Public Mirror News
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
Public Mirror News
No Result
View All Result

उंबिलापाडा येथे वीज पडून १५ वर्षीय युवकाचा मृत्यू तर चुलत बहीण जखमी

team by team
October 12, 2021
in क्राईम
0
उंबिलापाडा येथे वीज पडून १५ वर्षीय युवकाचा मृत्यू तर चुलत बहीण जखमी
अक्कलकुवा l प्रतिनिधी

अक्कलकुवा तालुक्यातील उंबिलापाडा येथे शेतात काम करीत असताना  वीज पडून १५ वर्षीय युवकाचा मृत्यू झाला . तर चुलत बहीण जखमी झाल्याची घटना सोमवारी दुपारी  घडली . याप्रकरणी अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे .

याबाबत अधिक माहिती अशी की, अक्कलकुवा तालुक्यातील येथील भगदरीचा संजयसिंग करमसिंग वळवी रा.उंबिलापाडा ता.अक्कलकुवा  ( वय १५ ) हा युवक आपल्या आई आणि चुलत बहिणीसोबत शेतात मका काढणीचे काम करीत होता . त्यावेळी दुपारी १ ते २ वाजेच्या दरम्यान विजांच्या कडकडाटात मुसळधार पावसाला सुरुवात झाली . त्यामुळे पाऊस आणि जागेवरच विजेपासून संरक्षण करण्यासाठी संजयसिंग आणि चुलत बहीण चंदना हे झाडाच्या आडोशाला उभे राहिलेत . त्याच वेळी झाडाजवळ अचानक वीज पडली . त्या विजेचा जोरदार झटक्याने संजयसिंग कोसळून बेशुद्ध झाला . तर चंदना ही जखमी झाली . विजेचा जोराचा आवाज आल्याने आजूबाजूच्या नागरिकांनी त्याला तत्काळ बेशुद्धावस्थेत ग्रामीण रुग्णालय मोलगी येथे उपचारासाठी येत होते . दरम्यान रस्त्यातच संजयसिंग करमसिंग वळवीचे दुर्दैवी निधन झाले . दवाखान्यात नेल्यावर वैद्यकीय अधिकाऱ्यांनी त्यास मृत घोषित केले तर जखमी असलेल्या चंदना भिका वळवी या चुलत बहिणीवर मोलगी ग्रामीण रुग्णालयात उपचार करण्यात आले . चंदना हिच्या डोक्याला झटका बसला असल्याने तिला पुढील उपचारासाठी नंदुरबार येथे हलवण्यात येत होते . करमसिंग वळवी यांनी दिलेल्या माहितीवरून मोलगी पोलिस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे . तपास पो.हे. काँ धनराज जाधव करीत आहेत .
बातमी शेअर करा
Previous Post

वावडी प्राथमिक आरोग्य केंद्रात नवीन अत्याधुनिक रुग्णवाहीचे जि.प सदस्य अजित नाईक यांच्या हस्ते लोकार्पण

Next Post

सिलिंगपूर बस सुरू करण्याच्या मागणीसाठी गावकर्‍यांचे निवेदन

Next Post
सिलिंगपूर बस सुरू करण्याच्या मागणीसाठी गावकर्‍यांचे निवेदन

सिलिंगपूर बस सुरू करण्याच्या मागणीसाठी गावकर्‍यांचे निवेदन

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

आ. डॉ. विजयकुमार गावित यांच्या प्रकृतीत लवकर सुधारणा व्हावी यासाठी डॉ.हिना गावित यांची शनिदेवाला साकडे

आ. डॉ. विजयकुमार गावित यांच्या प्रकृतीत लवकर सुधारणा व्हावी यासाठी डॉ.हिना गावित यांची शनिदेवाला साकडे

March 19, 2026
तब्बल तीन महिन्यांनी नंदुरबार जिल्ह्याला मिळाले पालकमंत्री, हसन मुश्रीफ यांची नियुक्ती

तब्बल तीन महिन्यांनी नंदुरबार जिल्ह्याला मिळाले पालकमंत्री, हसन मुश्रीफ यांची नियुक्ती

March 19, 2026
नवजात मुलीला रुग्णालयातच सोडून आई फरार; पोलिसांकडून शोधमोहीम तीव्र

नवजात मुलीला रुग्णालयातच सोडून आई फरार; पोलिसांकडून शोधमोहीम तीव्र

March 19, 2026
आगामी सण-उत्सवांच्या पार्श्वभूमीवर जिल्हास्तरीय शांतता समितीची बैठक

आगामी सण-उत्सवांच्या पार्श्वभूमीवर जिल्हास्तरीय शांतता समितीची बैठक

March 18, 2026
दिव्यांग लाभार्थ्यांच्या अनुदानात वाढ, 20 मार्चपर्यंत कागदपत्रे सादर करावे

दिव्यांग लाभार्थ्यांच्या अनुदानात वाढ, 20 मार्चपर्यंत कागदपत्रे सादर करावे

March 18, 2026
पाणी पुरवठा योजनेच्या शाश्वततेसाठी ग्रामस्थांमध्ये स्वमालकीची भावना गरजेची : आ.आमश्या पाडवी

पाणी पुरवठा योजनेच्या शाश्वततेसाठी ग्रामस्थांमध्ये स्वमालकीची भावना गरजेची : आ.आमश्या पाडवी

March 18, 2026

Total Views

  • 4,142,612 hits

मुख्य संपादक

श्री. शांताराम पी. पाटील
8275590450

At.post.Umarde Khurde ta.dist Nandurbar
मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458

  • Home
  • Sample Page

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

कॉपी करू नका.
WhatsApp-Add