नंदुरबार l प्रतिनिधी-
हिंदु सेवा सहाय्य समिती आणि श्री कांतालक्ष्मी शहा नेत्र रुग्णालय यांच्या संयुक्त विद्यमाने गणेशोत्सव निमित्ताने आयोजित मोफत डोळे तपासणी शिबिरात १०० पेक्षा अधिक रुग्णांची तपासणी करण्यात आली. शिबिरात मोतीबिंदू शस्त्रक्रिया होऊ शकते असे बारा रुग्ण तपासणीत आढळून आले.
शिबिराचे उद्घाटन उपविभागीय पोलीस अधिकारी संजय महाजन यांनी नारळ वाढवून केले, प्रमुख पाहुणे म्हणून नेत्रतज्ञ डॉ. अर्जुन मालवे, हिंदु सेवा सहाय्य समितीचे नरेंद्र पाटील उपस्थित होते.
शिबिराची सुरुवात श्री गणरायांची आरती आणि प्रार्थनेने करण्यात आली. उपविभागीय पोलीस अधिकारी संजय महाजन यांनी नारळ वाढवून शिबिराचा प्रारंभ केला. प्रमुख अतिथी संजय महाजन, डॉ अर्जुन मालवे यांचा सत्कार अनुक्रमे पंकज मुसळे, राजू चौधरी यांनी केला.
उपविभागीय पोलीस अधिकारी संजय महाजन यांनी मनोगत व्यक्त करतांना सांगितले की, उत्सव साजरा करतांना तो शास्त्रानुसारच साजरा केला गेला पाहिजे, शास्त्रानुसार सण-उत्सव साजरे केले तरच त्यातून खरा आनंद मिळतो. हिंदू सेवा सहाय्य समिती गणेशोत्सव मंडळ आदर्श गणेश उत्सव साजरा करून इतरांमध्ये आदर्श निर्माण करत आहे, सर्वांनी बदल हा आपल्या स्वतः पासून करून शास्रोक्त पद्धतीने सण उत्सव साजरे करावे असे आवाहन केले.
या मोफत डोळे तपासणी शिबिरात १०० पेक्षा अधिक रुग्णांची तपासणी श्री कांतालक्ष्मी नेत्र रुग्णालयाचे नेत्रतज्ञ डॉ अर्जुन मालवे यांनी केले. या रुग्णांपैकी बारा रुग्ण मोतीबिंदू शस्त्रक्रियेसाठी पात्र ठरले आहेत. यापैकी पात्र रुग्णांचे मोफत मोतीबिंदू शस्त्रक्रिया करण्यात येणार आहे. या शिबिराची प्रस्तावना हिंदू सेवा सहाय्य समितीचे नरेंद्र पाटील यांनी सूत्रसंचालन राजू चौधरी तर आभार प्रदर्शन सुयोग सूर्यवंशी यांनी व्यक्त केले. शिबीर यशस्वी करण्यासाठी हिंदु सेवा समितिचा धर्मसेवकांनी परिश्रम घेतले.