Public Mirror News
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
Public Mirror News
No Result
View All Result

जिभाऊ करंडक राज्यस्तरीय एकांकिका स्पर्धा आयोजन बैठक

team by team
December 17, 2024
in राजकीय
0
जिभाऊ करंडक राज्यस्तरीय एकांकिका स्पर्धा आयोजन बैठक

नंदुरबार l प्रतिनिधी-

गेल्या तेरा वर्षापासून जिभाऊ करंडक राज्यस्तरीय एकांकिका स्पर्धेचे सातत्यपूर्ण आयोजन होत आहे. यंदा या स्पर्धेचे १४ वे वर्ष आहे. या स्पर्धेच्या माध्यमातून नंदुरबार जिल्ह्यातील कलावंतांना व रसिकांना विविध नाट्य अविष्कार अनुभवयास मिळत असतात. तसेच या स्पर्धेच्या माध्यमातून जिल्ह्यात नाट्यकलावंत व नाट्यतंत्रज्ञ देखील तयार होत आहेत असे प्रतिपादन आयोजन समितीचे सदस्य तथा नाट्यकर्मी मनोज सोनार यांनी केले. ते येथील छत्रपती शिवाजी महाराज नाट्यगृहाच्या प्रांगणात जिभाऊ करंडक राज्यस्तरीय एकांकिका स्पर्धेच्या आयोजन बैठकीत बोलत होते.

स्पर्धेचे आयोजन गाडगेबाबा शैक्षणिक व सांस्कृतिक सेवा मंडळ, शिंदे यांच्या तर्फे राज्यपुरस्कृत शिक्षक जयदेव लिंबा पेंढारकर तथा जिभाऊ यांच्या स्मरणार्थ करण्यात येते. या स्पर्धेत राज्यभरातील नाट्यसंस्था व महाविद्यालये सहभागी होऊन आपला नाट्याविष्कार सादर करीत असतात. सदर बैठकीत जिभाऊ करंडक स्पर्धेत सहभागी होणारे संघ व कलावंत स्पर्धकांचे नियोजन याबाबत चर्चा करण्यात आली. बैठकीदरम्यान नाट्यकर्मी नागसेन पेंढारकर यांनी स्पर्धेच्या यशस्वी आयोजनाबाबत आपले विचार मांडले. तसेच या वर्षी नंदुरबार जिल्ह्यातुन जास्तीत जास्त महाविद्यालय व विविध नाट्यसंस्था यांचा सहभाग स्पर्धेच्या दृष्टीने महत्वाचा आहे.

जिभाऊ करंडक ही स्पर्धा महाराष्ट्रातील प्रमुख एकांकिका स्पर्धेपैकी एक स्पर्धा आहे. या जिभाऊ करंडकमुळे नंदुरबार जिल्ह्यात नाट्य चळवळ जोमाने उभी राहिली असून जिभाऊ करंडक च्या दरम्यान नंदुरबार जिल्ह्यातील नाट्यसंस्था देखील सहभागी होतील असा विश्वास देखील नागसेन पेंढारकर यांनी व्यक्त केला. जिभाऊ करंडकच्या या बैठकीत नाट्यकर्मी तुषार ठाकरे, विश्व हिंद धर्म सेवा संस्थेचे अध्यक्ष कुणाल वसईकर यांनी देखील जिभाऊ करंडकच्या नियोजनाबाबत आपले मत व्यक्त करीत जिभाऊ करंडक यशस्वी होण्याबाबतचा विश्वास व्यक्त केला. जिभाऊ करंडक च्या या बैठकीत गिरीश वसावे, रत्नदीप पवार, राहुल खेडकर, आशिष खैरनार, सागर कदम, चिदानंद तांबोळी आदी उपस्थित होते.

बातमी शेअर करा
Previous Post

शिवसेना ठाकरे गटातर्फे मतदार नोंदणी अभियान

Next Post

नंदुरबार येथे दिव्यांगासाठी मार्गदर्शन शिबिर उत्साहात

Next Post
नंदुरबार येथे दिव्यांगासाठी मार्गदर्शन शिबिर उत्साहात

नंदुरबार येथे दिव्यांगासाठी मार्गदर्शन शिबिर उत्साहात

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

शहादा येथे तृतीयपंथियांसाठी जाणिव जागृती कार्यशाळा

शहादा येथे तृतीयपंथियांसाठी जाणिव जागृती कार्यशाळा

August 26, 2026
माजी मंत्री आ. डॉ. विजयकुमार गावित यांनी श्री शनैश्वर मंदिरात केले पुजा; जनसंपर्काला केली  सुरुवात

माजी मंत्री आ. डॉ. विजयकुमार गावित यांनी श्री शनैश्वर मंदिरात केले पुजा; जनसंपर्काला केली सुरुवात

August 26, 2026
प्रकृतीत सुधारणा झाल्याने दीर्घ प्रतीक्षेनंतर माजी मंत्री डॉ. विजयकुमार गावित यांचे नंदुरबार येथे आगमन

प्रकृतीत सुधारणा झाल्याने दीर्घ प्रतीक्षेनंतर माजी मंत्री डॉ. विजयकुमार गावित यांचे नंदुरबार येथे आगमन

August 25, 2026
मुख्याध्यापक संघाच्या अध्यक्षपदी पुष्पेंद्र रघुवंशी यांची सर्वानुमते निवड

मुख्याध्यापक संघाच्या अध्यक्षपदी पुष्पेंद्र रघुवंशी यांची सर्वानुमते निवड

August 24, 2026
नगरपालिका हद्दीतील १३ रस्त्यांच्या कामातील जन हित याचिकेत कारणे दाखव नोटीस: खंडपीठाचे आदेश

नगरपालिका हद्दीतील १३ रस्त्यांच्या कामातील जन हित याचिकेत कारणे दाखव नोटीस: खंडपीठाचे आदेश

August 22, 2026
जलसंधारणाचा वसा लोकचळवळीतून पुढे नेऊया: जिल्हाधिकारी डॉ. मित्ताली सेठी

जलसंधारणाचा वसा लोकचळवळीतून पुढे नेऊया: जिल्हाधिकारी डॉ. मित्ताली सेठी

August 22, 2026

Total Views

  • 4,142,612 hits

मुख्य संपादक

श्री. शांताराम पी. पाटील
8275590450

At.post.Umarde Khurde ta.dist Nandurbar
मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458

  • Home
  • Sample Page

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

कॉपी करू नका.
WhatsApp-Add