Public Mirror News
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
Public Mirror News
No Result
View All Result

रजाळेेच्या विद्यार्थ्यांसाठी एक स्वतंत्र बसची मागणी

team by team
August 8, 2024
in सामाजिक
0
रजाळेेच्या विद्यार्थ्यांसाठी एक स्वतंत्र बसची मागणी

 

नंदुरबार l प्रतिनिधी

तालुक्यातील रजाळे येथील विद्यार्थ्यांना वेळेवर एसटी बस येत नसल्याने शाळेत व घरी येण्यासाठी मोठी कसरत करावी लागत आहे. हे दैनंदिनचे झाले आहे. मंगळवारी तर कहर झाला. विद्यार्थी व विद्यार्थींनी चक्क रात्री 8 ते 8.30 वाजेला घरी पोहचल्याने पालकांमध्ये एसटी प्रशासनाच्या भोंगळ कारभारावर तीव्र संताप व्यक्त करण्यात आला आहे. या गंभीर बाबीचे ग्रामस्थ, पालक व ग्रामपंचायतीने दखल घेत संबंधित आगार व्यवस्थापकांची भेट घेऊन झालेल्या घटनेची माहिती दिली. तसेच निवेदन देवून रजाळेेच्या विद्यार्थ्यांसाठी एक स्वतंत्र बसची मागणी करण्यात आली आहे. बस लागत नसल्याने विद्यार्थीनींना बसस्थानकातच अश्रु अनावर झाले.

 

याबाबत निवेदनात म्हटले आहे, की तालुक्यातील रजाळे गावातील शेकडोच्या संख्येने विद्यार्थी शिक्षणासाठी नंदुरबार येथील विविध शाळा-महाविद्यालयांमध्ये शिक्षणासाठी येजा करतात. मात्र एसटी बस वेळेवर मिळत नसल्याने अनेकदा खासगी वाहनाने शाळेत जाण्यासाठी आर्थिक भुर्दंड सहन करून जावे लागत आहे. तर बर्‍यादचा कोणतेच वाहन मिळत नसल्याने घरीच थांबावे लागत आहे. तसेच सायंकाळी 5 वाजेनंतर शाळा सुटल्यावर 5.30 वाजेला वेळनुसार बस लावण्यात यावी, बर्‍याचदा बसस्थानकात वेळेवर बस लागत नसल्याने विद्यार्थ्यांना दररोज घरी येण्यासाठी उशिर लागत आहे. तर दि.6 ऑगस्ट रोजी बसस्थानकातून सायंकाळी 7.30 वाजेला बस रवाना करण्यात आल्यानंतर रात्री 8 ते 8.30 वाजेला विद्यार्थी-विद्यार्थीनी घरी पोहचल्याने पालकांमध्ये तीव्र नाराजी व्यक्त करण्यात आली आहे. दि.7 ऑगस्ट रोजी आगार प्रमुख संदिप निकम यांना निवेदन देण्यात आले. निवेदनावर सरपंच राजु मराठे, भटु मराठे, हरबनसिंग गिरासे, वासुदेव गिरासे, ज्ञानेश्वर मराठे, महेंद्र गिरासे, विशाल मराठे, मुकेश मराठे, राकेश पांगारे व हिरालाल मराठे आदी निवेदन देतेवेळी उपस्थित होते.

 

नंदुरबार येथील बसस्थानकात दि.6 ऑगस्ट रोजी दैनंदिनची जाणारी बस वेळेत लागत नसल्याने विद्यार्थी-विद्यार्थीनी आगारात उशिर होत असल्याने संबंधितांना विनंती करीत होते. मात्र विद्यार्थ्यांना वेगळेच उत्तर मिळाले. बस लागणार नाही असे सांगितल्यानंतर विद्यार्थीनींना अश्रू अनावर झाले. यादरम्यान एकलव्य शाळेच्या वर्गशिक्षकांना ही बाब सांगितल्यानंतर शिक्षक नंदुरबार बसस्थानकात आल्यावर त्यांनी विणवण्या करून रजाळे व पुढे जाणार्‍या विद्यार्थ्यांसाठी बस देण्यात आली.

 

बस व्यवस्थापकांनी दिले आश्वासन
नंदुरबार बस आगाराचे व्यवस्थापक संदिप निकम यांनी उपस्थित ग्रामस्थांना सांगितले की, रजाळे गावासाठी वेळेवर बस सोडण्यात येईल. बस 5.30 वाजेला लावण्यात येते परंतु काही विद्यार्थी राहून जात असल्याने अनेकदा तीदेखील तक्रार येत होती. आता ग्रामस्थांच्या मागणीवरून वेळेत बस सोडण्यात येईल, असे आश्वासन दिले आहे.

बातमी शेअर करा
Previous Post

तोरणामाळ येथे पाय घासरून सीताखाईत २१ वर्षीय तरुणाचा मृत्यू

Next Post

रोटरी क्लब ऑफ नंदुरबारच्या अध्यक्षपदी मनोज गायकवाड तर सचिव म्हणून फादर टेनी परक्का यांची निवड

Next Post
रोटरी क्लब ऑफ नंदुरबारच्या अध्यक्षपदी मनोज गायकवाड तर सचिव म्हणून फादर टेनी परक्का यांची निवड

रोटरी क्लब ऑफ नंदुरबारच्या अध्यक्षपदी मनोज गायकवाड तर सचिव म्हणून फादर टेनी परक्का यांची निवड

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

डॉ.विजयकुमार गावितांच्या प्रकृतीत सुधारणा; नवसपूर्तीसाठी २२ किलोमीटरची पदयात्रा

डॉ.विजयकुमार गावितांच्या प्रकृतीत सुधारणा; नवसपूर्तीसाठी २२ किलोमीटरची पदयात्रा

November 4, 2026
दीपावलीनिमित्त कार्यानुभवातून विद्यार्थ्यांनी बनविले आकर्षक आकाशकंदील

दीपावलीनिमित्त कार्यानुभवातून विद्यार्थ्यांनी बनविले आकर्षक आकाशकंदील

November 1, 2026
खोकराळे येथे राष्ट्रीय एकता दिनानिमित्त विद्यार्थ्यांनी घेतली एकतेची शपथ

खोकराळे येथे राष्ट्रीय एकता दिनानिमित्त विद्यार्थ्यांनी घेतली एकतेची शपथ

November 1, 2026
सैनिकी शाळेत सरदार वल्लभभाई पटेल जयंती उत्साहात साजरी

सैनिकी शाळेत सरदार वल्लभभाई पटेल जयंती उत्साहात साजरी

November 1, 2026
भालेर येथे राष्ट्रीय एकता दिवस उत्साहात साजरा

भालेर येथे राष्ट्रीय एकता दिवस उत्साहात साजरा

November 1, 2026
सरदार वल्लभभाई यांच्या कार्याच्या स्मरणार्थ आयोजित भव्य एकता रॅलीत डॉ. हिना गावित, डॉ. सुप्रिया गावित यांचा सहभाग

सरदार वल्लभभाई यांच्या कार्याच्या स्मरणार्थ आयोजित भव्य एकता रॅलीत डॉ. हिना गावित, डॉ. सुप्रिया गावित यांचा सहभाग

October 31, 2026

Total Views

  • 4,142,612 hits

मुख्य संपादक

श्री. शांताराम पी. पाटील
8275590450

At.post.Umarde Khurde ta.dist Nandurbar
मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458

  • Home
  • Sample Page

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

कॉपी करू नका.
WhatsApp-Add