार्गदर्शनाखाली स्था.गु.शा. पोलीस निरीक्षक हेमंत पाटील यांनी मिळालेल्या बातमीच्या अनुषंगाने पथकास खात्री करुन कारवाई करणेकामी सांगितले.

स्थानिक गुन्हे शाखेचे पथकाने मिळालेले बातमीनुसार तळोदा शहरातील कॉलेज परिसरात संशयित इसमांचा शोध घेतला असता ते विना क्रमांकाचे वाहनासह तळोदा चौफुली जवळ दिसुन आले. सदर इसमांना दुचाकीसह ताब्यात घेण्यात पोलीस पथकास यश मिळाले. ताब्यात घेण्यात आलेल्या इसमांना त्यांचे नाव गाव विचारता त्यांनी दिलवरसिंग ऊर्फ कुव-या अहमदभाई वसावा रा. करताल पोस्ट दाबान ता. डेडीयापाडा जि. नर्मदा गुजरात, शिवदास ऊर्फ भाया कुवरसिंग पाडवी रा.रोझवा, ता. तळोदा, जि. नंदुरबार असे सांगितले.

सदर इसमांना त्यांचे ताब्यात मिळून आलेल्या मोटार सायकलचे कागदपत्रांबाबत विचारपूस करता ते उडवाउडवीची उत्तरे देऊ लागले. त्यांना पुन्हा विश्वासात घेऊन अधिकची विचारपूस केली असता त्यांनी मोटारसायकली तळोदा व बडवाणी येथुन चोरी केले असल्याचे सांगितले. त्याबाबत पोलीस पथकाने संबंधित पोलीस ठाण्याकडुन माहिती घेऊन सदर वाहने चोरीचे असल्याबाबत खात्री केली. तसेच सदर इसमांकडे अजुन काही चोरीच्या मोटारसाकलींबाबत विश्वासात घेऊन विचारपुस करता त्यांनी मागील दोन ते तीन वर्षात नंदुरबार तसेच बाहेरील जिल्हयातुन काही मोटारसायकली चोरी केले असल्याची माहिती दिली.

सदर इसमांनी चोरी केलेल्या एकुण 5 लाख 70 रु. किमतीच्या 13 मोटारसायकली हस्तगत करण्यात स्थानिक गुन्हे शाखेला यश मिळाले आहे.

सदरची कामगिरी नंदुरबार जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक श्रवण दत्त. एस, अपर पोलीस अधीक्षक आशित कांबळे यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक हेमंत पाटील, पोउपनि मुकेश पवार, पोहेकॉ मुकेश तावडे, मनोज नाईक, सजन वाघ, पोना मोहन ढमढेरे, पोकों विजय ढीवरे, दिपक न्हावी यांनी केली आहे.

बातमी शेअर करा
Previous Post

नंदूरबार जिल्ह्यातील दोन महिला सरपंच गाव कारभारणींना संसदभवनाचे निमंत्रण

Next Post

साप्ताहिक वृत्तपत्र संघटनेच्या जिल्हाध्यक्षपदी प्रविण चव्हाण तर उपाध्यक्षपदी सुभाष राजपूत

Next Post
साप्ताहिक वृत्तपत्र संघटनेच्या जिल्हाध्यक्षपदी प्रविण चव्हाण तर उपाध्यक्षपदी सुभाष राजपूत

साप्ताहिक वृत्तपत्र संघटनेच्या जिल्हाध्यक्षपदी प्रविण चव्हाण तर उपाध्यक्षपदी सुभाष राजपूत

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

आरटीओची  रिक्षांवर कारवाई; शिवसेना जिल्हाप्रमुख ॲड. राम रघुवंशी यांची मध्यस्थी

आरटीओची रिक्षांवर कारवाई; शिवसेना जिल्हाप्रमुख ॲड. राम रघुवंशी यांची मध्यस्थी

March 14, 2026
अल्पवयीन मुलीवर लैंगिक अत्याचार; आरोपीला 10 वर्षे सक्तमजुरीची शिक्षा

अल्पवयीन मुलीवर लैंगिक अत्याचार; आरोपीला 10 वर्षे सक्तमजुरीची शिक्षा

March 14, 2026
नवापुर एमआयडीसीत बनावट तूप कारखान्यावर छापा; दीड कोटींचा मुद्देमाल जप्त

नवापुर एमआयडीसीत बनावट तूप कारखान्यावर छापा; दीड कोटींचा मुद्देमाल जप्त

March 14, 2026
जिल्ह्यात गॅस आणि इंधनाचा मुबलक साठा,नागरिकांनी अफवांवर विश्वास ठेवू नये : धनंजय गोगटे

जिल्ह्यात गॅस आणि इंधनाचा मुबलक साठा,नागरिकांनी अफवांवर विश्वास ठेवू नये : धनंजय गोगटे

March 14, 2026
वन कायद्यांचा अडसर दूर करून देव मोगरा माता मंदिर परिसरातील विकासाला गती देणार : डॉ. हिना गावित

वन कायद्यांचा अडसर दूर करून देव मोगरा माता मंदिर परिसरातील विकासाला गती देणार : डॉ. हिना गावित

March 14, 2026
पालिकेतर्फे महिला मेळावा; बचत गटांना धनादेश वितरणासह गुणवंतांचा सन्मान

पालिकेतर्फे महिला मेळावा; बचत गटांना धनादेश वितरणासह गुणवंतांचा सन्मान

March 10, 2026

Total Views

  • 4,142,612 hits

मुख्य संपादक

श्री. शांताराम पी. पाटील
8275590450

At.post.Umarde Khurde ta.dist Nandurbar
मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458

  • Home
  • Sample Page

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

कॉपी करू नका.
WhatsApp-Add