नंदुरबार l प्रतिनिधी-
रोटरी क्लब ऑफ नंदुरबार आणि व्ही. एस. जी. जी. एम. यांच्या संयुक्त विद्यमाने ब्रेस्ट कॅन्सर व गर्भाशय कॅन्सर तपासणी शिबिर आयोजित करण्यात आले होते. शिबिरात एकूण ९० स्त्रियांची चाचणी करण्यात आली.
शिबिराचे उद्घाटन माजी आ.चंद्रकांत रघुवंशी यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी नगरसेवक यशवर्धन रघुवंशी परवेज खान पठाण, रमाकांत पाटील, डॉ. विजय पटेल, शीतल पटेल, असिस्टंट गव्हर्नर डॉ. निर्मल गुजराथी, रोटरी क्लब ऑङ्ग नंदुरबारचे अध्यक्ष आर्किटेक्ट नीरज देशपांडे, सचिव डॉ. जयंत देशपांडे व्यासपीठावर उपस्थित होते.
अशा प्रकारचे मोङ्गत तपासणी शिबिर नंदुरबार जिल्ह्यात आणि शहरात प्रथमच घेण्यात आले सर्व स्तरातील ३५ ते ६५ वयोगटातील महिलांसाठी हे शिबीर अत्यंत उपयुक्त असून कर्करोगासारख्या व्याधी प्राथमिक स्थितीत निदान झाल्यास अत्यंत चांगल्या पद्धतीने त्यातून बाहेर पडता येते आणि कोणीही अशा निदान चाचणीसाठी घाबरून न जाता स्वयंस्ङ्गूर्तीने पुढे यावे असे मार्गदर्शन माजी आ.चंद्रकांत रघुवंशी यांनी केले.
मॅमोग्राङ्गी व्हॅन रोटरी क्लब ऑङ्ग अमरावती मिड टाउन यांच्यातर्ङ्गे उपलब्ध करण्यात आली होती. सदर शिबिर नंतावीसच्या शिक्षणशास्त्र महाविद्यालयात घेण्यात आले होते. शिबिराच्या यशस्वितेसाठी रोटरी क्लब ऑङ्ग नंदुरबार आणि विविध शहर व ग्राम लेवा पाटीदार ग्लोबल गुजर मंडळ च्या सदस्यांनी मेहनत घेतली. प्रवीण पाटील, शरद पटेल, महेंद्र पाटील, डॉ. योगेश पटेल, प्रशांत पाटील, आर्किटेक्ट दिनेश वाडीले, डॉ. रोहन शाह, डॉ. रोशन भंडारी, डॉ. महेंद्र पटेल, हिरालाल महाजन, अनिल अग्रवाल, प्रा. डॉ. राजेंद्र कासार, ऍड. नीलेश देसाई, निता देसाई, प्रकाश बेंद्रे, रणजीत राजपूत, प्रा. डॉ. नितेश चौधरी, प्रा. डॉ. मुकेश रघुवंशी उपस्थित होते. वैद्य नेहा गुजराथी यांनी सूत्रसंचालन केले तर आभार प्रदर्शन प्रवीणकुमार पाटील यांनी केले.








