Public Mirror News
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
Public Mirror News
No Result
View All Result

दरा येथे पोलीसांनी जप्त केला अवैध दारूसह साडे सोळा लाखाचा मुद्देमाल, गाडीत सापडली तलवार, चालक झाला फरार

team by team
October 10, 2021
in क्राईम
0
दरा येथे पोलीसांनी जप्त केला अवैध दारूसह साडे सोळा लाखाचा मुद्देमाल, गाडीत सापडली तलवार, चालक झाला फरार

शहादा |  प्रतिनिधी
शहादा – धडगांव रस्त्यावरील दरा फाट्याजवळ पोलीसांनी अवैध दारू विक्री वाहतुक करणार्‍या गाडीसह साडे सोळा लाखाचा मुद्देमाल जप्त केला असुन गाडीतुन तलवार ही जप्त करण्यात आली आहे.याप्रकरणी अज्ञात चालक फरार झाला.पोलीसांनी अज्ञाताविरूध्द गुन्हा दाखल केला आहे.

याबाबत पोलीस सुत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, शनिवारी रात्री नऊ वाजता शहादा म्हसावद धडगांव रोडवरील दरा गावाचे पलिकडे अंदाजे ७०० मिटर अंतरावर सार्वजनिक जागी ११ लाख ३६ हजार ८००  रूपये किंमतीची दारू,व्हिस्की,५ लाख रूपये कींमतीची महेंद्रा बोलेरो गाडी असा एकूण १६ लाख,३६ हजार ८०० रूपयाचा माल म्हसावद पोलीसांनी पकडला आहे.यात  मॅकडॉल्स नंबर-१ रिझर्व व्हिस्की कंपणीचे १८० एम.एल. क्वार्टरचे एकुण ८० बॉक्स, एका बॉक्स मध्ये ४८ नग काचेच्या सिलबंद वाटल्या अशा एकुण ८० वॉक्समधील १८० एम. एल. च्या ३८४० सिलबंद काचेच्या बाटल्या एका बाटलीची किमंत २३५  रु. प्रमाणे ९ लाख २ हजार चारशे रूपये, मॅकडॉल्स नंबर-१ रिझर्व व्हिस्की कंपणीचे ७५० एम.एल.चे एकुण २० बॉक्स, एका बॉक्स मध्ये १२ नग काचेच्या सिलबंद बाटल्या अशा एकुण २० बॉक्समधील ७५० एम.एल. च्या २४० सिलबंद काचेच्या बाटल्या एका बाटलीची किमंत ९६० रु.प्रमाणे २ लाख ३० हजार चारशे रुपये,४ हजार रूपये किंमतीची एक लोखंडी धारदार तलवार, मुठीसह ३२.५ इंच लांब व मुठीपासुन २८ इंच लांब मध्य भागी १ इंच रुंद असलेली पितळी मुठीची लांबी ४.५ इंच लांब अर्ध चंद्रकार धारदार आरोपी ड्रायव्हर सिटच्या मागे मिळुन आली. महिंद्रा बोलेरो कंपणीची पांढर्‍या रंगाची मालवाहु पिक अप निळ्या ताडपत्रीसह  (क्र.एम.एच. ०४ एफ. जे. ६८६७) असा असलेली ५ लाख रूपये किंमतीची असा एकूण १६,३६,८०० चा माल पकडण्यात आला. अज्ञात वाहन चालक याने  वरील वर्णनाचा व किमंतीचा प्रतिबंधीत गुन्ह्याचा माल विना पास परमिट गैर कायदा खेतिया म्हसावद गावाकडुन धडगांव गावाकडे वाहतुक करतांना व पोलीस रेड आल्याचे पाहुन वाहन सोडुन पळुन गेला म्हणून सदर अज्ञात वाहन चालकाविरुध्द पो.हे.कॉ.शैलेंद्रसिंग राजपूत यांनी फिर्याद दिल्यावरून भारतीय हत्यार अधिनियम १९५६ चे कलम ४ चे उल्लंघन २५ प्रमाणे तसेच महाराष्ट्र दारुबंदी कायदा कलम ६५ (ई), १०८ प्रमाणे ुगुन्हा दाखल करण्यात आला आहे.याप्रकरणी पुढील तपास सपोनि निवृत्ती पवार,ठाणे अमंलदार खंडु रतिलाल धनगर करीत आहेत.

बातमी शेअर करा
Previous Post

महाराष्ट्र- गुजरात राज्याच्या सिमेवर जुगार अड्ड्यावर पोलीसांचा छापा, १६ जणांना अटक, दोन लांखांचा मुद्देमाल जप्त

Next Post

कोळसाटंचाईचे संकट गडद; विजेचे भारनियमन टाळण्यासाठी महावितरणचे शर्थीचे प्रयत्न सुरू कोळशाअभावी वीजनिर्मिती केंद्रांतील १३ संच बंद सकाळ, संध्याकाळ ६ ते १० पर्यंत वीज कमी वापरा

Next Post

कोळसाटंचाईचे संकट गडद; विजेचे भारनियमन टाळण्यासाठी महावितरणचे शर्थीचे प्रयत्न सुरू कोळशाअभावी वीजनिर्मिती केंद्रांतील १३ संच बंद सकाळ, संध्याकाळ ६ ते १० पर्यंत वीज कमी वापरा

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

प्रकाशा तीर्थक्षेत्राच्या विकासासाठी 117 कोटींचा आराखडा मुख्यमंत्र्यांकडे सुपूर्त

प्रकाशा तीर्थक्षेत्राच्या विकासासाठी 117 कोटींचा आराखडा मुख्यमंत्र्यांकडे सुपूर्त

July 18, 2026
अत्याधुनिक नवजात अर्भक काळजी विभाग व मातृदूध बँकेचे उद्घाटन

अत्याधुनिक नवजात अर्भक काळजी विभाग व मातृदूध बँकेचे उद्घाटन

July 18, 2026
जिल्ह्यातील पाणी टंचाई असलेल्या गावांना पाणी वाटपाचे तात्काळ नियोजन करावे: पालकमंत्री हसन मुश्रीफ

जिल्ह्यातील पाणी टंचाई असलेल्या गावांना पाणी वाटपाचे तात्काळ नियोजन करावे: पालकमंत्री हसन मुश्रीफ

July 18, 2026
फ्लिपकार्ट फसवणूक रॅकेटचा पर्दाफाश; डिलिव्हरी बॉयच ग्राहकांची करत होते फसवणूक

फ्लिपकार्ट फसवणूक रॅकेटचा पर्दाफाश; डिलिव्हरी बॉयच ग्राहकांची करत होते फसवणूक

July 18, 2026
राणीपूर येथे दोन दिवसीय ‘प्लांट जेनेटिक रिसोर्सेस’ जागरूकता कार्यक्रम उत्साहात

राणीपूर येथे दोन दिवसीय ‘प्लांट जेनेटिक रिसोर्सेस’ जागरूकता कार्यक्रम उत्साहात

July 17, 2026
आषाढी वारीसाठी पंढरपूरला जाणाऱ्या वारकऱ्यांच्या वाहनांना टोल माफी; विनामूल्य पासचे वाटप सुरू

आषाढी वारीसाठी पंढरपूरला जाणाऱ्या वारकऱ्यांच्या वाहनांना टोल माफी; विनामूल्य पासचे वाटप सुरू

July 17, 2026

Total Views

  • 4,142,612 hits

मुख्य संपादक

श्री. शांताराम पी. पाटील
8275590450

At.post.Umarde Khurde ta.dist Nandurbar
मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458

  • Home
  • Sample Page

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

कॉपी करू नका.
WhatsApp-Add