Public Mirror News
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
Public Mirror News
No Result
View All Result

घरफोडी व मोटार सायकल चोरी करणारी टोळी जेरबंद ७३ हजाराचा मुद्देमाल पोलीसांनी केला हस्तगत

team by team
October 14, 2021
in क्राईम
0
घरफोडी व मोटार सायकल चोरी करणारी टोळी जेरबंद ७३ हजाराचा मुद्देमाल पोलीसांनी केला हस्तगत

नंदुरबार |  प्रतिनिधी
घरफोडी व मोटार सायकल चोरी करणार्‍या टोळीला स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखने जेरबंद केले असुन,त्यांच्या ताब्यातुन  ७३ हजार रुपये किमतीचा मुद्देमाल हस्तगत  करण्यात आला आहे.
याबाबत पोलीस सुत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, दि.१ ऑक्टोंबर रोजी रात्री ३ वाजेच्या सुमारास शहादा शहरातील काशिनाथ मार्केटमध्ये श्रीराम मोबाईल दुकानाचे शटर कोणी तरी अज्ञात चोरट्यांनी उचकावुन दुकानातील १२ हजार ५०० रु.किं. चा मुद्देमाल चोरुन नेला म्हणून दिपक सुपडु खेडकर रा. द्वारकाधीश नगर, शहादा यांचे फिर्यादीवरुन शहादा पोलीस ठाण्यात अज्ञात चोरट्यांविरुध्द गुन्हा दाखल करण्यात आला होता. याबाबत स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक रविंद्र कळमकर  यांना दि.१३ ऑक्टोंबर रोजी गुप्त बातमीदारामार्फत बातमी मिळाली की, शहादा येथील काशिनाथ मार्केटमध्ये मोबाईल दुकानात चोरी करणारा संशयीत आरोपी हा म्हसावद पोलीस ठाणे हद्दीतील कन्साई या गावातील विष्णु ऊर्फ जादु व त्याचे दोन साथीदारांनी मिळुन केलेली आहे अशी बातमी मिळाल्यावरून विष्णु ऊर्फ जादु किसन वळवी यास ताब्यात घेवुन विचारपुस केली असता त्याने किसन गुलाब वळवी, गणेश सुकलाल पटले तिन्ही रा. कंसाई ता शहादा यांच्या मदतीने चोरी केल्याची कबुली दिल्यावरुन त्याच्या ताब्यातुन गुन्ह्यातील चोरीस गेलेला ३ हजार रुपये किंमतीचा मोबाईल जप्त केला.
तसेच संशयीत आरोपी विष्णु ऊर्फ जादु किसन वळवी यास अधिक विश्वासात घेवुन विचारपुस केली असता त्याने नंदुरबार येथुन होंडा ऍक्टीवा व दोंडाईचा जि. धुळे येथुन होंडा शाईन मोटार सायकल चोरी करुन त्याच्या घराच्या पाठीमागे शेतात लपवुन ठेवली असल्याबाबत कळविले.यावेळी दोन्ही मोटार सायकल जप्त करण्यात आलेल्या आहेत.
ताब्यात घेण्यात आलेल्या संशयीत आरोपीतांकडुन ३ हजाराचा एक मोबाईल व ७० हजार रुपये किंमतीच्या दोन मोटार सायकल असा एकुण ७३ हजार रूपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आले असुन तिन्ही आरोपीतांना पुढील तपासकामी शहादा पोलीस ठाण्याच्या ताब्यात देण्यात आले आहे.
सदरची कामगिरी पोलीस अधिक्षक पी.आर.पाटील, अपर पोलीस अधिक्षक विजय पवार यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हेशाखेचे पोलीस निरीक्षक रविंद्र कळमकर, सहा. पोलीस निरीक्षक संदीप पाटील, पोलीस हवालदार दिपक गोरे, पोलीस नाईक मोहन ढमढेरे, विजय ढिवरे, दिपक न्हावी, रमेश साळुके, सतिष घुले यांचे पथकाने केली.

बातमी शेअर करा
Previous Post

भरधाव मालट्रकने दुचाकीला चिरडल्याने एक जण जागीच ठार तर दोघे गंभीर जखमी

Next Post

प्रकाशाहुन शेकडो भाविक पदयात्रा करत सप्तशृंगी गडाकडे रवाना

Next Post
प्रकाशाहुन शेकडो भाविक पदयात्रा करत सप्तशृंगी गडाकडे रवाना

प्रकाशाहुन शेकडो भाविक पदयात्रा करत सप्तशृंगी गडाकडे रवाना

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

विरचक प्रकल्पात पाण्याची पातळी घटली; शहरात 10 मे पासून दोन दिवसाआड पाणीपुरवठा

विरचक प्रकल्पात पाण्याची पातळी घटली; शहरात 10 मे पासून दोन दिवसाआड पाणीपुरवठा

May 6, 2026
नाशिक कुंभमेळा निधीच्या किमान 10 टक्के निधी प्रकाशा सिंहस्थ कुंभमेळ्यासाठी द्यावा

नाशिक कुंभमेळा निधीच्या किमान 10 टक्के निधी प्रकाशा सिंहस्थ कुंभमेळ्यासाठी द्यावा

May 6, 2026
पश्चिम बंगालमध्ये भाजपाचा ‘ऐतिहासिक’ विजय; डॉ.हिना गावित यांच्या नेतृत्वात जल्लोष

पश्चिम बंगालमध्ये भाजपाचा ‘ऐतिहासिक’ विजय; डॉ.हिना गावित यांच्या नेतृत्वात जल्लोष

May 6, 2026
संभाव्य नैसर्गिक आपत्तींचा सामना करण्यासाठी नंदुरबार जिल्हा प्रशासन सज्ज : जिल्हाधिकारी डॉ. मित्ताली सेठी

संभाव्य नैसर्गिक आपत्तींचा सामना करण्यासाठी नंदुरबार जिल्हा प्रशासन सज्ज : जिल्हाधिकारी डॉ. मित्ताली सेठी

May 6, 2026
के.डी.गावित सैनिकी विद्यालयात महाराष्ट्र दिन उत्साहात साजरा

के.डी.गावित सैनिकी विद्यालयात महाराष्ट्र दिन उत्साहात साजरा

May 2, 2026
नांदरखे येथे महाराष्ट्र दिन उत्साहात साजरा

नांदरखे येथे महाराष्ट्र दिन उत्साहात साजरा

May 2, 2026

Total Views

  • 4,142,612 hits

मुख्य संपादक

श्री. शांताराम पी. पाटील
8275590450

At.post.Umarde Khurde ta.dist Nandurbar
मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458

  • Home
  • Sample Page

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

कॉपी करू नका.
WhatsApp-Add