Public Mirror News
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
Public Mirror News
No Result
View All Result

काकर्दे येथे वृक्षाधार उपक्रमातून वृक्षारोपण,वृक्षदिंडीतून ग्रामस्थांमध्ये वृक्ष लागवडीची जनजागृती

team by team
July 18, 2024
in राजकीय
0
काकर्दे येथे वृक्षाधार उपक्रमातून वृक्षारोपण,वृक्षदिंडीतून ग्रामस्थांमध्ये वृक्ष लागवडीची जनजागृती

नंदुरबार l प्रतिनिधी-

तालुक्यातील काकर्दे गावात वृक्षाधार कार्यक्रम घेण्यात आला. गावातून वृक्षदिंडी काढून वृक्ष लागवडीसह संवर्धनाचा संदेश देण्यात आला. तसेच ग्रामस्थांना वृक्षारोपणाचे महत्त्व पटवून देण्यात आले आहे.

नंदुरबार तालुक्यातील काकर्दे येथे सामाजिक वनीकरण विभाग नंदुरबार, एचडीएफसी बँक लि.नंदुरबार, लोककल्याण बहुउद्देशीय संस्था नंदुरबार आणि काकर्दे ग्रामपंचायत यांच्या विद्यमाने आषाढी एकादशीनिमित्त वृक्षाधार कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. कार्यक्रमाचे उद्घाटन सामाजिक वनीकरण विभाग नाशिकचे वनसंरक्षक गजेंद्र हिरे, सामाजिक वनीकरण विभाग नंदुरबारचे विभागीय वनअधिकारी डॉ.म.प्र.गुजर यांच्या हस्ते वृक्षारोपणाने करण्यात आले.

कार्यक्रमास सहाय्यक गट विकास अधिकारी संदीप वायाळ,एचडीएफसी बँक नंदुरबारचे शाखाधिकारी राम पवार, काकर्देच्या सरपंच सौ.रेखाबाई राकेश माळी, एचडीएफसी बँक धुळेचे क्लस्टर हेड प्रविण जाधव, काकर्देचे ग्रामसेवक शरद गायकवाड, नंदुरबारचे वनक्षेत्रपाल आर.जे.लामगे, बँकेचे नंदुरबार युनिट हेड पंकज महाले, लोककल्याण बहुउद्देशीय संस्थेचे अध्यक्ष पंकज ठाकरे, सचिव राकेश चौधरी, सदस्य किशोर महाले, संदिप चौधरी, निखील चौधरी, बँक कर्मचारी शितल बडगुजर, जितेंद्र पाटील, भावना चौधरी, मृणाली पानपाटील, विनोद गिरासे व डीएससी संस्थेचे कर्मचारी उपस्थित होते. वृक्षाधार कार्यक्रमांतर्गत ग्रामपंचायत कार्यालयात प्रतिमा पूजन करण्यात आले.

तसेच गावातून वृक्षदिंडी काढण्यात आली. या वृक्षदिंडीत संत सावंता भजनी मंडळ व ग्रामस्थ सहभागी झाले. तसेच वृक्ष लागवडीसाठी मोकळ्या जागेत वृक्षाधार फलकाचे अनावरणही करण्यात आले.सावता भजनी मंडळ यांनी सहकार्य केले कार्यक्रम यशस्वीतेसाठी संयोजकांनी परिश्रम घेतले.

बातमी शेअर करा
Previous Post

हिरकणी आणि युवारंग फाउंडेशनतर्फे आषाढी एकादशी निमित्त १०१ तुळशी रोप व भक्तांसाठी चहावाटप

Next Post

वाहनाचे योग्यता प्रमाणपत्र व नुतनीकरण विलंब शुल्क आकारणी स्थगित : किरण बिडकर

Next Post
वाहनाचे योग्यता प्रमाणपत्र व नुतनीकरण विलंब शुल्क आकारणी स्थगित : किरण बिडकर

वाहनाचे योग्यता प्रमाणपत्र व नुतनीकरण विलंब शुल्क आकारणी स्थगित : किरण बिडकर

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

कोपर्ली इंदाणी विद्यालयात गुरुपौर्णिमा उत्साहात साजरी

कोपर्ली इंदाणी विद्यालयात गुरुपौर्णिमा उत्साहात साजरी

July 31, 2026
सैनिकी विद्यालयात गुरु पूजन उत्सव उत्साहात साजरा

सैनिकी विद्यालयात गुरु पूजन उत्सव उत्साहात साजरा

July 31, 2026
खादी मंडळाच्या वरिष्ठ पर्यवेक्षकाला ५ हजारांची लाच घेताना एसीबीने रंगेहाथ पकडले

एक लाख आठ हजार महिना पगार तरीही अडीच हजाराची लाच घेताना मुख्याध्यापक एसीबीच्या जाळ्यात

July 31, 2026
भाजपाचे माजी महामंत्री विजय चौधरी यांच्यावर गुन्हा दाखल

भाजपाचे माजी महामंत्री विजय चौधरी यांच्यावर गुन्हा दाखल

July 31, 2026
पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजनेबाबत गैरसमज दूर करा: अतिरिक्त जिल्हाधिकारी धनंजय गोगटे

पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजनेबाबत गैरसमज दूर करा: अतिरिक्त जिल्हाधिकारी धनंजय गोगटे

July 31, 2026
नांदरखे येथे प्राथमिक व माध्यमिक आश्रमशाळेत आषाढी एकादशी उत्साहात

नांदरखे येथे प्राथमिक व माध्यमिक आश्रमशाळेत आषाढी एकादशी उत्साहात

July 27, 2026

Total Views

  • 4,142,612 hits

मुख्य संपादक

श्री. शांताराम पी. पाटील
8275590450

At.post.Umarde Khurde ta.dist Nandurbar
मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458

  • Home
  • Sample Page

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

कॉपी करू नका.
WhatsApp-Add