नंदुरबार | प्रतिनिधी
नंदुरबार येथे काळाबाजारात जाणारा ३०० कट्टे तांदुळ स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेने पकडला असून आर.के. ट्रेडींग कंपनीच्या मालकासह ट्रक चालकाविरूध्द नंदुरबार शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ट्रकसह सुमारे १० लाख ५० हजारांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.
याबाबत पालीसांनी दिलेल्या माहितीनुसार, नंदुरबार शहरातील जुनी सिंधी कॉलनीतील आर.के ट्रेडींग मधुन ट्रक (क्र.एम.एच.१८-एए ५३९३) मध्ये रेशनचे ३०० कट्टे भरून काळया बाजारात विक्रीसाठी जात होते. नंदुरबार स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेचे पोलीस निरीक्षक रविंद्र कळमकर आपल्या पथकासह गस्तीवर असतांना त्यांना पटेलवाडी परिसरात सदर ट्रकमध्ये रेशनींगच्या तांदुळचे ३०० कट्टे मिळून आले. सदर ट्रक चालकाकडे तांदुळ कुठलाही अधिकृत परवाना नव्हता. म्हणून पुरवठा निरीक्षक हर्षद नेरकर यांच्या फिर्यादीवरन आर.के ट्रेडींगचे मालक मनिष शंकरलाल कामोरा रा.गुरूनानक सोसायटी जुनी सिंधी कॉलनी, नंदुरबार या दोघांविरध्द नंदुरबार शहर पोलीस ठाण्यात जीवनावश्यक वस्तु कायदा कलम १९५५ चे कलम ३ व ७ प्रमाणे गुन्हा अन्वेषण शाखेचे पोलीस निरीक्षक रविंद्र कळमकर, पो.का. रविंद्र पाडवी, बापु बागुर, विशाल नागरे, दादाभाई मासुळ, शोएब यांनी केली.








