Public Mirror News
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
Public Mirror News
No Result
View All Result

आंदोलकांचे उद्या रास्ता रोको आंदोलन ,अनुसूचित जनजाती आयोगाचे अध्यक्षा सोबतची चर्चा निष्फळ

team by team
July 21, 2024
in राजकीय
0
आंदोलकांचे उद्या रास्ता रोको आंदोलन ,अनुसूचित जनजाती आयोगाचे अध्यक्षा सोबतची चर्चा निष्फळ

नंदुरबार l प्रतिनिधी
आदिवासी न्याय हक्कासाठी सुरू असलेल्या धरणे आंदोलन बाबत जनजाती आयोगाचे अध्यक्षा सोबतची चर्चा निष्फळ झाल्याने उद्या 22 जुलै रोजी नावापुर येथे आंदोलकांतर्फे रास्ता रोको करण्यात येणार आहे.

महाराष्ट्राच्या पेसा क्षेत्रातील आदिवासी समाजाचे अनेक ज्वलंत प्रश्न स्वातंत्र्यापासून आजतागायत सुटलेले नसल्यामुळे आदिवासींसाठी मिनी मंत्रालय असलेले ट्रायबल एडव्हायझरी कौन्सिल (TAC) ची बैठक घेणेत यावी याबाबत दि. २८.०६.२०२४ पासून आजपावेतो जिल्हाधिकारी कार्यालय नंदुरबार येथे मागण्या मान्य होईपावेतो बेमुदत धरणे आंदोलन शांततेच्या मार्गाने व कायद्याच्या चौकटीत राहून सुरु आहे. सदर आंदोलनाची शासन स्तरावर दखल न घेतल्यामुळे सरकारचे लक्ष वेधण्यासाठी आंदोलनाच्या ठिकाणी दिनांक ८.०७.२०२४ रोजी आदिवासींचे मयतच्या वेळी वाजविले जाणारे पारंपारिक तुरवाद्य वाजविण्यात आले. त्यानंतर दिनांक १३.०७.२०२४ रोजी पालकमंत्री यांच्या अध्यक्षतेखाली मा. जिल्हाधिकारी कार्यालय, नंदुरबार येथे जिल्हा नियोजन मंडळाच्या बैठकीच्या दिवशी आंदोलनस्थळी घंटानाद आंदोलन केले गेले. शासन स्तरावर आंदोलनाची दखल न घेतल्यामुळे नाईलाजस्तव न्यायहक्कासाठी दिनांक २२.०७.२०२४ रोजी राष्ट्रीय महामार्ग क्रमांक ६ सुरत-नागपूर महामार्ग नवापूर जि. नंदुरबार मागण्या मान्य होईपावेतो रास्ता रोको आंदोलनाचा इशारा सुध्दा लेखी निवेदनाद्वारे दिलेला आहे.

सदर मागण्या सोडविण्यासाठी आपल्या स्तरावरुन तात्काळ चर्चा घडवून मागण्या मान्य करणेसाठी महाराष्ट्र शासनास पाठपुरावा करावा अशी विनंती आज अनुसूचित जनजाती आयोगाचे राष्ट्रीय अध्यक्ष अतारसिंग आर्या यांना आंदोलका तर्फे करण्यात आली आहे .

याबाबतीचे निवेदन आज जनजाती आयोगाचे राष्ट्रीय अध्यक्ष अतार सिंग आर्या यांना देण्यात आले आहे.यावेळी जनजातीय आयोगाचे अध्यक्ष अत्तार सिंग आर्या यांनी आंदोलकांना सांगितले की तुम्ही आंदोलन करू नका मी शासनाला तुमच्या मागण्या मान्य करण्यासाठी भाग पाडतो .परंतु त्यांनी आंदोलकांना लेखी स्वरूपात दिले नाही म्हणून 22 रोजी रस्ता रोको आंदोलन करण्यात येणार आहे असे आंदोलका तर्फे सांगण्यात आले आहे.यावेळी के टी गावित, हिरामण पाडवी तसेच आंदोलक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

बातमी शेअर करा
Previous Post

दहशतवादी नेटवर्क व त्यांचे समर्थन करणारी इको-सिस्टम नष्ट करा : केंद्रीय गृहमंत्री अमित शाह

Next Post

शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाच्या युवा सेना नंदुरबार जिल्हा नुतन पदाधिकाऱ्यांचा सत्कार

Next Post
शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाच्या युवा सेना नंदुरबार जिल्हा नुतन पदाधिकाऱ्यांचा सत्कार

शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाच्या युवा सेना नंदुरबार जिल्हा नुतन पदाधिकाऱ्यांचा सत्कार

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

के.डी.गावित सैनिकी विद्यालयात महाराष्ट्र दिन उत्साहात साजरा

के.डी.गावित सैनिकी विद्यालयात महाराष्ट्र दिन उत्साहात साजरा

May 2, 2026
नांदरखे येथे महाराष्ट्र दिन उत्साहात साजरा

नांदरखे येथे महाराष्ट्र दिन उत्साहात साजरा

May 2, 2026
श्रीमती क. पु. पाटील माध्यमिक विद्यालयात महाराष्ट्र दिन साजरा

श्रीमती क. पु. पाटील माध्यमिक विद्यालयात महाराष्ट्र दिन साजरा

May 2, 2026
नंदुरबारच्या प्रामाणिकपणे काम करणाऱ्या कार्यकर्त्यांच्या हिमालयासारखा पाठीशी : पालकमंत्री हसन मुश्रीफ

नंदुरबारच्या प्रामाणिकपणे काम करणाऱ्या कार्यकर्त्यांच्या हिमालयासारखा पाठीशी : पालकमंत्री हसन मुश्रीफ

May 2, 2026
जिल्हाधिकारी डॉ. मित्ताली सेठी यांच्या हस्ते जिल्हाधिकारी कार्यालयात ध्वजवंदन

जिल्हाधिकारी डॉ. मित्ताली सेठी यांच्या हस्ते जिल्हाधिकारी कार्यालयात ध्वजवंदन

May 2, 2026
‘एल-निनो’मुळे उष्णतेची तीव्रता वाढली ; नागरिकांनी दक्ष राहावे : पालकमंत्री हसन मुश्रीफ

‘एल-निनो’मुळे उष्णतेची तीव्रता वाढली ; नागरिकांनी दक्ष राहावे : पालकमंत्री हसन मुश्रीफ

May 2, 2026

Total Views

  • 4,142,612 hits

मुख्य संपादक

श्री. शांताराम पी. पाटील
8275590450

At.post.Umarde Khurde ta.dist Nandurbar
मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458

  • Home
  • Sample Page

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

कॉपी करू नका.
WhatsApp-Add