नंदुरबार l प्रतिनिधी-
सातत्याने दीड वर्षापासून कोरोना काळामुळे नंदुरबार जिल्ह्यातील छोट्या-मोठ्या व्यवसायांवर संकटे येत आहे व सर्व छोटे मोठे व्यवसाय मोडकळीस आले आहेत जेमतेम आता कुठे सुरुवात होत असतानाच बंद पुकारणे कितपत योग्य आहे ? आर्थिक संकटात आलेल्या सामान्य लोकांना पुन्हा आर्थिक आघात करण्यासारखे आहे म्हणून आम्ही सर्व जनतेला आवाहन करतो कि अशा जनता द्रोही आंदोलनात कोणीही सहभागी होऊ नये.असे आवाहन भाजपा जिल्हाध्यक्ष विजय चौधरी यांनी एका प्रसिध्दी पत्रकाद्वारे केले आहे.
या प्रसिध्दी पत्रकात म्हटले आहे की, एका राज्यातले शेतकरी आत्महत्या करीत आहेत, वीज आणि बँकांच्या वसुलीने त्रासलेला आहे असे असतांना राज्यातील महाविकास आघाडी सरकार शेतकर्यांना आधार वाटेलसे काहीही करू शकलेली नाही आणि कल्याणकारी योजनाही देऊ शकलेले नाही. ते पाप झाकण्याासाठीच महाराष्ट्र राज्यात महाविकास आघाडीचे घटक पक्ष आणि त्यांचे समर्थन करणार्या संघटना योगी सरकारला विरोध दर्शवत बंद आंदोलन पुकारण्याची नौटंकी करीत आहे.
वास्तविक भारतीय जनता पार्टीच्या केंद्र सरकारने सातत्याने शेतकरी हिताच्या योजना राबवणे सुरु ठेवले आहे. शेतकरी सन्मान योजनेच्या माध्यमातून माननीय मोदीजींनी शेतकर्यांच्या हाती पैसा दिला. जेव्हा उध्दव ठाकरे हे मुख्यमंत्री नव्हते तेव्हा ते एकदा थेट शेतकर्यांच्या बांधांवर जाऊन आंदोलन करून आले होते व दरहेक्टरी ५० हजार रुपयांची मदत द्यावी, अशी मागणी मांडली होती. मग आज ते मुख्यमंत्री आहेत. त्यांनी मुख्यमंत्री म्हणून शेतकर्यांना आतापर्यंत कोणताही शब्द पाळून मदत दिलेली नाही. आम्ही त्यांना जाब विचारतो की, अतिवृष्टीमुळे अनेकांचे पीक जमीन वाहून गेल्याने नुकसान झालेल्या शेतकर्यांना दरहेक्टरी ५० हजार रुपयांची मदत करणार आहात का? दिलेले वचन पाळणार आहात का? हे आधी जाहीर करावे. जाणता राजा म्हणवणारे शरदराव पवार देखील अनेक वर्षे केंद्रीय कृषी मंत्री होते. महाराष्ट्राचे मुख्यमंत्री होते. त्यांच्या काळात शेतकर्यांचे कोणते भले झाले? याचा जाहीर जबाब द्यावा. असे प्रसिध्दी पत्रकाद्वारे भाजपा जिल्हाध्यक्ष विजय चौधरी यांनी शासनाला जाब विचारला आहे.