नंदुरबार l प्रतिनिधी
नेट पेपर फुटीची घटना देशात गाजत असताना नंदुरबार जिल्ह्यातील शहादा येथे राज्य शिक्षण परिषदेमार्फत घेण्यात आलेल्या मराठी संगणक टंकलेखन परीक्षेत 19 जून रोजी चक्क 15 डमी विद्यार्थी आढळून आले होते.अखेर नऊ दिवसानंतर याप्रकरणी 32 जणांविरुद्ध शहादा पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
शहादा येथील वसंतराव नाईक हायस्कूल येथे 19 जून रोजी राज्य शिक्षण परिषदेमार्फत मराठी संगणक टंकलेखन परीक्षा घेण्यात आली. या ठिकाणी 24 विद्यार्थी उपस्थित होते. परीक्षा केंद्रावर नायब तहसीलदार शैलेश गवते यांनी भेट दिली. तेथे त्यांनी विद्यार्थ्यांचे हॉल तिकीट व आधार कार्ड यांचे तपासणी केल्यानंतर त्यांना एकूण १५ विद्यार्थी डमी असल्याचे निदर्शनास आले. याबाबत त्याने अहवाल सादर करून प्रभारी शिक्षण अधिकारी पंचायत समिती शहादा योगेश सावळे यांच्याकडे दिला. चौकशीनंतर नऊ दिवसानंतर 32 जणांवर शहादा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
*32 जणांविरुद्ध गुन्हा दाखल*
संगणक टंकलेखन परीक्षेत डमी विद्यार्थी बसवल्याप्रकरणी प्रभारी शिक्षण अधिकारी योगेश सावळे यांच्या फिर्यादीवरून 28 जून रोजी रात्री 11.16 ला गुन्हा दाखल करण्यात आला.केंद्र संचालक महेंद्र भिका मोरे,आयटी शिक्षक गणेश उखा न्हावी यांच्यासह 15 परीक्षार्थी व 15 अज्ञात डमी विद्यार्थी यांच्यावर शहादा पोलीस ठाण्यात भादवी कलम 416,419 सह महाराष्ट्र विद्यापीठाच्या मंडळाच्या व इतर परीक्षेत गैर व्यवहार करण्याबाबत अधिनियम 1982 चे कलम 7 व 8 प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे याप्रकरणी पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक अभिजीत अहिरे यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
*परीक्षेतून डमी विद्यार्थी झाले होते फरार*
राज्य शिक्षण परिषदेमार्फत मराठी संगणक टंकलेखन परीक्षा घेण्यात आली. या ठिकाणी 24 विद्यार्थी उपस्थित होते. परीक्षा केंद्रावर नायब तहसीलदार शैलेश गवते यांनी भेट दिली. नायब तहसीलदारांनी विद्यार्थ्यांचे ओळखपत्र व आधार कार्ड तपासले असता 15 डमी विद्यार्थी आढळून आले त्यानंतर तेथून 15 बोगस विद्यार्थी पसार झाले. नऊ दिवसानंतर ही अज्ञातविरुद्ध विरुद्ध गुन्हे दाखल झाले. मात्र हे बोगस विद्यार्थ्यांचे नाव उघड झाले नाही याबाबत आश्चर्य व्यक्त करण्यात येत आहे.