Public Mirror News
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
Public Mirror News
No Result
View All Result

‘ प्रेमधर्माची ‘ जागा ‘ द्वेषधर्म ‘ घेत आहे; ज्येष्ठ साहित्यिक पीतांबर सरोदे यांचे प्रतिपादन

team by team
October 10, 2021
in शैक्षणिक
0
‘ प्रेमधर्माची ‘ जागा ‘ द्वेषधर्म ‘  घेत आहे; ज्येष्ठ साहित्यिक पीतांबर सरोदे यांचे प्रतिपादन
नंदुरबार l प्रतिनिधी-
 साने गुरुजींनी ‘ प्रेमधर्म ” शिकवला. परंतु दुर्दैवाने हा प्रेमधर्म कमी होऊन द्वेषधर्म त्याची जागा घेत आहे. म्हणून ‘ खरा तो एकची धर्म ‘ या संदेशाचे पाईक होत साने गुरुजींच्या साहित्याला अभ्यासण्यासून समाज मनाची खोलवर नांगरणी करण्याची नितांत गरज असल्याचे मत ज्येष्ठ साहित्यिक प्रा. पीतांबर सरोदे यांनी मांडले.
‘ मातृत्वाची साधना ‘ हे प्रा.पीतांबर सरोदे लिखित व दिवंगत ज्येष्ठ गांधीवादी साहित्यिक प्राध्यापक मु.ब. शाह यांच्या ‘ सानेगुरुजी ‘ या पुस्तकाचे प्रकाशन माजी आमदार श्री राजवर्धन कदमबांडे यांच्या उपस्थित धुळे येथे संपन्न झाले. या कार्यक्रमाप्रसंगी समाजाच्या बदलत्या अभिव्यक्ती व अभिरुची बाबत प्रा. सरोदे यांनी चिंतायुक्त मत मांडले.यावेळी ज्येष्ठ विचारवंत माजी प्राचार्य विश्वास पाटील, शहीद स्मृतीचे कार्यवाह प्रा. राजेंद्र शिंदे,माजी प्राचार्य चंद्रमा पाटील, श्रीमती राजश्री शाह,प्रा. जसपालसिंग राजपूत,सौ.कुंदा सरोदे आदी मान्यवर उपस्थित होते.
हा कार्यक्रम महाराष्ट्र राष्ट्रभाषा सभा पुणे च्या उत्तर महाराष्ट्र विभागीय कार्यालय, धुळे येथील दालनात घेण्यात आला.या कार्यक्रमाप्रसंगी ज्येष्ठ विचारवंत  विश्वास पाटील यांनी पूज्य साने गुरुजी व महात्मा गांधी यांच्या कार्याला व विचारांना उजाळा देऊन नव्या पथकांची निर्मिती होणे आवश्यक असल्याचे मत मांडले. साने गुरुजी व महात्मा गांधी यांचे ग्रंथ हेच त्यांच्या जीवनाची शिकवण आहेत. महात्मा गांधी यांचा ‘ हिंद स्वराज्य ‘  हा ग्रंथ मानवजातीचा 100 वर्षांपूर्वी लिहिलेला जाहीरनामाच आहे. वाचन संस्कृती वाढली पाहिजे. साने गुरुजी व महात्मा गांधी या महामानवांनी आयुष्यभर ग्रंथांचे वाचन केले व स्वतःचे आयुष्य घडवले. तद्वतच आजच्या काळातही ग्रंथ वाचनातून मानव समृद्ध होण्याची अपेक्षा आहे, असे चिंतन त्यांनी मांडले.सूत्रसंचालन  जगदीश देवपूरकर यांनी केले. प्रा.अभिजीत सरोदे यांना राजवर्धन कदमबांडे यांच्याहस्ते गौरविण्यात आले.
बातमी शेअर करा
Previous Post

कोळसाटंचाईचे संकट गडद; विजेचे भारनियमन टाळण्यासाठी महावितरणचे शर्थीचे प्रयत्न सुरू कोळशाअभावी वीजनिर्मिती केंद्रांतील १३ संच बंद सकाळ, संध्याकाळ ६ ते १० पर्यंत वीज कमी वापरा

Next Post

बंद आंदोलन म्हणजे आघाडीची नौटंकीच, आर्थिक संकटात लोटणाऱ्या आंदोलनात लोकांनी सहभागी होऊ नये : विजय चौधरी

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

के.डी. गावित सैनिकी विद्यालयात सामूहिक रक्षाबंधन उत्साहात

के.डी. गावित सैनिकी विद्यालयात सामूहिक रक्षाबंधन उत्साहात

August 30, 2026
नांदरखे येथे रक्षाबंधन उत्साहात साजरा

नांदरखे येथे रक्षाबंधन उत्साहात साजरा

August 30, 2026
राखी बांधून वृक्षसंवर्धनाचा संदेश; शिवदर्शन विद्यालयात रक्षाबंधन उत्साहात

राखी बांधून वृक्षसंवर्धनाचा संदेश; शिवदर्शन विद्यालयात रक्षाबंधन उत्साहात

August 30, 2026
मतदानापासून कोणीही वंचित राहू नये याची खबरदारी घेण्याचे डॉ.विजयकुमार गावित यांचे आवाहन

मतदानापासून कोणीही वंचित राहू नये याची खबरदारी घेण्याचे डॉ.विजयकुमार गावित यांचे आवाहन

August 30, 2026
माजी मंत्री आ. डॉ. विजयकुमार गावित यांना राखी बांधत लाडक्या बहिणींनी दीर्घायुष्य चिंतले

माजी मंत्री आ. डॉ. विजयकुमार गावित यांना राखी बांधत लाडक्या बहिणींनी दीर्घायुष्य चिंतले

August 30, 2026
शहादा येथे तृतीयपंथियांसाठी जाणिव जागृती कार्यशाळा

शहादा येथे तृतीयपंथियांसाठी जाणिव जागृती कार्यशाळा

August 26, 2026

Total Views

  • 4,142,612 hits

मुख्य संपादक

श्री. शांताराम पी. पाटील
8275590450

At.post.Umarde Khurde ta.dist Nandurbar
मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458

  • Home
  • Sample Page

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

कॉपी करू नका.
WhatsApp-Add