नंदुरबार l प्रतिनिधी
ज्या बँकांनी पीक कर्ज देणे उद्दीष्ट पुर्ण केले नसेल
त्या बँकावर कार्यवाही करावी. तसेच जिल्ह्यातील शेतकऱ्यांना शेती कर्ज त्वरित देण्यात यावे अशी मागणी भाजपा किसान मोर्चातर्फे जिल्हाधिकारी मित्ताली सेठी यांना देण्यात आले.
जिल्हाधिकारी यांना देण्यात आलेल्या निवेदनात म्हटले आहे की, नंदुरबार जिल्हयातील शेतकरी जास्त पावसामुळे अडचणीत सापडला आहे. आणि राज्य शासनाच्या मागेल त्यास शेतक-याला त्वरीत कर्ज पुरवठा करण्यात यावा. असे जाहीर केल्यानंतरही काही बँकांनी कर्ज देण्यास विलंब करुन टाळाटाळ करीत आहे.
अश्या बँकांवर त्वरीत आपल्या स्तरावर योग्य ती कार्यवाही करून शेतकऱ्यांना शेती कर्ज त्वरीत उपलब्ध व्हावे, याकरीता सर्व बँकांना निर्देश दयावे अशा आशयाचे निवेदन देण्यात आले. या निवेदनावर भाजपा जिल्हाध्यक्ष निलेश माळी, भाजपा किसान मोर्चाचे जिल्हाध्यक्ष बुधाभाई पाटील, उपाध्यक्ष दशरथ नरोत्तम चौधरी, गणेश पुनाजी पाटील, प्रेमराज शरद पाटील, प्रशांत शांतीलाल पाटील आदींच्या स्वाक्षऱ्या आहेत.