नंदुरबार l प्रतिनिधी-
“माझी शेती, माझा सातबारा, मीच नोंदविणार माझा पीक पेरा” शासनाच्या या सकंल्पनेनुसार शेतकऱ्यांनी आपल्या शेतीचा पीक पाहणी करण्याची सुविधा उपलब्ध करण्यात आली आहे. जिल्ह्यातील सर्व शेतकऱ्यांनी “ई-पीक पाहणी” या मोबाईल ॲपचा वापर करून पीक पाहणी 15 जानेवारी 2025 पर्यंत नोंदवावी, असे आवाहन जिल्हाधिकारी डॉ. मित्ताली सेठी यांनी एका शासकीय प्रसिद्धी पत्रकान्वये केले आहे.
राज्यातील सर्व तालुक्यात ई-पीक पाहणी प्रणालीद्वारे पीक पाहणी करण्याची योजना राबविण्यात येत असून शेतकरी स्वत: ई-पीक पाहणी व्हर्जन-2 या मोबाईल ॲपद्वारे आपल्या शेताची पीकाची पीक पाहणी गाव नमूना 7/12 उताऱ्यावर नोंदवावी. रब्बी हंगाम-2024 साठी ई-पीक पाहणी कार्यक्रम संपुर्ण राज्यात सूरू असून 15 जानेवारी 2025 पर्यंत ई-पीक पाहणी नोंदविता येईल. मोबाईल ॲपद्वारे शेतकऱ्यांनी पीक पाहणी नोंदविल्यास त्यांचा फायदा अचुक पीक पाहणी नोंदणी व विहीत शासकीय योजनेचा लाभ यासाठी होणार आहे.
ई-पीक पाहणी नोंदविण्यासाठी काही अडचण आल्यास संबंधित तलाठी, मंडळ अधिकारी व तहसिल कार्यालय येथे संपर्क साधावा. असेही जिल्हाधिकारी डॉ. मित्ताली सेठी यांनी शासकीय प्रसिद्धी पत्रकानुसार कळविले आहे.