नंदुरबार l प्रतिनिधी-
का.वि.प्र संस्था भालेर संचलित श्रीमती क.पू.पाटील माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयात भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आदर्श शाळा अभियानांतर्गत मुख्यमंत्री माझी शाळा सुंदर शाळा टप्पा-2 अनुसरून शालेय विद्यार्थ्यांची आरोग्य तपासणी करण्यात आली.
आर.बी.एच.के. च्या आरोग्य अधिकारी डॉ.सुजाता दहिवलकर,डॉ. सुशीलकुमार मराठे यांनी पथकासह विद्यार्थ्यांची प्राथमिक आरोग्य तपासणी करून औषधोपचार केला. या आरोग्य तपासणी शिबिरात विद्यालयातील एकूण ७९९ पैकी ७३७ विद्यार्थ्यांची आरोग्य तपासणी करण्यात आली पैकी ५९ विद्यार्थ्यांमध्ये किरकोळ दोष आढळले त्यांना औषध उपचार करण्यात आला .
१२ विद्यार्थ्यांना जिल्हा रुग्णालय नंदुरबार येथे रेफर करण्यात आले. आरोग्य तपासणी प्रसंगी संस्थेचे संस्थापक अध्यक्ष भास्करराव हिरामण पाटील, कार्याध्यक्ष विजय पाटील ,प्राचार्य सौ विद्या चव्हाण, पर्यवेक्षक ए व्ही. कुवर उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रशांत धनगर यांनी केले.आरोग्य तपासणी यशस्वीतेसाठी सर्व प्राध्यापक, प्राध्यापिका, शिक्षक, शिक्षिका, शिक्षकेतर कर्मचारी वृंद यांनी परिश्रम घेतले.