नंदुरबार | प्रतिनिधी
नंदुरबार येथील साक्री रस्त्यावरील भाऊ पेट्रोलपंपासमोर भरधाव मालट्रकने दुचाकीला चिरडल्याने एक जण जागीच ठार तर दोघे गंभीर जखमी झाल्याची घटना घडली आहे. अपघातानंतर मालट्रक चालक पसार झाला आहे.
याबाबत पालीसांनी दिलेल्या माहितीनुसार, नंदुरबार साक्री रस्त्यावर भरधाव वेगातील मालट्रक (क्र.एम.एच.१५-ई.जी. ८७३९) ने फॅशन दुचाकी (क्र.एम.एच.२०-बी.आर.३४९४) ला जबर धडक दिली. धडक इतकी भयानक होती की, दुचाकीचा पार चक्काचुर झाला. अपघातात एकाचा जागीच मृत्य झाला तर गंभीर जखमी असलेल्या दोघांना उपचारासाठी नंदुरबार जिल्हा रूग्णालयात करण्यात आला. शिवजनम दुखरण वर्मा (३५) रा. कुरीयान ता.कोटकाम जि.गोड, दुर्गाप्रसाद दिनानाथ यादव रा.महाराजगंज जि.गौड हे दोघे गंभीर जखमी झाले असन त्यांच्यावर जिल्हा रग्णालयात उपचार सुरू आहेत. अपघातानंतर मालट्रक चालक पसार झाला. रात्री उशिरापर्यंत नंदुरबार शहर पोलीस ठाण्यात कारवाई सुरू होती.