Public Mirror News
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
Public Mirror News
No Result
View All Result

आनंदाचा शिधा’ या पिशव्यांवर श्री गणरायांचे छायाचित्र छापू नये: हिंदु सेवा सहाय्य समिती

team by team
July 31, 2024
in राजकीय
0
आनंदाचा शिधा’ या पिशव्यांवर श्री गणरायांचे छायाचित्र छापू नये: हिंदु सेवा सहाय्य समिती

नंदुरबार l प्रतिनिधी

महाराष्ट्रात गणेशोत्सवानिमित्त आनंदाच्या शिधाचे वितरण करण्याच्या निर्णय महायुती सरकारने घेतला आहे. हा ‘आनंदाचा शिधा’ ज्या पिशव्यांवर देण्यात येतो यापूर्वीही त्यावर भगवान गणराय, प्रभू श्रीराम, छ. शिवाजी महाराज यांचे छायाचित्रे छापली होती. सदर पिशवी ही टिकाऊ नसून टाकाऊ असल्याने त्या पिशव्या नको त्याठिकाणी पडलेल्या अवस्थेत मिळून आलेल्या आहेत. त्यामुळे देवी देवता आणि राष्ट्रपुरुष यांच्या अवमान होतो. तरी शासनाने गणेशोत्सव निमित्ताने ‘आनंदाचा शिधा’ पिशव्यांवर श्री गणरायांचे आणि यापुढे हिंदु देवी देवता आणि राष्ट्रपुरुष यांची छायाचित्रे छापू नये या आशयाचे निवेदन मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री, अन्न व नागरी पुरवठा मंत्री यांना जिल्हा पुरवठा अधिकारी मिसाळ साहेब यांचे मार्फत देण्यात आले.

निवेदनात पुढे म्हटले आहे की, महाराष्ट्र शासनाने ‘आनंदाचा शिधा’ या नावाने महाराष्ट्रतील जनतेला अल्पदरात जीवनावश्यक वस्तु उपलब्ध करून देत आहे. महाराष्ट्र शासनाच्या हा निर्णय स्तुत्य जरी असला तरी आनंदाच्या शिधा ज्या पिशवींमध्ये वितरित केला जातो त्यावर हिंदू देवी देवता आणि राष्ट्रपुरुष यांची छायाचित्रे छापलेली असतात. पिशव्यांची गुणवत्ता बघता त्या पिशव्या टिकाऊ नाहीत तर टाकाऊ असतात.

थोड्या दिवसांनी त्या फाटतील आणि रस्त्यावर किंवा नको त्या ठिकाणी पडलेले अवस्थेत मिळू शकतात त्यामुळे हिंदु देवी देवता आणि राष्ट्र पुरुष यांच्या छायाचित्राचे अवमान होऊ शकतो.म्हणून महाराष्ट्र शासनाने आणि प्रशासनाने देवी देवताआणि राष्ट्रपुरुष यांचे छायाचित्र नसलेल्या पिशव्या आनंदाच्या शिधासाठी वापर करावा असे निवेदनात नमूद केले आहे. निवेदनावर हिंदु सेवा सहाय्य समितीचे धर्मसेवक नरेंद्र पाटील, मोठा मारुती मंदिराचे कार्याध्यक्ष अशोक चौधरी,

श्री संत दगाजी महाराज मंदिर चौपाळेचे मोहन पटेल, विठ्ठल मंदिराचे अध्यक्ष रतिलाल पटेल, गणपती मंदिराचे मुख्य पुजारी प्रदीप भट, भागवताचार्य रवींद्र पाठक, बाबा गणपती मंडळाचे सुनील सोनार, पियुष सोनार, मयूर सोनार श्री दादा गणपती मंडळाचे अध्यक्ष अमोल सोनार, मारुती व्यायाम शाळेचे अर्जुन मराठे, घारू कोळी, संत नरहरी व्यायाम शाळेचे ओम सोनार, ओम जितेंद्र सोनार, श्री गणेश मंडळाचे अरूण सोनार, हिंदुत्ववादी घनश्याम मराठे, हिंदू सेवा सहाय्य समितीचे जितेंद्र राजपूत, पंकज डाबी, सुयोग सूर्यवंशी, जयेश भोई, विजय जोशी आदी उपस्थित होते.

बातमी शेअर करा
Previous Post

दोन आरोपींकडून चोरीच्या 15 मोटारसायकली हस्तगत, धडगाव पोलीसांची कामगिरी

Next Post

अर्थसंकल्पात गरीब, महिला,युवा,शेतकरी या चार प्रमुख घटकांवर लक्ष केंद्रित,यंदा सर्व समावेशक अर्थसंकल्प सादर : डॉ.हिना गावीत

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

जिल्हाधिकारी डॉ. मित्ताली सेठी यांना घेतला ‘तोरणमाळ महोत्सव’ पूर्व तयारीचा आढावा

जिल्हाधिकारी डॉ. मित्ताली सेठी यांना घेतला ‘तोरणमाळ महोत्सव’ पूर्व तयारीचा आढावा

February 18, 2026
मिरची स्प्रे फवारून पळण्याचा प्रयत्न फसला; पवनऊर्जा प्रकल्पातील कॉपर केबल चोरीप्रकरणी तिघे जेरबंद

मिरची स्प्रे फवारून पळण्याचा प्रयत्न फसला; पवनऊर्जा प्रकल्पातील कॉपर केबल चोरीप्रकरणी तिघे जेरबंद

February 18, 2026
भालेर येथे मातृ-पितृ पूजन दिवस उत्साहात; संस्कार आणि कृतज्ञतेचा त्रिवेणी संगम

भालेर येथे मातृ-पितृ पूजन दिवस उत्साहात; संस्कार आणि कृतज्ञतेचा त्रिवेणी संगम

February 18, 2026
लोकसेवेचा आदर्श! भालेरच्या सरपंच कविता पाटील यांनी नाकारले मानधन; शासकीय तिजोरीत जमा करण्याचा निर्णय

लोकसेवेचा आदर्श! भालेरच्या सरपंच कविता पाटील यांनी नाकारले मानधन; शासकीय तिजोरीत जमा करण्याचा निर्णय

February 15, 2026
भालेर येथे मातृ-पितृ पूजन दिवस उत्साहात; संस्कार आणि कृतज्ञतेचा त्रिवेणी संगम

भालेर येथे मातृ-पितृ पूजन दिवस उत्साहात; संस्कार आणि कृतज्ञतेचा त्रिवेणी संगम

February 15, 2026
स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीत बंजारा समाजाला प्रतिनिधित्व; आ.चंद्रकांत रघुवंशी

स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीत बंजारा समाजाला प्रतिनिधित्व; आ.चंद्रकांत रघुवंशी

February 15, 2026

Total Views

  • 4,142,612 hits

मुख्य संपादक

श्री. शांताराम पी. पाटील
8275590450

At.post.Umarde Khurde ta.dist Nandurbar
मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458

  • Home
  • Sample Page

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

कॉपी करू नका.
WhatsApp-Add