नंदुरबार l प्रतिनिधी
नंदुरबार तालुक्यातील भालेर येथील नंदुरबार तालुका विधायक समिती संचलित शिवदर्शन विद्यालयात शांताराम पाटील यांच्या हस्ते वृक्षारोपण करण्यात आले.
यावर्षी पिंपळ लिंब वर्ड बदाम सेमी बेल नींबू जांभूळ चिंच आधी जातीचे एकूण 65 रोपे लावण्यात त्यापैकी ४० झाडे शालेय आवारात लावण्यात आले असून उर्वरित २५ जाडे जांभूळ चिंच लिंबू यांची रोपे भालेर गावात वाटप करण्यात आली.
मुख्याध्यापक आर.एच.बागुल दोन वर्षापासून स्वखर्चाने रोपे आणून वृक्षारोपण करतात. मागील वर्षीही त्यांनी तीस रोपाचे वाटप केले होते . शालेय परिसरात वृक्षारोपण प्रसंगी मुख्याध्यापक बागुल, क्रीडा शिक्षक ए. एस.शिंदे,के.जी.बेडसे,हेमराज पाटील विद्यार्थी-विद्यार्थिनी उपस्थित होते. शालेय परिसरात सिसम नीम जास्वंद शोभेची झाडे अशोक गुलमोहर व कोकणात होणारे बकुळ फुल आदी चाळीस वर विविध जातीचे झाडे आहेत, यात काही झाडे वीस वर्षांपूर्वीचे आहेत.
या वर्षी पारस बाग तयार करण्यात आली आहे, पारस बागेत मिरची ,गिलके, वांगे चवळी आदींची रोपे लावून आदींची रोपे लावण्यात आले आहेत यांचा उपयोग विद्यार्थ्यांना मध्यानह भोजनात या ताज्या भाजीपालाचा वापर करण्याचा मानस असल्याचे मुख्याध्यापक पाटील यांनी माहिती दिली.