Public Mirror News
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
Public Mirror News
No Result
View All Result

मंत्री डॉ. विजयकुमार गावित आयोजित प्रकाशा आणि जयनगर येथील नोंदणी शिबिराचा 2 हजारहून अधिक ज्येष्ठांनी घेतला लाभ

team by team
September 11, 2024
in राजकीय
0
मंत्री डॉ. विजयकुमार गावित आयोजित प्रकाशा आणि जयनगर येथील नोंदणी शिबिराचा 2 हजारहून अधिक ज्येष्ठांनी घेतला लाभ

नंदुरबार l प्रतिनिधी

महाराष्ट्राचे आदिवासी विकास मंत्री नामदार डॉक्टर विजयकुमार गावित यांच्या संकल्पनेतून नंदुरबार विधानसभा क्षेत्रातील ज्येष्ठ नागरिकांना लाभ देता यावा.यासाठी शहादा तालुक्यातील प्रकाशा आणि जयनगर येथे दिनांक 10 सप्टेंबर 2024 रोजी घेण्यात आलेल्या नोंदणी शिबिरात शेकडोच्या संख्येने उपस्थित राहून वृद्ध नागरिकांनी नोंदणी केली. जवळपास 2000 हून अधिक ज्येष्ठ नागरिकांनी या नोंदणीचा लाभ घेतला.

 

सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभाग अंतर्गत मुख्यमंत्री वयोश्री योजना व मुख्यमंत्री तीर्थ दर्शन योजनेचे लाभ देण्यासाठी हे नोंदणी व मार्गदर्शन शिबिर आयोजित करण्यात आले. महाराष्ट्राचे आदिवासी विकास मंत्री नामदार डॉक्टर विजयकुमार गावित, नंदुरबार जिल्हा परिषदेच्या अध्यक्ष डॉक्टर सुप्रिया गावित आणि डॉक्टर हिना गावित यांच्या प्रमुख उपस्थितीत पार पडलेल्या या शिबिरात प्रकाशालगतच्या आणि जयनगर लगतच्या गावांमधील शेकडोच्या संख्येने जेष्ठ नागरिकांनी गर्दी केली.

 

आदिवासी विकास मंत्री नामदार डॉक्टर विजयकुमार गावित यांच्या प्रयत्नांमुळे इतक्या योजनांचा लाभ ग्रामीण भागातील प्रत्येकापर्यंत पोहोचतो यावर अनेक उपस्थित ग्रामस्थांनी समाधान आणि कौतुक करणाऱ्या प्रतिक्रिया व्यक्त केल्या. नंदुरबार जिल्हा परिषदेच्या सभापती हेमलता शितोळे, गावामध्ये जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष रामचंद्र पाटील, ज्येष्ठ नेते डॉक्टर कांतीलाल टाटीया, शशिकांत शितोळे यांच्यासह स्थानिक जिल्हा परिषद सदस्य पंचायत समिती सदस्य आणि ग्रामीण कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

 

मंत्री नामदार डॉक्टर विजयकुमार गावित यांनी प्रमुख भाषणात सांगितले की शेतकरी कामगार महिला आणि बेरोजगार युवक असा कोणताही घटक राहिलेला नाही ज्यांच्यासाठी महायुती सरकारने योजना दिलेल्या नाही. आता विद्यमान स्थितीत सुद्धा शेतात चालणाऱ्या वीज पंपाचे बिल माफ करण्याचा महाराष्ट्र शासनाने निर्णय घेतला आणि त्यामुळे नंदुरबार जिल्ह्यातील 45 हजार 565 शेतकऱ्यांना 684 कोटी 98 लाख रुपयांचे थकीत वीज बिल माफ करण्यात आले आहे. त्याचबरोबर नंदुरबार विधानसभा मतदारसंघातील शेतकऱ्यांना देखील थकीत वीज बिल माफीचा लाभ व्हावा आणि त्यांची कर्जातून मुक्ती व्हावी म्हणून आपण प्रयत्न केल्याने नंदुरबार विधानसभा क्षेत्रातील सुमारे 12000 हून अधिक शेतकऱ्यांना सुमारे 225 कोटी रुपयांचे वीज बिल माफ करून मिळाले आहे. नंदुरबार तालुक्यातील शेती विकासाच्या दृष्टीने हे सर्वात मोठे पाऊल आहे. नंदुरबार विधानसभा क्षेत्रातील सुमारे एक लाख महिलांना मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेचा लाभ आपण मिळवून दिला. नंदुरबार मतदार संघातल्या जास्तीत जास्त वयोवृद्ध लोकांना मुख्यमंत्री तीर्थ दर्शन योजनेचा आणि वयोश्री योजनेचा लाभ देता यावा म्हणून आपण भव्य नोंदणी शिबिर घेतले. वैयक्तिक आणि सामूहिक लाभ देणारे असे काम आपण यापुढेही करत राहू असे मी अभिवचन देतो, असेही मंत्री गावित म्हणाले.

 

नंदुरबार जिल्हा परिषद अध्यक्ष डॉक्टर सुप्रिया गावित आणि संसद रत्न डॉक्टर हिना गावित यांनी देखील विविध योजनांच्या माध्यमातून केलेल्या विकास कामांचा आढावा मांडला.

बातमी शेअर करा
Previous Post

आरक्षण काढणे कुणालाही शक्य नाही; सर्वांचे लाभ शेवटपर्यंत अबाधित राहतील : मंत्री डॉ विजयकुमार गावित

Next Post

गहाळ झालेले पर्स दामिनी पथकातील पोलीसांनी काही वेळातच महिलेला केले परत

Next Post
गहाळ झालेले पर्स दामिनी पथकातील पोलीसांनी काही वेळातच महिलेला केले परत

गहाळ झालेले पर्स दामिनी पथकातील पोलीसांनी काही वेळातच महिलेला केले परत

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

पालिकेतर्फे महिला मेळावा; बचत गटांना धनादेश वितरणासह गुणवंतांचा सन्मान

पालिकेतर्फे महिला मेळावा; बचत गटांना धनादेश वितरणासह गुणवंतांचा सन्मान

March 10, 2026
विधी सेवा महाशिबिरातून नागरिकांच्या जीवनमानात बदल घडविण्याचा प्रयत्न : न्यायमूर्ती किशोर संत

विधी सेवा महाशिबिरातून नागरिकांच्या जीवनमानात बदल घडविण्याचा प्रयत्न : न्यायमूर्ती किशोर संत

March 10, 2026
डॉ. हिना गावित यांच्या हस्ते महिलांना भेट वस्तूंच वितरण

डॉ. हिना गावित यांच्या हस्ते महिलांना भेट वस्तूंच वितरण

March 10, 2026
माजी खा.डॉ. हिना गावित यांनी सिंहस्थ पर्वणी संदर्भात अधिकाऱ्यांकडून घेतला आढावा

माजी खा.डॉ. हिना गावित यांनी सिंहस्थ पर्वणी संदर्भात अधिकाऱ्यांकडून घेतला आढावा

March 10, 2026
भाजपातर्फे छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती साजरी

भाजपातर्फे छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती साजरी

March 7, 2026
डॉ.विक्रांत बाबा मित्र परिवारा मार्फत शिवजयंती उत्साहात साजरी

डॉ.विक्रांत बाबा मित्र परिवारा मार्फत शिवजयंती उत्साहात साजरी

March 7, 2026

Total Views

  • 4,142,612 hits

मुख्य संपादक

श्री. शांताराम पी. पाटील
8275590450

At.post.Umarde Khurde ta.dist Nandurbar
मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458

  • Home
  • Sample Page

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

कॉपी करू नका.
WhatsApp-Add