Public Mirror News
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
Public Mirror News
No Result
View All Result

मनवाणीच्या पोळा उत्सवावर यंदा ड्रोन कॅमेऱ्याचा वॉच

team by team
September 2, 2024
in क्राईम
0
मनवाणीच्या पोळा उत्सवावर यंदा ड्रोन कॅमेऱ्याचा वॉच

मोलगी l प्रतिनिधी

सर्जा राजाबद्दल कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी दरवर्षी मनवाणी येथे साजरा होणारा बैलपोळा हा सण अवघ्या सातपुड्याचा उत्सव आहे. या उत्सवाच्या पार्श्वभूमीवर पोलीस प्रशासन व ग्रामस्थांची संयुक्त बैठक मनवाणी येथे घेण्यात आली. या बैठकीत उत्सवातील संभाव्य अनुचित प्रकारांवर वचक ठेवण्यासाठी यंदा ड्रोन कॅमेऱ्याचा वापर करावा अशा सूचना‌ पोलीस प्रशासनाने दिल्या आहेत. त्यामुळे यंदा हा उत्सव पूर्णपणे निगराणीतच राहण्याची शक्यता आहे.

खरीप हंगामात शेतात राब राबणाऱ्या बैलांची भूमिका आटोक्यात आली, तशी शेतकऱ्यांमध्ये बैलपोळ्याची लगबगही सुरु झाली. या परंपरेतच यंदाचाही बैलपोळा साजरा होत आहे. या उत्सवासाठी मनवाणीत ग्रामस्थ व पोलीस प्रशासनाची संयुक्त बैठक झाली. या बैठकीत पोलीस निरीक्षक राजेंद्र जगताप, पोलीस पाटील बु .नायलीबाई वळवी, पोळा समितीचे अध्यक्ष शंकर राहसे, गुलाबसिंग राहसे, विजा राहसे, पोलीस पाटील खु. रामा वळवी, लोब्या राहसे, उपसरपंच सुमित तडवी, आपसिंग पाडवी, किर्ता तडवी , रायसिंग वळवी, रायसिंग राहसे, मानसिंग राहसे गिरिश वळवी, पोलीस हवालदार पुष्पेंद्र कोळी, स्वप्नील गोसावी, पो.ना.दिपक वारुळे, योगेश निकम, पो.कॉ. अशोक पाडवी यांच्यासह मंदिर ट्रस्टचे पदाधिकारी व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते. यावेळी गावात विविध समित्या स्थापन करण्याचा निर्णय ग्रामस्थांनी घेतला.

 

 

◾ *कायदा व सुव्यवस्थेचा अबाधित ठेवा* :- पो.नि. जगताप
बैठकीत पोलीस निरीक्षक जगताप यांनी गाव पातळीवर पोळा उत्सव समिती स्थापन करावे, पोळ्यासाठी स्वयंसेवक नेमून त्यांची यादी पोलीस प्रशासनाकडे सादर करावी, परिसरात काही अनुचित प्रकार घडू नये यासाठी समितीतर्फे ड्रोन कॅमेरा लावण्यात यावे अशी अपेक्षा व्यक्त केली. तर गावात कुठलेही अवैध धंदे सुरु राहणार नाही. तसेच गावकऱ्यांना सदर ठिकाणी फक्त 4 बँड लावण्याची परवानगी आहे. त्या व्यतिरिक्त जास्त बँडला परवानगी नाही. अशा प्रकारच्या सूचना व मार्गदर्शन पोलीस निरीक्षक जगताप यांनी दिल्या. शिवाय उत्सवात शांतता ठेवत ग्रामस्थांनी कायदा व सुव्यवस्थेचे पालन करावे असे आवाहन देखील त्यांनी केले.

बातमी शेअर करा
Previous Post

चिखली पुनर्वसनच्या लहान मुलांना जखमी करणारा बिबट्या अखेर जेरबंद

Next Post

लोय आश्रम शाळेला डॉ. विजयकुमार गावित यांनी दिली भेट

Next Post
लोय आश्रम शाळेला डॉ. विजयकुमार गावित यांनी दिली भेट

लोय आश्रम शाळेला डॉ. विजयकुमार गावित यांनी दिली भेट

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

नंदुरबार तालुक्यात गारपीटमुळे ५ गावे बाधित, ३४४ शेतकऱ्यांच्या पिकांचे नुकसान

अवकाळी ग्रस्त शेतांचे तातडीने पंचनामे करा; भाजपा तालुका अध्यक्ष दीपक पाटील यांचे अधिकाऱ्यांना निवेदन

April 3, 2026
हिंदू जनजागृती समितीतर्फे हनुमंताच्या गदेचे पूजन

हिंदू जनजागृती समितीतर्फे हनुमंताच्या गदेचे पूजन

April 3, 2026
अवकाळी पाऊस व गारपीट; नंदुरबारात शेतीला मोठा फटका

अवकाळी पाऊस व गारपीट; नंदुरबारात शेतीला मोठा फटका

April 3, 2026
माओवादी बंडखोरीविरोधात ऐतिहासिक यश

माओवादी बंडखोरीविरोधात ऐतिहासिक यश

April 3, 2026
१८५ किमी दिंडी प्रवासाची भावपूर्ण सांगता; नर्मदा तीरावर भक्तीचा महासागर उसळला

१८५ किमी दिंडी प्रवासाची भावपूर्ण सांगता; नर्मदा तीरावर भक्तीचा महासागर उसळला

April 2, 2026
अल्पवयीन मुलीवर लैंगिक अत्याचार; आरोपीला 10 वर्षे सक्तमजुरीची शिक्षा

पोक्सो प्रकरणात आरोपीला २० वर्षे सश्रम कारावास,अल्पवयीन बालिकेवर अत्याचार प्रकरण

April 2, 2026

Total Views

  • 4,142,612 hits

मुख्य संपादक

श्री. शांताराम पी. पाटील
8275590450

At.post.Umarde Khurde ta.dist Nandurbar
मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458

  • Home
  • Sample Page

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

कॉपी करू नका.
WhatsApp-Add