नंदुरबार l प्रतिनिधी
नंदुरबार तालुका विधायक समिती संचलित श्री छत्रपती शिवाजी महाराज माध्यमिक विद्यालय भादवड येथे बाळ गंगाधर लोकमान्य टिळक यांची पुण्यतिथी व लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांची जयंती साजरा करण्यात आली.
इयत्ता पाचवी ते सातवी लहान गट व इयत्ता आठवी ते दहावी मोठा गट यात वकृत्व स्पर्धेचे आयोजन करण्यात आले विद्यालयातील एकूण ४० विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला कार्यक्रमाचे अध्यक्ष एम. बी. शिंदे, कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे विद्यालयाचे मुख्याध्यापक ए. बी. पाटील व एम. बी. बोरसे यांनी टिळकांच्या व अण्णाभाऊ साठे यांच्या प्रतिमेचे पूजन व माल्यार्पण करून कार्यक्रमाला सुरुवात झाली .
इयत्ता दहावीतील विद्यार्थिनी रोशनी भिल व उन्नती गिरासे यांनी सूत्रसंचालनाची धुरा सांभाळली .वकृत्व स्पर्धेला परीक्षक म्हणून एच. एस .साळुंखे व डी. ए. चौधरी यांनी जबाबदारी स्वीकारली. कार्यक्रमाच्या शेवटी आभार टी. जी. पाटील यांनी मानले. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी विद्यालयातील सर्व कर्मचाऱ्यांनी मेहनत घेतली