Public Mirror News
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
Public Mirror News
No Result
View All Result

संस्कृती आणि कल्याणकारी योजनांच्या जागरासाठी जागतिक आदिवासी दिनाचा उत्सव नंदुरबारमध्ये : डॉ. विजयकुमार गावित

team by team
August 9, 2024
in राजकीय
0
संस्कृती आणि कल्याणकारी योजनांच्या जागरासाठी जागतिक आदिवासी दिनाचा उत्सव नंदुरबारमध्ये : डॉ. विजयकुमार गावित

 

नंदुरबार l प्रतिनिधी-
आदिवासी समुदायाचे सांस्कृतिक वेगळेपण, मानवतेबद्दल असलेली असीम श्रद्धा, निसर्गाच्या संतुलनावर असलेले प्रेम आणि उत्त्युच्च प्रामाणिक, निखळ संस्कृती, परंपरांच्या गुणगौरवासोबत शासनामार्फत आदिवासी बांधवांसाठी राबवल्या जाणाऱ्या कल्याणकारी योजनांच्या जागरासाठी जागतिक आदिवासी दिनाचा कार्यक्रम नंदुरबारमध्ये आयोजित करण्यात येत असल्याचे प्रतिपादन राज्याचे आदिवासी विकास मंत्री डॉ. विजयकुमार गावित यांनी केले आहे.

 

ते आज जागतिक आदिवासी दिनाच्या निमित्ताने आयोजित पारंपारिक शोभा यात्रेनंतर शहरातील शिवाजी नाट्यमंदिर येथे आयोजित कार्यक्रमात बोलत होते. या कार्यक्रमास जिल्हा परिषदेच्या अध्यक्षा डॉ. सुप्रिया गावित, माजी खासदार डॉ. हिना गावित, आदिवासी विकास प्रकल्प अधिकारी नतीशा माथूर (तळोदा), चंद्रकांत पवार (नंदुरबार) तसेच राज्यभरातून, जिल्ह्यातून आलेल्या विविध नृत्य पथकांसह अधिकारी व पदाधिकाऱ्यांनी सहभाग घेतला होता.

 

यावेळी बोलताना आदिवासी विकास मंत्री डॉ. गावित म्हणाले, जागतिक आदिवासी दिवस जगातिल समग्र आदिवासी बांधवांसाठी असामितेचा व आत्मसन्मानाचा दिवस असतो. महाराष्ट्रात हा दिवस राज्यातील वेगवेगळ्या आदिवासी बहुल जिल्ह्यात आयोजित केला जातो. यापूर्वी तो नागपूर, नाशिक, पालघर येथे आयोजित करण्यात आला होता. यंदा त्याच्या आयोजनाचे भाग्य नंदुरबार जिल्ह्याला लाभले आहे.

 

महाराष्ट्रात 47 आदिवासी उपजाती आहेत. आपल्या बोली, पेहराव वेगवेगळे असले तरी आदिवासी बांधव म्हणून आपण एक आहोत. एक रहायला हवे. दऱ्याखोऱ्यात राहणारा आदिवासी बांधव व त्याच्या प्रथा, पंरपरा कुणालाही अवगत नव्हत्या परंतु आदिवासी विकास विभागाचा मंत्री या नात्याने मी क्रिडा स्पर्धा, जागतिक आदिवासी दिवस, जनजाती दिवस भव्य-दिव्य स्वरूपात आयोजित करून राज्याला या गौरवशाली परंपरांची ओळख करून देण्याचा प्रयत्न सुरू केला आहे, कारण आदिवासी बांधवांच्या कला व कौशल्याचे ब्रॅंडिंग दुसरेच करताना दिसत होते. आज आमचा आदिवासी बांधव संवत:च्या कलेचे स्वत:च ब्रँडिंग करेल. महाराष्ट्र शासनाच्या माध्यमातून आदिवासी बांधवांच्या उत्थानासाठी विविध योजना राबवल्या जात आहेत.

 

या जागतिक आदिवासी दिनाच्या निमित्ताने योजनांचा प्रचार, प्रसार व्हावा व आदिवासी संस्कृती आणि मुल्यांचे संवर्धन व्हावे, यासाठी काल, आज आणि उद्या विविध कार्यक्रमांचे आयोजन येथे करण्यात आले आहे. त्याचबरोबर आदिवासी कलेला चालना मिळावी आणि कलेच्या माध्यमातून सृजनशील कल्पनांचे सादरीकरण व्हावे यासाठी विद्यार्थ्यांसाठी व खुल्या स्वरूपातील रांगोळी स्पर्धा, आदिवासी नृत्य स्पर्धांचे आयोजन करण्यात आले आहे. ग्रामसमुह, बचत गट, वन-धन केंद्र आणि इतर आदिवासी बांधवांच्या गटांनी निर्माण केलेल्या उत्पादनांचे प्रदर्शन आणि विक्रीची दालने पाहता येणार आहेत, असेही यावेळी मंत्री डॉ. गावित यांनी सांगितले.

आज होणार मुख्य कार्यक्रम
आज ( 9 ऑगस्ट) रोजी जागतिक आदिवासी दिनाचा मुख्य कार्यक्रम तालुका क्रिडा संकुलात होणार आहे. यावेळी क्रांतिकारी आणि महापुरुषांना अभिवादन करण्याकरिता सभेचे आयोजन केलेले आहे.

 

 

 

यावेळी जिल्ह्याचे पालकमंत्री अनिल पाटील, आदिवासी विकास मंत्री डॉ. विजयकुमार गावित, अन्न व औषध प्रशासन मंत्री धर्मरावबाबा आत्राम, विधानसभेचे उपसभापती नरहरी झिरवाळ, राज्यस्तरीय आदिवासी विकास आढावा समिती अध्यक्ष विवेक पंडित, जिल्हा परिषद अध्यक्षा सुप्रिया गावित, खासदार अॅड. गोवाल पाडवी, विधानपरिषद सदस्य अमरिशभाई पटेल, किशोर दराडे, आमशा पाडवी, सत्यजित तांबे, विधानसभा सदस्य अॅड. के सी. पाडवी, शिरीष नाईक, राजेश पाडवी, माजी खासदार हिना गावीत, असे अनेक मान्यवर उपस्थित राहणार आहेत.

बातमी शेअर करा
Previous Post

रोटरी क्लब ऑफ नंदुरबारच्या अध्यक्षपदी मनोज गायकवाड तर सचिव म्हणून फादर टेनी परक्का यांची निवड

Next Post

मंत्री डॉ. विजयकुमार गावित यांच्या नेतृत्वात पार पडली भव्य आदिवासी गौरव रॅली; तारपा वादनाचा मंत्री डॉ. गावित यांनी घेतला आनंद

Next Post
मंत्री डॉ. विजयकुमार गावित यांच्या नेतृत्वात पार पडली भव्य आदिवासी गौरव रॅली; तारपा वादनाचा मंत्री डॉ. गावित यांनी घेतला आनंद

मंत्री डॉ. विजयकुमार गावित यांच्या नेतृत्वात पार पडली भव्य आदिवासी गौरव रॅली; तारपा वादनाचा मंत्री डॉ. गावित यांनी घेतला आनंद

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

पालिकेतर्फे महिला मेळावा; बचत गटांना धनादेश वितरणासह गुणवंतांचा सन्मान

पालिकेतर्फे महिला मेळावा; बचत गटांना धनादेश वितरणासह गुणवंतांचा सन्मान

March 10, 2026
विधी सेवा महाशिबिरातून नागरिकांच्या जीवनमानात बदल घडविण्याचा प्रयत्न : न्यायमूर्ती किशोर संत

विधी सेवा महाशिबिरातून नागरिकांच्या जीवनमानात बदल घडविण्याचा प्रयत्न : न्यायमूर्ती किशोर संत

March 10, 2026
डॉ. हिना गावित यांच्या हस्ते महिलांना भेट वस्तूंच वितरण

डॉ. हिना गावित यांच्या हस्ते महिलांना भेट वस्तूंच वितरण

March 10, 2026
माजी खा.डॉ. हिना गावित यांनी सिंहस्थ पर्वणी संदर्भात अधिकाऱ्यांकडून घेतला आढावा

माजी खा.डॉ. हिना गावित यांनी सिंहस्थ पर्वणी संदर्भात अधिकाऱ्यांकडून घेतला आढावा

March 10, 2026
भाजपातर्फे छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती साजरी

भाजपातर्फे छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती साजरी

March 7, 2026
डॉ.विक्रांत बाबा मित्र परिवारा मार्फत शिवजयंती उत्साहात साजरी

डॉ.विक्रांत बाबा मित्र परिवारा मार्फत शिवजयंती उत्साहात साजरी

March 7, 2026

Total Views

  • 4,142,612 hits

मुख्य संपादक

श्री. शांताराम पी. पाटील
8275590450

At.post.Umarde Khurde ta.dist Nandurbar
मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458

  • Home
  • Sample Page

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

कॉपी करू नका.
WhatsApp-Add