Public Mirror News
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
Public Mirror News
No Result
View All Result

नंदुरबार परिसरात वावरणारा बिबट्या अखेर जेरबंद

team by team
August 5, 2024
in क्राईम
0
नंदुरबार परिसरात वावरणारा बिबट्या अखेर जेरबंद

नंदुरबार l प्रतिनिधी
मागील गेल्या एक ते दोन महिन्यापासून नंदुरबार शहरातील साक्रीनाका परिसरात बिबट्याने धुमाकूळ घातला होता बिबट्यास जेरबंद करण्यासाठी लावलेल्या पिंजऱ्यात तीन दिवसानंतर धुमाकूळ घालणारा बिबट्या अखेर जेरबंद करण्यास नंदुरबार वन विभागाला यश मिळाले आहे, व परिसरातील नागरिकांनी सुटकेचा विश्वास टाकला आहे.

नंदुरबार शहरात मागील काही महिन्यापासून बिबट्या धुमाकूळ घालत असल्याचे परिसरातील नागरिकांमधून तक्रार प्राप्त झाली होती, त्यानुसार नंदुरबार वनपरिक्षेत्र अधिकारी वर्षा चव्हाण यांनी वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या मार्गदर्शनानुसा,र नंदुरबार शहरातील इमाम बादशाह दर्गा परिसरात असलेल्या पीर तलाव, हिरा इंग्लिश मीडियम स्कूल, व तलाव पाडा परिसरात बिबट्या जेरबंद करण्यासाठी पिंजरे लावण्यात आले होते, त्याअनुषंगाने दिनांक 1 ऑगस्ट रोजी पिंजरे लावल्यानंतर तब्बल तीन दिवसांच्या प्रदीर्घ प्रतीक्षेनंतर, आज चार ऑगस्ट रोजी सायंकाळी सात ते साडेसात वाजेच्या सुमारास, नंदुरबार शहरालगत असलेल्या साक्री नाका परिसरातील इमामबादशा दर्गा नजीक असलेल्या, हिरा इंग्लिश मीडियम स्कूल जवळ लावण्यात आलेल्या पिंजऱ्यात धुमाकूळ घालणारा व परिसरातील नागरिकांत दहशत पसरविणारा एक बिबट्या अखेर जेरबंद झाल्याचे काही नागरिकांना व वन्यजीव प्राणी संरक्षण आणि बहुउद्देशिय संस्था समितीच्या सदस्यांना आढळून आले, त्यानुसार नंदुरबार वनपरिक्षेत्र अधिकारी यांनी वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या मार्गदर्शनानुसार त्या ठिकाणी बिबट्यास जेरबंद करून नंदुरबार वनपरिक्षेत्र कार्यालयाच्या आवारात सुरक्षितपणे आणण्यात आले आहे, सदरचा बिबट्या हा नर जातीचा असून, साधारण त्याचे वय तीन ते चार वर्ष असल्याचे पशुवैद्यकीय अधिकाऱ्यांच्या तपासणीतून निष्पन्न झाले आहे,

सदरची कारवाई नंदुरबार सहाय्यक वनसंरक्षक कृष्णा भंवर यांच्या मार्गदर्शनाखाली, सहाय्यक उपवनसंरक्षक संजय साळुंखे, तसेच सहाय्यक उपवनसंरक्षक धनंजय पवार यांच्या मार्गदर्शनाखाली, नंदुरबार वनपरिक्षेत्र अधिकारी वर्षा चव्हाण, वनपाल बिलाल शहा, तसेच वन्यजीव प्राणी संरक्षण व बहुउद्देशीय संस्थेचे सदस्य यांनी बिबट्या जेर बंद करण्यास परिश्रम घेतले,

https://publicmirrornews.com/wp-content/uploads/2024/08/VID-20240805-WA0004.mp4

यावेळी वन्यजीव प्राणी संरक्षण आणि बहुउद्देशीय संस्था नंदुरबारचे अध्यक्ष संजय वानखेडे, कैलास देसाई, चेतन आखाडे, चेतन पाटील, आशिष ठाकूर, राहुल खैरनार, चेतन अहिरे, रोहित पिंपळे, गणेश बागले, गणेश सोनवणे आदींनी मिळून ही कार्यवाही केली.

बातमी शेअर करा
Previous Post

उद्योगांना सर्व मंजुऱ्या एकाच ठिकाणी देण्यासाठी ‘मैत्री कक्ष’ सक्षमीकरण : उन्मेष महाजन

Next Post

विकास कामे थांबवण्यासाठीच घातला गोंधळ; जिल्हा परिषद अध्यक्ष डॉ.सुप्रिया गावित यांचे विरोधकांवर शरसंधान

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

नांदरखे येथे आंतरराष्ट्रीय योग दिवस साजरा

नांदरखे येथे आंतरराष्ट्रीय योग दिवस साजरा

June 23, 2026
श्रीमती कमलताई पुरुषोत्तम पाटील विद्यालयात जागतिक योग दिन उत्साहात साजरा

श्रीमती कमलताई पुरुषोत्तम पाटील विद्यालयात जागतिक योग दिन उत्साहात साजरा

June 23, 2026
देशाच्या राज्य क्रीडा मंत्र्यांसमवेत डॉ. हिना.गावित यांनी साजरा केला आंतरराष्ट्रीय योग दिवस

देशाच्या राज्य क्रीडा मंत्र्यांसमवेत डॉ. हिना.गावित यांनी साजरा केला आंतरराष्ट्रीय योग दिवस

June 23, 2026
नंदुरबारच्या संसदीय संकुल विकास परियोजनेतील कार्याचा डॉ. हिना गावित यांनी मांडला आढावा

नंदुरबारच्या संसदीय संकुल विकास परियोजनेतील कार्याचा डॉ. हिना गावित यांनी मांडला आढावा

June 23, 2026
शहादा पोलिसांची धडक कारवाई; ९० लाखांचा विदेशी मद्यसाठा व कंटेनर जप्त, दोघांना अटक

शहादा पोलिसांची धडक कारवाई; ९० लाखांचा विदेशी मद्यसाठा व कंटेनर जप्त, दोघांना अटक

June 23, 2026
आंतरराज्यीय दुचाकी चोरट्यांच्या टोळीचा पर्दाफाश; ७.५० लाखांच्या २१ दुचाकी जप्त

आंतरराज्यीय दुचाकी चोरट्यांच्या टोळीचा पर्दाफाश; ७.५० लाखांच्या २१ दुचाकी जप्त

June 23, 2026

Total Views

  • 4,142,612 hits

मुख्य संपादक

श्री. शांताराम पी. पाटील
8275590450

At.post.Umarde Khurde ta.dist Nandurbar
मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458

  • Home
  • Sample Page

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

कॉपी करू नका.
WhatsApp-Add