Public Mirror News
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
Public Mirror News
No Result
View All Result

झारखंड राज्यात रांची मध्ये नंदुरबार च्या धर्तीवर सेंट्रल किचन निर्माण करणार : केंद्रीय संरक्षण राज्यमंत्री संजय सेठ

team by team
December 28, 2024
in राजकीय
0
झारखंड राज्यात रांची मध्ये नंदुरबार च्या धर्तीवर सेंट्रल किचन निर्माण करणार : केंद्रीय संरक्षण राज्यमंत्री संजय सेठ

नंदुरबार l प्रतिनिधी-
आदिवासी विकास विभागाने महाराष्ट्रात राबवलेला सेंट्रल किचन चा उपक्रम हा अत्यंत अनुकरणीय आणि प्रभावीपणे राबवला जात आहे, हा प्रयोग नंदुरबारच्या धर्तीवर झारखंड सारख्या आदिवासी बहुल राज्याची राजधानी रांची येथे राबवण्याचा मानस असल्याचे केंद्रीय संरक्षण राज्यमंत्री संजय सेठ यांनी व्यक्त केला आहे.

नंदुरबार जिल्ह्याच्या दौऱ्यावर असलेल्या केंद्रीय संरक्षण राज्यमंत्री श्री. सेठ यांनी आदिवासी विकास विभागामार्फत आदिवासी विकास प्रकल्प (नंदुरबार) अंतर्गत राबवल्या जाणाऱ्या सेंट्रल किचनला भेट दिली, त्यावेळी ते बोलत होते. यावेळी जिल्हाधिकारी डॉ. मित्ताली सेठी, जिल्हा पोलीस अधीक्षक श्रवण दत्त एस., जिल्हा नियोजन अधिकारी अंकुश काळे, सेंट्रल किचनचे व्यवस्थापक तसेच कर्मचारी यांच्यासह विविध संबंधित यंत्रणांचे अधिकारी व पदाधिकारी उपस्थित होते.

यावेळी सेंट्रल किचन या योजनेचे कौतुक करताना केंद्रीय संरक्षण राज्यमंत्री श्री. सेठ म्हणाले, महाराष्ट्रात आदिवासी विकास विभागाने राबवलेल्या नंदुरबार येथील सेंट्रल किचन या योजनेबाबत आज जाणीवपूर्वक प्रत्यक्ष भेट देवून माहिती करून घेतली. एकाच स्वयंपाक घरातून शिजलेले अत्यंत स्वच्छ, आरोग्यदायी, पौष्टिक व उल्लेखनीय म्हणजे कडधान्येयुक्त अन्न आदिवासी आश्रम शाळांमधील सुमारे 18 हजार विद्यार्थ्यांना नाश्ता, दुपारचे व रात्रीच्या जेवणात उपलब्ध करून दिले जाते आहे. आदिवासी मुलांमधील पोषण आहाराच्या समस्येवर परिणामकारक व परिपूर्ण अशी ही सेंट्रल किचन ची संकल्पना आहे.

शिजवलेले अन्न अगोदर ज्यांनी तयार केले आहे, ते अगोदर चाखतात त्यामुळे त्या अन्नातील अत्यावश्यक घटक व पौष्टिकता तसेच प्रमाणबद्धता एकप्रकारे प्रमाणित केली जाते. त्यामुळे सकस आहारासाठीची मिड डे मिल ही प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांची संकल्पनेतील स्वच्छता, शिक्षण आणि आरोग्याच्या निकषांवर आधारित त्रिसुत्री येथे प्रत्यक्षात यशस्वी झाल्याचे दिसत असल्याचे यावेळी केंद्रीय संरक्षण राज्यमंत्री श्री. सेठ यांनी सांगितले.

यावेळी केंद्रीय संरक्षण राज्यमंत्री श्री. सेठ यांनी उपस्थित अधिकारी व पदाधिकारी यांच्यासमवेत संपूर्ण सेंट्रल किचन ची कार्यपद्धती जाणून घेतली. उपलब्ध यंत्रसामग्रीचा उपयोग करताना त्यातील अन्नधान्य व भाजीपाला यांची पौष्टिकता कशी जपली जाते, या बाबतचे बारकावेही त्यांनी जाणून घेतले. सेंट्रल किचनसाठी काम करणाऱ्या अधिकारी कर्मचाऱ्यांचे कौतुक करून अभिनंदन केले. तसेच तेथे तयार करण्यात आलेल्या सकस आहाराचा आस्वादही घेतला.

बातमी शेअर करा
Previous Post

जिल्ह्यात 27-28 डिसेंबरदरम्यान गारपीट आणि मेघगर्जनेसह पावसाचा अंदाज

Next Post

जिल्ह्याला आकांक्षित श्रेणीतून बाहेर काढून प्रगतीपथावर नेण्याची जबाबदारी सर्वांची :केंद्रीय संरक्षण राज्यमंत्री संजय सेठ

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

मुख्याध्यापक संघाच्या अध्यक्षपदी पुष्पेंद्र रघुवंशी यांची सर्वानुमते निवड

मुख्याध्यापक संघाच्या अध्यक्षपदी पुष्पेंद्र रघुवंशी यांची सर्वानुमते निवड

August 24, 2026
नगरपालिका हद्दीतील १३ रस्त्यांच्या कामातील जन हित याचिकेत कारणे दाखव नोटीस: खंडपीठाचे आदेश

नगरपालिका हद्दीतील १३ रस्त्यांच्या कामातील जन हित याचिकेत कारणे दाखव नोटीस: खंडपीठाचे आदेश

August 22, 2026
जलसंधारणाचा वसा लोकचळवळीतून पुढे नेऊया: जिल्हाधिकारी डॉ. मित्ताली सेठी

जलसंधारणाचा वसा लोकचळवळीतून पुढे नेऊया: जिल्हाधिकारी डॉ. मित्ताली सेठी

August 22, 2026
जिल्ह्यात विशेष संक्षिप्त पुनरीक्षण कार्यक्रम जाहीर

जिल्ह्यात विशेष संक्षिप्त पुनरीक्षण कार्यक्रम जाहीर

August 22, 2026
जलतरण तलावाची वाढीव फी कमी करण्याची सर्वसाधारण सभेत मागणी; हिरालाल चौधरी यांचे निवेदन

जलतरण तलावाची वाढीव फी कमी करण्याची सर्वसाधारण सभेत मागणी; हिरालाल चौधरी यांचे निवेदन

August 22, 2026
हवालदार भटू धनगर यांना निष्कलंक सेवेबद्दल भारत सरकारचे राष्ट्रीय सेवा पदक

हवालदार भटू धनगर यांना निष्कलंक सेवेबद्दल भारत सरकारचे राष्ट्रीय सेवा पदक

August 20, 2026

Total Views

  • 4,142,612 hits

मुख्य संपादक

श्री. शांताराम पी. पाटील
8275590450

At.post.Umarde Khurde ta.dist Nandurbar
मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458

  • Home
  • Sample Page

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

कॉपी करू नका.
WhatsApp-Add