नंदुरबार l प्रतिनिधी
आषाढी एकादशी निमित्त पाटील वाडी परिसरातील विठ्ठल मंदिरात युवारंग फाउंडेशन व हिरकणी फाउंडेशन नंदुरबार यांच्या वतीने विठ्ठल मंदिर परिसरात येणाऱ्या भक्तगणासाठी फाउंडेशनच्या माध्यमातून तुळशीचे रोपं व चहा वाटप करण्यात आला.
या उपक्रमात पोलीस उप निरीक्षक एकनाथ भोईर, पोलीस सचिन राजपूत, गणेश चव्हाण, अनिश गावित, रविकांत बागले यांचे सहकार्य लाभले. युवा रंग फाउंडेशनचे अध्यक्ष राहुल शिंदे, हिरकणी फाउंडेशनच्या अध्यक्षा चेतना गोस्वामी, प्रियंका पाटील, देवेंद्र कासार, भावेश मंडलिक, ऋषिकेश मंडलिक, शिवम गोस्वामी संगीता वाघ, उज्वला गावित, दिपाली पाटील, पूजा जाधव,मीनाक्षी पाटील यांनी उपक्रमासाठी मेहनत घेतली.
या उपक्रमाबद्दल फाउंडेशनचे भाविकांनी कौतुक केले. यावेळी तुळशीची १०१ रोपं मोफत वाटप करण्यात आले.