Public Mirror News
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
Public Mirror News
No Result
View All Result

निवृत्त शिक्षकाचे सेवानिवृत्तीचे नऊ लाख बँकेच्या आवारातून पळविले

team by team
November 13, 2024
in क्राईम
0
निवृत्त शिक्षकाचे सेवानिवृत्तीचे नऊ लाख बँकेच्या आवारातून पळविले

नंदुरबार l प्रतिनिधी-

तळोदा येथील स्टेट बँक शाखेतून 9 लाखाची रक्कम घेऊन बाहेर आलेल्या सेवानिवृत्त शिक्षकाच्या हातातून पिशवी हिसकावून 2 चोरट्यानी पळ काढल्याची घटना घडली आहे. घटनेत चोरट्यांचा पाठलाग करणारा शिक्षकांच्या मुलाचा अपघात होऊन तो जबर जखमी झाला आहे दिवसाढवळ्या भर गर्दीच्या ठिकाणी घडलेल्या चोरीच्या घटनेने तळोदा शहरात खळबळ माजली असून पोलिसांच्या कार्यक्षमतेवर प्रश्नचिन्ह उभे राहिले आहे.

याबाबत सविस्तर वृत्त असे की, तळोदा तालुक्यातील तळवे येथील रहिवासी सेवानिवृत्त माध्यमिक शिक्षक देविदास मंगा मराठे हे मागील 30 सप्टेंबर रोजी सेवानिवृत्त झाले. त्यांची सेवानिवृत्ती ची रक्कम भारतीय स्टेट बँक शाखा तळोदा येथे जमा झाली आहे. ही जमा रक्कम काढण्यासाठी देविदास मराठे हे त्यांचा मुलगा संकेत मराठे याच्या सोबत बँकेत आले व त्यांनी दुपारी सव्वा दोन वाजता 9 लाख रोख रक्कम काढली व कापडी पिशवीत ठेवून बाहेर आले.

त्यांच्या मुलगा संकेत याच्या मोटरसायकलवर पिशवी घेऊन बसत असताना आधीच त्यांच्यावर बँकेत पाळत ठेवून असलेल्या दोन जणांनी मागून मोटरसायकलवर येत देविदास मराठे यांच्या हातातून पिशवी हिसकावली व पळ काढला. ही बाब मोटरसायकलवर बसलेला देविदास मराठे यांचा मुलगा संकेत याच्या लक्षात येताच त्याने तसाच त्यांच्या पाठलाग सुरू केला. आधी चोरटे बँकेच्या आवारातून चिनोदा रोडकडे गेले व तेथून बिरसा मुंडा चौक मार्गे शहादा रस्त्याने भरधाव वेगाने जात असतांना त्यांच्या मागे असलेल्या संकेत याच्या शहादा रस्त्यावरील जैन शॉपी समोर खड्डा व त्यातील वाळूमुळे मोटरसायकल घसरून अपघात झाला त्यात तो जबर जखमी झाला असून त्याला पुढील उपचारार्थ नंदुरबार येथे हलविण्यात आले आहे.

त्यानंतर पोलिसांना घटनेची खबर दिली असता सपोनि राजू लोखंडे व पोउनि महेंद्र पवार हे पोलिसांसह घटनास्थळी पोहोचले व त्यांनी बँकेचे सीसीटीव्ही फुटेज तपासून पुढील कारवाईकरीत आहेत. घटनास्थळी स्थानिक गुन्हा अन्वेषण विभागाचे पोलीस निरक्षक किरण खेडकर यांनी सुद्धा भेट देऊन तपासाबाबत कारवाई हाती घेतली आहे. 1 महिन्यापूर्वी कॉलेज रोडवरील मिनी बँकेतून 4 लाख रु रक्कम असलेली बॅग लंपास झाली होती. आजतागयत त्याच्या तपास लावण्यात तळोदा पोलिसांना यश आलेले नाही.

बातमी शेअर करा
Previous Post

मतदान जनजागृतीसाठी मॅरेथॉनमध्ये धावले 275 शिक्षक व 1200 विद्यार्थी

Next Post

छायाचित्रकार नितीन पाटील यांना साक्री तालुक्यातील झिरणीपाडा येथे उत्कृष्ट फोटोग्राफी पुरस्काराने केले सन्मानित

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

अवैध दारूचा साठा व वाहतूक करणाऱ्यांवर स्थानिक गुन्हे शाखेची कारवाई, तब्बल ५६ लाखांचं मुद्देमाल जप्त

अवैध दारूचा साठा व वाहतूक करणाऱ्यांवर स्थानिक गुन्हे शाखेची कारवाई, तब्बल ५६ लाखांचं मुद्देमाल जप्त

May 23, 2026
पेट्रोल-डिझेलचा कोणताही तुटवडा नाही : जिल्हाधिकारी डॉ. मित्ताली सेठी

पेट्रोल-डिझेलचा कोणताही तुटवडा नाही : जिल्हाधिकारी डॉ. मित्ताली सेठी

May 23, 2026
राष्ट्रीय मानवाधिकार आयोगाचे सदस्य प्रियांक कानूनगो यांच्या अध्यक्षतेखाली बैठक

राष्ट्रीय मानवाधिकार आयोगाचे सदस्य प्रियांक कानूनगो यांच्या अध्यक्षतेखाली बैठक

May 21, 2026
माझी लाडकी बहीण योजनेच्या ई-केवायसी बाबतच्या अफवांवर विश्वास ठेवू नका

माझी लाडकी बहीण योजनेच्या ई-केवायसी बाबतच्या अफवांवर विश्वास ठेवू नका

May 21, 2026
भालेर येथे भव्य महारोजगार मेळाव्यास उत्स्फूर्त प्रतिसाद

भालेर येथे भव्य महारोजगार मेळाव्यास उत्स्फूर्त प्रतिसाद

May 21, 2026
20 मे रोजी औषध दुकाने बंद राहण्याची शक्यता

20 मे रोजी औषध दुकाने बंद राहण्याची शक्यता

May 19, 2026

Total Views

  • 4,142,612 hits

मुख्य संपादक

श्री. शांताराम पी. पाटील
8275590450

At.post.Umarde Khurde ta.dist Nandurbar
मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458

  • Home
  • Sample Page

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

कॉपी करू नका.
WhatsApp-Add