नंदुरबार l प्रतिनिधी
दोन दिवसांपूर्वी एका व्यक्तीने सोशल मीडियावर आक्षेपार्ह पोस्ट व्हायरल केली होती. त्यामुळे मोठ्या प्रमाणावर संताप व्यक्त करण्यात आला होता. पोलिसांनी तत्काळ कारवाई केली होती.त्यानंतर शनिवारी शहर पोलिस ठाण्यात शांतता समितीची बैठक घेण्यात आली. त्यावेळी या विषयावर चर्चा करण्यात येऊन बंद मागे घेण्याचे आवाहन पोलिसांनी केले होते.मात्र संघटनांनी बंद पुकारला आज 14 जुलै रोजी कडकडीत बंद ठेवण्यात आला.यावेळी मोठ्या संख्येने एकत्र जमत छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याला दुग्धाभिषेक करण्यात आला.आक्षेपार्ह मजकूर प्रसारीत केल्यास कठोर कारवाई करण्यात येणार असल्याचा पोलिस अधिक्षक श्रवण दत्त एस. यांनी दिला आहे.
नंदुरबार येथे एका व्यक्तीने सोशल मीडियावर आक्षेपार्ह पोस्ट व्हायरल केली होती. त्यामुळे मोठ्या प्रमाणावर संताप व्यक्त करण्यात आला होता. पोलिसांनी तत्काळ कारवाई केली होती. नंदुरबार बंदचे आयोजन करू नये व जनतेला वेठीस धरू नये, असे आवाहन शांतता समितीच्या बैठकीत देखील करण्यात आले. परंतु सोशल मीडियावर स्वयंस्फूर्तीने सोमवारी बंद पाळण्यात आला. आज 14 जुलै रोजी सकाळी हिंदुत्ववादी संघटनांनी बंदची हात दिली होती. त्याला व्यापार्यांनी आपापली प्रतिष्ठान बंद ठेवून उत्स्फूर्त सहभाग नोंदवला.सकाळी १० वाजता शहरातील जुन्या नगरपालिकाजवळील छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याला दुग्धाभिषेक करण्यात आला.यावेळी हजारोच्या संख्येने हिंदुत्ववादी संघटनेचे सदस्य उपस्थित होते.
सोमवारी संवेदनशील भागात पोलिस बंदोबस्त वाढविण्यात आला होता. चौकाचौकांत पोलिस दिसून येत आहेत. सोमवारी बंदोबस्तात मोठी वाढ करण्यात आली. कुणीही कायदा हातात घेण्याचा असे आवाहन पोलिस अधीक्षक श्रवण दत्त.एस.यांनी दिले आहेत.
आक्षेपार्ह पोस्ट व्हायरल केल्यास कारवाई
नंदुरबार जिल्ह्यातील सोशल मिडीयावर २४ तास पोलिसांचा वॉच असून अफवा अथवा आक्षेपार्ह मजकूर प्रसारीत केल्याचे निदर्शनास आल्यास, संबंधितावर कठोर कारवाई करण्याचा इशारा नंदुरबार जिल्हा पोलिस दलाच्यावतीने देण्यात आला आहे. आक्षेपार्ह मजकूर प्रसारीत केल्याचे निदर्शनास आल्यास प्रचलित कायद्यान्वये गुन्हा दाखल करुन कठोर कारवाई करण्याचा इशारा पोलिस अधिक्षक श्रवण दत्त एस. यांनी दिला आहे.