नंदुरबार l प्रतिनिधी
नंदुरबार तालुक्यातील शिंदे गावात हिंदू मुस्लिम एकतेचे दर्शन पाहायला मिळाले. गावातील मज्जिद जवळ श्री.गणेशाची मिरवणुक आली असता मुस्लिम बांधवांकडून पुष्पवृष्टी करण्यात आली.
नंदुरबार तालुक्यातील शिंदे या गावात आज 15 सप्टेंबर रोजी नवव्या दिवशी जय बजरंग गणेश मित्र मंडळ यांच्यातर्फे गणेशाची विसर्जनासाठी मिरवणूक काढण्यात आली. रात्री आठ वाजे दरम्यान गावातील मज्जित जवळ श्री गणेशाची मिरवणूक आली.
त्यावेळी मुस्लिम बांधवांकडून पुष्पवृष्टी करून गणरायाला हर्षोल्लासात निरोप देऊन जातीय सलोखा राखण्यात आला. देशात जाती जाती वाद सुरू असताना शिंदे येथील घटनेमुळे हिंदू मुस्लिम एकतेचे दर्शन झाले. यावेळी पोलीस बंदोबस्ताला पोहे सुनिल येलवे व पोशि शशिकांत शेवाळे उपस्थित होते.