नंदुरबार l प्रतिनिधी
नंदुरबार तालुक्यातील भालेर येथील कपू पाटील माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयात लोकमान्य टिळक पुण्यतिथी व अण्णाभाऊ साठे जयंतीनिमित्त अभिवादन करण्यात आले. यावेळी जागतिक स्कार्प दिवस ही बनवण्यात आला.
का.वि .प्र. संस्था भालेर संचलित श्रीमती क. पु.पाटील माध्य. व उच्च माध्यमिक विद्यालय भालेर येथे कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी संस्थेचे कार्याध्यक्ष विजयराव बोरसे यांनी लोकमान्य टिळक व शाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या प्रतिमा पूजन व पुष्पहार अर्पण केला.
प्रमुख पाहुणे म्हणून प्राचार्या सौ. विद्या चव्हाण यांनी प्रतिमा पूजन केले.
“जागतिक स्काऊट गाईड स्कार्फ डे” दिनानिमित्त गाईड राज्य पुरस्कार प्राप्त शिक्षिका सौ. छाया वसंत पाटील यांनी स्काऊट गाईड स्कार्फचे महत्व व त्याचे स्काऊट गाईड चळवळतील स्कार्फ ची सुरुवात याची सविस्तर माहिती दिली. ए व्ही कुवर ,कनिष्ठ महाविद्यालयाचे प्रा. एम.आर. पाटील उपस्थित होते. या कार्यक्रमात विद्यालयातील विद्यार्थी विद्यार्थिनी यांनी लोकमान्य टिळक व अण्णाभाऊ साठे यांच्या आठवणींना मनोगतातून उजाळा दिला.
सौ अश्विनी शरद बागुल प्रा. एम. आर. पाटील यांनी मनोगत व्यक्त केले. अध्यक्षीय भाषण झाले. कार्यक्रमाचे सूत्रसंचलन व्ही.व्ही ईशी यांनी केले .कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी विद्यालयातील प्राध्यापक, प्राध्यापिका, शिक्षक शिक्षिका, शिक्षकेतर कर्मचारी वृंद यांनी परिश्रम घेतले.