Public Mirror News
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
Public Mirror News
No Result
View All Result

सार्वजनिक मालमत्तेचे विद्रुपीकरणीस निर्बंध; जिल्हादंडाधिकारी डॉ. मित्ताली सेठी यांचे आदेश

Mahesh Patil by Mahesh Patil
October 27, 2024
in राज्य
0
सार्वजनिक मालमत्तेचे विद्रुपीकरणीस निर्बंध; जिल्हादंडाधिकारी डॉ. मित्ताली सेठी यांचे आदेश

नंदुरबार l प्रतिनिधी

महाराष्ट्र विधानसभा सार्वत्रिक #निवडणूक २०२४ च्या कालावधीत शासकीय, निमशासकीय, सार्वजनिक मालमत्तेची प्रत्यक्ष किंवा अप्रत्यक्ष स्वरूपात विद्रुपीकरणास निवडणूक प्रक्रिया पूर्ण होईपर्यंत म्हणजे २५ नोव्हेंबर २०२४ पर्यंत निर्बंध घालण्यात आले आहेत. याबाबतचा आदेश जिल्हादंडाधिकारी तथा जिल्हाधिकारी डॉ. मित्ताली सेठी यांनी दिले आहेत.

भारत निवडणूक आयोगाने महाराष्ट्र विधानसभा सार्वत्रिक निवडणूक २०२४ करीता निवडणूक कार्यक्रम जाहीर केला आहे. निवडणूक कार्यक्रम घोषित झाल्यापासून आदर्श आचारसंहिता अंमलात आली आहे. मात्र, काही व्यक्ती/संस्था यांच्याकडून मोठ्या प्रमाणात अनधिकृत होर्डिंग्ज, बॅनर, पोस्टर व भिंतीवर जाहिराती लाऊन शहराचे विद्रु‌पीकरण करण्यात आले आहे. तसेच निवडणूक कालावधीत राजकीय पक्ष अथवा पक्षाशी संबंधित व्यक्ती/संस्था यांच्याकडून होर्डिंग्ज, बॅनर, पोस्टर, भिंतीवर जाहिराती लाऊन शहराचे विद्रुपीकरण करण्याची शक्यता नाकारता येत नाही.

भारत निवडणूक आयोगाने मालमत्ता विद्रुपीकरणास प्रतिबंध करण्यासंबंधी दिलेल्या आदेशाचे काटेकोरपणे पालन करण्याबाबत सूचित केल्यानुसार नगरपालिका, नगरपरिषद, नगरपंचायत व ग्रामीण भागात निवडणुकीच्या कालावधीमध्ये होर्डिंग्ज, बॅनर, पोस्टर व भिंतीवर जाहिरात प्रदर्शित करताना संबंधित स्थानिक प्राधिकरणाची पूर्वपरवानगी घेणे बंधनकारक आहे. तसेच परवानगी संपल्यानंतर ते दूर (नष्ट) करुन इमारती, मालमत्ता पूर्ववत करून घेणे, जाहिराती तत्काळ काढून घेणे आवश्यक आहे.

या पार्श्वभूमीवर जिल्हादंडाधिकरी डॉ. मित्ताली सेठी यांनी म्हटले आहे की, निवडणुकीच्या कालावधीत शासकीय/निमशासकीय, सार्वजनिक मालमत्तेची प्रत्यक्ष किंवा अप्रत्यक्ष स्वरुपात विद्रपीकरणास निवडणूक प्रक्रिया पूर्ण होईपर्यंत (25 नोव्हेंबर 2024 पर्यंत) निर्बंध घालण्यात आले आहेत. सदरचे आदेश निवडणूक प्रक्रिया पूर्ण होईपर्यंत ( 25 नोव्हेंबर 2024 पर्यंत) अमलात राहतील. या आदेशाचा भंग करणाऱ्यांविरुद्ध भारतीय न्याय संहिता 2023 चे कलम 223 अन्वये कारवाई केली जाईल, असेही जिल्हादंडाधिकारी डॉ. मित्ताली सेठी यांनी म्हटले आहे.

बातमी शेअर करा
Previous Post

ओळखपत्र नसल्यास इतर बारा पैकी कुठलाही एक पर्याय मतदानासाठी ग्राह्य धरणार डॉ. मित्ताली सेठी

Next Post

समर्थनम् ट्रस्ट-ओरेकल कंपनीच्या आर्थिक सहाय्याने मुलींसाठी किटचे गटशिक्षणाधिकारी यांच्या हस्ते वाटप

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

आपत्कालीन यंत्रणांनी सतर्क राहून आपली कामे करावित;कुचराई करणाऱ्या विभाग प्रमुखांवर जबाबदारी निश्चित करणार : डॉ. मित्ताली सेठी

आपत्कालीन यंत्रणांनी सतर्क राहून आपली कामे करावित;कुचराई करणाऱ्या विभाग प्रमुखांवर जबाबदारी निश्चित करणार : डॉ. मित्ताली सेठी

May 30, 2025
वीर शिरोमणी महाराणा प्रतापसिंह जयंती निमित्त नंदनगरीत भव्य मिरवणूक

वीर शिरोमणी महाराणा प्रतापसिंह जयंती निमित्त नंदनगरीत भव्य मिरवणूक

May 30, 2025
तोरणमाळ विकासाचा प्रस्ताव पाठवा; पर्यटन मंत्री शंभूराज देसाई

तोरणमाळ विकासाचा प्रस्ताव पाठवा; पर्यटन मंत्री शंभूराज देसाई

May 30, 2025
भांडे संच वाटपाचा पुन्हा धडाका सुरू; माजी मंत्री आ.डॉ.विजयकुमार गावित यांच्या हस्ते झाला शुभारंभ

भांडे संच वाटपाचा पुन्हा धडाका सुरू; माजी मंत्री आ.डॉ.विजयकुमार गावित यांच्या हस्ते झाला शुभारंभ

May 25, 2025
घरकुल लाभार्थ्यांना 5 ब्रास वाळू मोफत देण्यास संदर्भातील पत्राचे आमदार डॉ. विजयकुमार गावित यांच्या हस्ते वाटप

घरकुल लाभार्थ्यांना 5 ब्रास वाळू मोफत देण्यास संदर्भातील पत्राचे आमदार डॉ. विजयकुमार गावित यांच्या हस्ते वाटप

May 25, 2025
युवकाचा मारहाण करुन मृत्यूस कारणीभूत ठरणाऱ्या एकास पाच वर्ष सश्रम कारावास

अल्पवयीन मुलीवर अत्याचार प्रकरणी आरोपीला वीस वर्ष कारावासाची शिक्षा

May 24, 2025

Total Views

  • 4,142,612 hits

मुख्य संपादक

श्री.महेश शांताराम पाटील
9404747458

At.post.Umarde Khurde ta.dist Nandurbar
मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458

  • Home
  • Sample Page

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

कॉपी करू नका.
WhatsApp Group