नंदुबार l प्रतिनिधी
इयत्ता आठवीच्या पाठ्यपुस्तकातील स्थानिक वेळ व प्रमाण वेळ’ या घटकाच्या निमित्याने ‘शासकीय माध्यमिक आश्रम शाळा कोळदा’ येथील विद्यार्थ्यांनी अमेरिकेतील प्राध्यापिका डॉ.जेमी यांच्याशी संवाद साधला.
प्रा. डॉ.जेमी या अमेरिकेतील सॉल्ट लेक सिटी म्हणून प्रसिध्द असणाऱ्या युटा या शहरात राहतात, ऑनलाईन शिक्षण प्रणाली च्या माध्यमातून आय.इ.एल.टी.एस. परीक्षेची तयारी करणाऱ्या जगभरातील विद्यार्थ्याना त्या इंग्लीश भाषेचे अध्यापन करतात. व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे संपन्न झालेल्या या कार्यक्रमात कु. प्रणाली, कु. पल्लवी, कु. लक्ष्मी, कु. आरुषी, कु भावना, चि. अतुल, या सहभागी विद्यार्थ्यांनी प्रा. डॉ.’जेमी’ यांना घटकाशी संबंधित प्रश्न विचारले. भारतीय प्रमाण वेळेनुसार शनिवारी सकाळी साडेनऊ वाजता वर्गातील विद्यार्थ्यांना प्रा. डॉ.जेमी यांनी व्हिडिओद्वारे अमेरिकेत त्याचवेळी माउंटेन्शन स्टॅंडर्ड टाईम नुसार रात्र असल्याचे दाखवले. यासोबतच अमेरिकेमध्ये इस्टर्डन, ,सेंट्रल, माऊंटेशन एंड पॅसिफिक टाईम झोन्स असल्याचे सांगितले.
पुस्तकाच्या पलीकडे जाऊन विद्यार्थ्यांना अध्ययनाचा हा नवीन आणि विलक्षण अनुभव देतांना
विद्यार्थ्यांना पाठ्यपुस्तकातील संबोध अधिक चांगल्या पद्धतीने समजावा, त्यासोबतच त्याचे संभाषण कौशल्य विकसित व्हावे आणि विद्यार्थ्यांमधील आत्मविश्वास वृद्धिंगत व्हावा या उद्देशाने सदर कार्यक्रमाचे आयोजन केले होते.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन आरुषी हिने केले.
मुख्याध्यापिका सुवर्णा डी.कुवर यांच्या मार्गदर्शनाखाली माध्यमिक शिक्षक किशोर भिसे यांच्या संकल्पनेतून या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. तांत्रिक सहकार्य मनीष गवई यांनी केले.
सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी शासकीय माध्यमिक आश्रम शाळा कोळदा ता. नवापूर जि. नंदुरबार यांनी कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी प्रयत्न केले








