नंदूरबार l प्रतिनीधी
शहादा येथे गांजाची अवैध वाहतूक करणाऱ्या दोघांना अटक करण्यात आली असून वाहनासह 1 लाख 13 हजार 300 रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.
4 ऑगस्टरोजी शहादा पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक शिवाजी बुधवंत यांना गुप्त बातमीदारामार्फत बातमी मिळाली की, धावलघाट ता. धडगाव गावाकडून दराफाटा मार्गे शहादाकडे दोन इसम हे एका हिरो कंपनीच्या मोटार सायकलीवर सुका गांजा विक्री करण्याचे उद्देशाने वाहतुक करत आहेत, बाबत माहिती मिळाल्याने पोलीस अधीक्षक श्रवण दत्त. एस, अपर पोलीस अधीक्षक निलेश तांबे, उपविभागीय पोलीस अधिकारी दत्ता पवार यांच्या मार्गदर्शनाखाली शहादा पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक शिवाजी बुधवंत, पोउपनि, छगन चव्हाण, पोउपनि, अभिजीत अहिरे व पथक असे बातमीची खात्री करुन कारवाई करण्यासाठी तात्काळ रवाना झाले.
मिळालेल्या बातमीच्या आधारे सर्व दराफाटा जवळील पोलीस चौकीजवळ येऊन थांबले व म्हसावद कडून येणारे वाहनांवर लक्ष ठेऊन असतांना काही वेळाने म्हसावद कडून एक हिरो कंपनीची एच.एफ. डिलक्स मो. सायकल ( क्र. एम. एच.39, ए. के. 9486) हिच्यावर दोन इसम येतांना दिसले, त्यांचे दोघांचे मध्ये एक पांढ-या रंगाची थैली दिसली. सदर मोटारसायकल चालकाला पथकाने हात देऊन थांबविण्याचा प्रयत्न केला असता मो. सायकल थांबली, सदर मो. सायकल वरील दोन्ही इसमांना त्यांचे नाव गाव विचारता त्यांनी चालक- युवराज गिधा पवार, फुलसिंग कोच-या वळवी, दोन्ही रा. धावलघाट, ता. धडगाव असे सांगितले.
त्यांना त्यांचे सोबत असलेल्या पांढ-या थैलीत काय आहे बाबत विचारता त्यांनी यात कपडे असल्याचे प्रथमतः सांगितले, परंतु पोलीस पथकास मिळालेल्या गुप्त बातमीची खात्री असल्याने त्यांनी सदर इसम व त्यांचेकडील असलेल्या पांढ-या थैलीची झडती घेतली असता त्यामध्ये गांजा सदृश्य पदार्थ मिळून आला व त्यांच्याकडे गांजा विक्रीचा कुठलाही परवाना नसल्याचे समजले.
त्यांच्याकडून एकूण 6 किलो 220 ग्रॅम वजनाचा सुका गांजा व मोटारसायकल असा एकूण 1 लाख ,13 हजार 300 रु किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. त्यांच्यावर शहादा पोलीस ठाण्यात गुंगीकारक औषधी द्रव्य व मनोव्यापारावर परिणाम करणारे पदार्थ अधिनियम 1985 चे कलम 8(क), 20(ब), 20 (2) (ब) प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला असून गुन्हयाचा पुढील तपास पोनि शिवाजी बुधवंत करीत आहेत.
सदरची कारवाई नंदुरबार जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक श्रवण दत्त. एस, अपर पोलीस अधीक्षक निलेश तांबे, शहादा विभागाचे उप विभागीय पोलीस अधिकारी दत्ता पवार यांचे मार्गदर्शनाखाली शहादा पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक शिवाजी बुधवंत, पोउपनि. छगन चव्हाण, पोउपनि. अभिजीत अहिरे, असई रतन पावरा, पोना योगेश थोरात, पोना घनश्याम सुर्यवंशी, पोशि सचिन कापडे, पोशि दिनकर चव्हाण, पोशि भरत उगले, पोशि योगेश माळी, पोशि अजय चौधरी, पोशि अमृत पाटील अशांनी केली आहे.