Public Mirror News
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
Public Mirror News
No Result
View All Result

स्थायी समितीची सभा कोरम अभावीच तहकूब; विरोधक पुन्हा घेताहेत खोट्याचा आधार : जि.प. अध्यक्ष डॉ. सुप्रिया गावित

team by team
September 12, 2024
in राजकीय
0
स्थायी समितीची सभा कोरम अभावीच तहकूब; विरोधक पुन्हा घेताहेत खोट्याचा आधार : जि.प. अध्यक्ष डॉ. सुप्रिया गावित

नंदुरबार l प्रतिनिधी-
नंदुरबार जिल्हा परिषदेची सर्वसाधारण सभा घेऊन आम्ही अधिकृतपणे मंजूर केलेल्या विकास कामांना थांबवण्यासाठी एकीकडे आमचे विरोधक न्यायालयात धाव घेतात आणि आज केवळ कोरम अभावी स्थायी समितीची सभा होऊ शकली नाही यावरून गळे काढतात.

 

यावरूनच आमच्या विरोधकांचा ढोंगीपणा किती आणि जनतेची निष्ठा किती हे उघड होत आहे. काहीही करून जनतेची दिशाभूल करण्याचा खोटारडेपणा करणाऱ्या अशा विरोधकांच्या प्रचाराला कोणीही बळी पडू नये; असे जाहीर आवाहन नंदुरबार जिल्हा परिषदेच्या अध्यक्षा डॉक्टर सुप्रिया गावित यांनी केले आहे.

 

सर्वसाधारण सभेत अधिकृतपणे संमत केलेल्या विकास कामांच्या विरोधात या विरोधकांनी न्यायालयात धाव घेतली तेव्हा न्यायालयानेच यांची ती निराधार याचिका खारीज करून फेटाळून लावलीय. तेव्हापासून यांची मानसिकता जास्त बिघडली आहे आणि त्यामुळेच आजच्या स्थायी समितीच्या तहकूब होण्याचे भांडवल करीत आहेत, असेही डॉक्टर सुप्रिया गावित यांनी म्हटले आहे.

 

दिनांक 11 सप्टेंबर 2024 रोजी नंदुरबार जिल्हा परिषदेची स्थायी समितीची सभा आयोजित करण्यात आली होती, परंतु कार्यालयीन कामाच्या अनुषंगाने नंदुरबार जिल्हा परिषद अध्यक्ष डॉक्टर सुप्रिया गावित यांना स्वतःला बाहेरगावी दौऱ्यावर जावे लागले. त्या व्यस्तते मुळे त्यांना स्वतःला नंदुरबार जिल्हा परिषद स्थायी समितीच्या बैठकीला उपस्थित राहता आले नाही.

 

सत्ताधारी गटातील काही सदस्यांना सुद्धा वैयक्तिक व अन्य कारणांनी स्थायी समितीच्या बैठकीला उपस्थित राहता आले नाही. परिणामी कोरम अभावी स्थायी समितीची सभा हकूब झाली. हे वास्तव तांत्रिक कारण सर्वांसमोर असताना विरोधकांनी मात्र याचा विपर्यास करून शेतकऱ्यांच्या प्रश्नावर गंभीर नाही तसेच सत्ताधारी गटात एकमत राहिलेले नाही, वगैरे असा चुकीचा प्रचार सुरू केला. या संदर्भाने अधिक माहिती देताना नंदुरबार जिल्हा परिषद अध्यक्ष डॉक्टर सुप्रिया गावित यांनी म्हटले आहे की, स्थायी समितीच्या बैठकीला उपस्थित राहू शकत नसल्याचे अधिकृत कळवून मगच ही बैठक तहकूब करण्यात आली आहे.

 

 

त्याच बरोबर नंदुरबार जिल्ह्यात पावसामुळे झालेल्या नुकसानी वर चर्चा करण्यासाठी दिनांक 20 सप्टेंबर 2024 रोजी देखील सभा आयोजित करण्यात आली आहे. वस्तुस्थिती माहित असतानाही जनतेमध्ये चुकीची माहिती प्रसारित करण्याचा जणू विरोधकांना आजार जडला असावा. सत्तापद मिळवायला आसुसलेल्या व्यक्ती वारंवार खोट्याचा आधार घेऊ लागतात आणि दुर्दैवाने तेच लक्षण आमच्या विरोधकांमध्ये दिसत आहे. हेच लोक जिल्हा परिषदेच्या सर्वसाधारण सभेत संमत केलेल्या विकास कामांच्या विरोधात कोर्टात गेले केस दाखल केली तेव्हा यांना जनतेचा कळवळा होता की स्वतःचे राजकारण साधायचे होते?

 

 

 

आज स्थायी समितीची सभा तांत्रिक कारणाने झालेली नाही म्हणून लगेचच जनतेच्या प्रश्नांवर बोलणारे आमचे हे विरोधक तद्दन ढोंगी वागत आहेत दुटप्पी वागत आहेत हे आजच्या प्रकरणातून पुन्हा एकदा उघड झाले. तरी लोकांनी अशा गोष्टीकडे दुर्लक्ष करावे. आमच्या सत्ताधारी गटातील सर्व सदस्य एकत्रच आहेत आणि राहतील, असाही विश्वास डॉक्टर सुप्रिया गावित यांनी व्यक्त केला.

बातमी शेअर करा
Previous Post

श्राॅफ हायस्कूलच्या अडीच हजार विद्यार्थ्यांद्वारे अथर्वशीर्षाच्या मंगल स्तोत्राचे गायन

Next Post

मांजरे येथील माजी सरपंचांसह शेकडो ग्रामस्थांच्या शिंदे शिवसेनेत प्रवेश

Next Post
मांजरे येथील माजी सरपंचांसह शेकडो ग्रामस्थांच्या शिंदे शिवसेनेत प्रवेश

मांजरे येथील माजी सरपंचांसह शेकडो ग्रामस्थांच्या शिंदे शिवसेनेत प्रवेश

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

पालिकेतर्फे महिला मेळावा; बचत गटांना धनादेश वितरणासह गुणवंतांचा सन्मान

पालिकेतर्फे महिला मेळावा; बचत गटांना धनादेश वितरणासह गुणवंतांचा सन्मान

March 10, 2026
विधी सेवा महाशिबिरातून नागरिकांच्या जीवनमानात बदल घडविण्याचा प्रयत्न : न्यायमूर्ती किशोर संत

विधी सेवा महाशिबिरातून नागरिकांच्या जीवनमानात बदल घडविण्याचा प्रयत्न : न्यायमूर्ती किशोर संत

March 10, 2026
डॉ. हिना गावित यांच्या हस्ते महिलांना भेट वस्तूंच वितरण

डॉ. हिना गावित यांच्या हस्ते महिलांना भेट वस्तूंच वितरण

March 10, 2026
माजी खा.डॉ. हिना गावित यांनी सिंहस्थ पर्वणी संदर्भात अधिकाऱ्यांकडून घेतला आढावा

माजी खा.डॉ. हिना गावित यांनी सिंहस्थ पर्वणी संदर्भात अधिकाऱ्यांकडून घेतला आढावा

March 10, 2026
भाजपातर्फे छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती साजरी

भाजपातर्फे छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती साजरी

March 7, 2026
डॉ.विक्रांत बाबा मित्र परिवारा मार्फत शिवजयंती उत्साहात साजरी

डॉ.विक्रांत बाबा मित्र परिवारा मार्फत शिवजयंती उत्साहात साजरी

March 7, 2026

Total Views

  • 4,142,612 hits

मुख्य संपादक

श्री. शांताराम पी. पाटील
8275590450

At.post.Umarde Khurde ta.dist Nandurbar
मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458

  • Home
  • Sample Page

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

कॉपी करू नका.
WhatsApp-Add