नंदुरबार l प्रतिनिधी
नंदुरबार येथील भारतरत्न अटल बिहारी बातमी सभागृहात दिव्यांगासाठी मार्गदर्शन शिबिराचे आयोजन आईसाहेब लतामाय दिव्यांग बहुउद्देशीय संस्था नंदुरबार यांनी केले होते.
दिव्याग शिबिरास अँड .संगीता पाटील, शासकीय दिव्यांग कर्मचारी संघटनेचे अध्यक्ष आरती बाविस्कर, अपंग वित्त विकास अपंग कर्मचारी संघटना महामंडळ चे निरीक्षक सचिन महाले, संस्थेचे संस्थापक अध्यक्ष आनंद पाटील आदींनी उपस्थित दिव्यांगांना विविध योजनांची माहिती योजनांचा लाभ घेताना येणाऱ्या विविध अडचणी सोडवण्याचे उपाय, नियम याची सविस्तर चर्चा व माहिती करून दिली. कार्यक्रमास डॉ. दिलीप धनगर, मंगेश सोनवणे, संगीता भोई, संगीता पाटील, राजेंद्र पाटील, विलास भाई, प्रेमराज वळवी, संघर्ष दिव्यांग संस्थेचे अध्यक्ष कैलास कोळी आदी उपस्थित होते.