Public Mirror News
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
Public Mirror News
No Result
View All Result

विजयादशमिनिमित्त हिंदु जनजागृती समितीच्या वतीने नंदुरबार येथे शस्त्रपूजन

team by team
October 15, 2021
in सामाजिक
0
विजयादशमिनिमित्त हिंदु जनजागृती समितीच्या वतीने नंदुरबार येथे शस्त्रपूजन
नंदुरबार l प्रतिनिधी-
 विजयादशमीच्या दिवशी दुर्गादेवीने महिषासुराशी युद्ध करून त्याचा वध केला. प्रभू श्रीरामांनी आजच्याच दिवशी रावणाचा वध केला. अर्जुनाने आजच्याच दिवशी शमीच्या ढोलीतून आपली शस्त्र काढून कौरवांना परास्त केले. त्यामुळे आपणही आजच्या दिवशी हिंदुराष्ट्र स्थापनेचा संकल्प करायला हवा, विजय आपला निश्चित आहे. यासाठीच येथील देसाईपूरा भागातील सिध्दीविनायक मंदीरात हिंदु जनजागृती समितीच्या वतीने शस्त्रपूजन करण्यात आले. सर्वप्रथम आदिशक्तीच्या चरणी प्रार्थना करण्यात आली.
      सनातन संस्थेचे संस्थापक परात्पर गुरू डॉ. जयंत आठवले यांनी समस्त हिंदू बांधवांसाठी दिलेल्या संदेशाचे वाचन करण्यात आले. तो संदेश असा – ‘विजयादशमी’ हा हिंदूंच्या देवता आणि राष्ट्रपुरुष यांच्या विजयाचा इतिहास सांगणारा दिवस आहे. अनेक शतके पराभूत असलेल्या हिंदु समाजाच्या घरांमध्ये सध्या विजयादशमीच्या दिवशी शस्त्रपूजन, अपराजितापूजन आणि सीमोल्लंघन या कृती केवळ औपचारिकता म्हणून केल्या जातात. आज शस्त्रपूजन केवळ शेतकी आणि घरगुती उपकरणांच्या पूजनापुरते मर्यादित झाले आहे. धर्मशिक्षणाच्या अभावी अपराजितादेवीचे पूजन लुप्त झाले आहे आणि पूर्वीचे युद्धासाठीचे सीमोल्लंघन आता केवळ नगराच्या वेशीबाहेरील मंदिरात जाऊन दर्शन घेण्यापुरते सीमित झाले आहे. सध्या अफगाणिस्तानमध्ये तालिबानी आतंकवाद्यांचे राज्य स्थापित झाले आहे. या अफगाणिस्तानपासून आता देहली दूर नाही. त्यामुळे काश्मीरपासून केरळपर्यंत ‘स्लीपर सेल्स’ (छुप्या पद्धतीने आतंकवाद्यांना साहाय्य करणारे धर्मांधांचे स्थानिक गट) मध्ये सक्रीय असलेले आतंकवादी भारतात ‘तालिबानी राज्य’ आणण्यासाठी उत्सुक आहेत. काश्मीरमधील जिहादी संघटनांनी तालिबानचे साहाय्य मागणे, काश्मिरी नेत्यांनी तालिबानचे समर्थन करणे, पंजाब-उत्तरप्रदेशमध्ये आतंकवादी पकडले जाणे इत्यादी त्याची दृश्य उदाहरणे आहेत. ते भारतात कधीही युद्ध पुकारू शकतात. अशा स्थितीत न्यूनतम स्वतःचे, परिवाराचे आणि समाजाचे रक्षण करण्यासाठी तरी सशस्त्र आतंकवाद्यांचा प्रतिकार करण्याची सिद्धता करा ! लक्षात ठेवा, शस्त्रपूजनाद्वारे उपकरणांमध्ये शक्तीची प्रतिष्ठापना होते. अपराजितादेवीचे पूजन म्हणजे पराजय टाळणे आणि विजयप्राप्ती यांसाठी केलेली शक्तीची आराधना होय. सीमोल्लंघन म्हणजे प्रत्यक्ष विजयासाठी शत्रूच्या सीमेत प्रवेश करणे होय. विजयादशमीच्या कर्मकांडांचा हा अर्थ जाणून काळानुसार प्रत्येक कृती करा ! वैधानिक परवाने असलेल्या शस्त्रांचे पूजन करा ! हिंदूंच्या विजयासाठी अपराजितादेवीचे भावपूर्ण पूजन करा ! यावर्षी विजयादशमीचे खरे सीमोल्लंघन करण्याचा आरंभ म्हणून आपल्या क्षेत्रातील संशयास्पद आतंकवादी हालचालींची माहिती पोलीस-प्रशासनास द्या ! हिंदूंनो, एवढ्या कृती जरी निश्चयपूर्वक केल्या, तरी विजयादशमी साजरी केल्याचा खरा आनंद मिळेल !’
– (परात्पर गुरु) डॉ. जयंत आठवले, संस्थापक, सनातन संस्था.
       हिंदूंनी स्वतःवर आक्रमण होण्याची वाट न बघता आताच प्रशिक्षित होऊन अन्यायाचा प्रतिकार करण्यासाठी स्वतः  सिद्ध होणे ही काळाची गरज आहे. महिलांनी सुध्दा आपल्या महान इतिहासात अजरामर झालेल्या क्रांतिकारक यांचा आदर्श ठेऊन.. इतिहासातून बोध घ्यायला हवा, असे प्रतिपादन समितीचे डॉ. सतीश बागुल यांनी केले.
        शस्त्र पूजन उद्योजक हेमंत पाटील आणि सौ. आशा हेमंत पाटील यांच्याहस्ते करण्यात आले. या वेळी श्री. सिद्धीविनायक गणपति मंदीर पुजारी  संजय त्रिवेदी, डॉ. उपेंद्र शाह, पत्रकार योगेंद्र जोशी,  गणेश सोनार, सनातन संस्थेच्या कु. भावना कदम,  वसंत पाटील हिंदु जनजागृती समितीचे  सतिश बागुल, राहुल मराठे धर्मप्रेमी सर्वश्री उज्वल राजपूत, पंकज डाबी, धीरज चौधरी, आकाश गावित, भुषण बागुल, गौरव धामणे, विजय जोशी, भरत मोरे, योगेश जोशी उपस्थित होते.
बातमी शेअर करा
Previous Post

समशेरपुर येथे आयान मलटीट्रेड एल.एल.पी. साखर कारखान्याचा बाॅयलर अग्नी प्रदिपन उत्साहात

Next Post

शिरीष कुमार मंडळातर्फे वाचन प्रेरणा दिन साजरा

Next Post
शिरीष कुमार मंडळातर्फे वाचन प्रेरणा दिन  साजरा

शिरीष कुमार मंडळातर्फे वाचन प्रेरणा दिन साजरा

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

आरटीओची  रिक्षांवर कारवाई; शिवसेना जिल्हाप्रमुख ॲड. राम रघुवंशी यांची मध्यस्थी

आरटीओची रिक्षांवर कारवाई; शिवसेना जिल्हाप्रमुख ॲड. राम रघुवंशी यांची मध्यस्थी

March 14, 2026
अल्पवयीन मुलीवर लैंगिक अत्याचार; आरोपीला 10 वर्षे सक्तमजुरीची शिक्षा

अल्पवयीन मुलीवर लैंगिक अत्याचार; आरोपीला 10 वर्षे सक्तमजुरीची शिक्षा

March 14, 2026
नवापुर एमआयडीसीत बनावट तूप कारखान्यावर छापा; दीड कोटींचा मुद्देमाल जप्त

नवापुर एमआयडीसीत बनावट तूप कारखान्यावर छापा; दीड कोटींचा मुद्देमाल जप्त

March 14, 2026
जिल्ह्यात गॅस आणि इंधनाचा मुबलक साठा,नागरिकांनी अफवांवर विश्वास ठेवू नये : धनंजय गोगटे

जिल्ह्यात गॅस आणि इंधनाचा मुबलक साठा,नागरिकांनी अफवांवर विश्वास ठेवू नये : धनंजय गोगटे

March 14, 2026
वन कायद्यांचा अडसर दूर करून देव मोगरा माता मंदिर परिसरातील विकासाला गती देणार : डॉ. हिना गावित

वन कायद्यांचा अडसर दूर करून देव मोगरा माता मंदिर परिसरातील विकासाला गती देणार : डॉ. हिना गावित

March 14, 2026
पालिकेतर्फे महिला मेळावा; बचत गटांना धनादेश वितरणासह गुणवंतांचा सन्मान

पालिकेतर्फे महिला मेळावा; बचत गटांना धनादेश वितरणासह गुणवंतांचा सन्मान

March 10, 2026

Total Views

  • 4,142,612 hits

मुख्य संपादक

श्री. शांताराम पी. पाटील
8275590450

At.post.Umarde Khurde ta.dist Nandurbar
मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458

  • Home
  • Sample Page

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

कॉपी करू नका.
WhatsApp-Add