Public Mirror News
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
Public Mirror News
No Result
View All Result

विकास कामे थांबवण्यासाठीच घातला गोंधळ; जिल्हा परिषद अध्यक्ष डॉ.सुप्रिया गावित यांचे विरोधकांवर शरसंधान

team by team
August 5, 2024
in राजकीय
0
विकास कामे थांबवण्यासाठीच घातला गोंधळ; जिल्हा परिषद अध्यक्ष डॉ.सुप्रिया गावित यांचे विरोधकांवर शरसंधान

नंदुरबार l प्रतिनिधी

सतत चालू असलेल्या पावसामुळे एकीकडे दरड पडून रस्ते बंद पडत आहेत, दुर्गम भागात आरोग्य समस्या उद्भवत आहेत त्याचबरोबर अनेक ठिकाणी पाणी आणि रस्त्यांचा प्रश्न उद्भवला आहे. त्याच्याशी संबंधित चर्चा घडणे अपेक्षित असताना अजेंडा न मिळाल्याचा कांगावा करून सभा थांबवू पाहणाऱ्या विरोधकांनी गोंधळ घातला. आम्ही करू पाहत असलेल्या लोकांच्या विकास कामांना खोळंबा घालणे; हाच विरोधकांचा यामागे हेतू होता परंतु आम्ही ते मनसुबे उधळून लावत सर्व 34 विषय आज बहुमताने मंजूर केले; अशी माहिती जिल्हा परिषदेच्या अध्यक्ष डॉक्टर सुप्रिया गावित यांनी दिली.

नंदुरबार जिल्हा परिषदेची सर्वसाधारण सभा आज दिनांक पाच ऑगस्ट 2024 रोजी दुपारी जिल्हा परिषदेच्या सभागृहात पार पडली. डॉक्टर सुप्रियाताई गावित यांच्या विरोधातील अविश्वास प्रस्ताव बारगळल्या नंतरची ही पहिली सभा होती. एकूण 34 विषय अजेंड्यावर होते. विरोधी पक्षाच्या सदस्यांनी अजेंडा वेळेवर मिळालेला नाही असे सांगून गोंधळ घालण्याचा प्रयत्न केला त्याचबरोबर आमचे माइक बंद केले असा आरोपही केला.

याला अनुषंगवर पत्रकारांनी विचारलेल्या प्रश्नांचे उत्तर देताना जिल्हा परिषद अध्यक्ष डॉक्टर सुप्रिया गावित म्हणाल्या, सभागृहात आपले संख्या बळ कमी असल्याचे लक्षात आल्याने विरोधी पक्षाच्या सदस्यांनी गोंधळ घालण्याचा पवित्र घेतला. अजेंडा त्यांना वेळेवर घरपोच देण्यात आला होता. याच्यापूर्वीसुद्धा त्यांनी अजेंडा मिळत नसल्याच्या तक्रारी केल्या होत्या म्हणून टपालाने पाठवण्यात आला टपाल आणि पाठवलेला मिळाला नाही असं सांगू लागले म्हणून पंधरा दिवस आधीच व्यक्तीच्या हस्ते त्यांच्या घरी पोहोचता केला गेला. तरीही अजेंडा मिळाला नसल्याचा कांगावा त्यांनी आज केला. वास्तविक सतत चालू असलेल्या पावसामुळे एकीकडे दरड पडून रस्ते बंद पडत आहेत, दुर्गम भागात आरोग्य समस्या उद्भवत आहेत त्याचबरोबर अनेक ठिकाणी पाणी आणि रस्त्यांचा प्रश्न उद्भवला आहे. त्याच्याशी संबंधित चर्चा घडणे अपेक्षित होते.

अजेंड्यावर लोकांच्या हिताच्या विकास कामांशी संबंधित विषय असताना सभा थांबवण्याचा त्यांनी प्रयत्न केला त्यांना विकास काम थांबवण्यात रस असल्याचे यावरून जाहीर दिसले. परंतु आम्ही ते सर्व मनसुबे उधळून लावले असून बहुमताने सर्वच्या सर्व म्हणजे 34 विषय मंजूर केले आहेत आहेत, असे डॉक्टर सुप्रिया गावित म्हणाल्या.

बातमी शेअर करा
Previous Post

नंदुरबार परिसरात वावरणारा बिबट्या अखेर जेरबंद

Next Post

खासदार गोवाल पाडवी यांनी विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांची घेतली भेट

Next Post
खासदार गोवाल पाडवी यांनी विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांची घेतली भेट

खासदार गोवाल पाडवी यांनी विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांची घेतली भेट

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

पालिकेतर्फे महिला मेळावा; बचत गटांना धनादेश वितरणासह गुणवंतांचा सन्मान

पालिकेतर्फे महिला मेळावा; बचत गटांना धनादेश वितरणासह गुणवंतांचा सन्मान

March 10, 2026
विधी सेवा महाशिबिरातून नागरिकांच्या जीवनमानात बदल घडविण्याचा प्रयत्न : न्यायमूर्ती किशोर संत

विधी सेवा महाशिबिरातून नागरिकांच्या जीवनमानात बदल घडविण्याचा प्रयत्न : न्यायमूर्ती किशोर संत

March 10, 2026
डॉ. हिना गावित यांच्या हस्ते महिलांना भेट वस्तूंच वितरण

डॉ. हिना गावित यांच्या हस्ते महिलांना भेट वस्तूंच वितरण

March 10, 2026
माजी खा.डॉ. हिना गावित यांनी सिंहस्थ पर्वणी संदर्भात अधिकाऱ्यांकडून घेतला आढावा

माजी खा.डॉ. हिना गावित यांनी सिंहस्थ पर्वणी संदर्भात अधिकाऱ्यांकडून घेतला आढावा

March 10, 2026
भाजपातर्फे छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती साजरी

भाजपातर्फे छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती साजरी

March 7, 2026
डॉ.विक्रांत बाबा मित्र परिवारा मार्फत शिवजयंती उत्साहात साजरी

डॉ.विक्रांत बाबा मित्र परिवारा मार्फत शिवजयंती उत्साहात साजरी

March 7, 2026

Total Views

  • 4,142,612 hits

मुख्य संपादक

श्री. शांताराम पी. पाटील
8275590450

At.post.Umarde Khurde ta.dist Nandurbar
मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458

  • Home
  • Sample Page

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

कॉपी करू नका.
WhatsApp-Add