म्हसावद । प्रतिनिधी-
शहादा तालुक्यातील मंदाणे येथील जय भवानी ग्रामीण सहकारी पतसंस्था चे संस्थापक अध्यक्ष डॉ. जितेंद्र साळुंके यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून तब्बल ६ हजार २०० आंब्यांच्या रोपांचे आमदार राजेश पाडवी यांचे हस्ते एका कार्यक्रमात वाटप करण्यात आले. कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी बाजार समितीचे संचालक शिवाजी पाटील हे होते. या आगळ्या वेगळ्या उपक्रमामुळे पर्यावरण प्रेमींसह ग्रामस्थही भारावले.
डॉ जितेंद्र साळुंके व त्यांचे बंधु उपसरपंच शरद साळुंके हे नेहमी समजकार्यात अग्रेसर राहून समाजोपयोगी विविध उपक्रम राबवित असतात. त्यांनी आपल्या वडिलांच्या स्मरणार्थ ( स्व . मंगा शंकर साळुंके) स्वखर्चाने बसशेड बांधून महिला प्रवाशांची सोय करून दिली आहे. तसेच व्यायामशाळेसाठी रस्त्यालगत खाजगी जागा उपलब्ध करून दिली आहे. यावेळी साळुंखे बंधूंनी वाढदिवसाचे औचित्य साधून तब्बल सहा हजार दोनशे आंब्यांची रोपे आणून नागरिकांना वाटप करण्यात आले. या उपक्रमाचे आमदार राजेश पाडवी यांनी कौतुक केले आहे व शेतकरी आणि नागरिकांनी, तरुणांनी पुढाकार घेऊन जास्तीत जास्त झाडे लावून पर्यावरणाचा समतोल राखला पाहिजे. वर्षानुवर्षे पर्यावरणाचा ऱ्हास होत चालल्याने पर्जण्यमानावर मोठ्या प्रमाणात परिणाम होवून दुष्काळ सदृश्य परिस्थिती होत आहे. या पार्श्वभूमीवर या साळुंके बंधूंनी राबविलेला उपक्रम खरोखरच कौतुकास्पद आणि आदर्श निर्माण करणारा आहे. मंदाणे धरणाचा प्रश्नही दिवाळी पूर्वी मार्गी लागेल असेही आश्वासन आमदार राजेश पाडवी यांनी यावेळी दिले.
या प्रसंगी ग्रामस्थांच्या वतीने आमदार राजेश पाडवी यांचे हस्ते डॉ. जितेंद्र साळुंके यांचा शाल व श्रीफळ देऊन सत्कार करण्यात आला. या कार्यक्रमास सरपंच सुशीला भिल, उपसरपंच शरद साळूंके, जय भवानी ग्रामीण सहकारी पतसंस्था चे संस्थापक अध्यक्ष डॉ. जितेंद्र साळुंके, पंचायत समितीचे सदस्य श्रीराम पाटील, लेफ्टनंट ऋषी मोरे,माजी उपसरपंच अनिल भामरे, विनोद जैन, गोपीचंद वाघ,छत्रपाल मोरे, चंद्रकांत मोरे, प्रा. संपत कोठारी, मधुसूदन पटेल, डॉ. सी. डी. पाटील, जगन्नाथ साळुंके, भिमराव साळुंके, शिवाजी मोरे,वसंतबापू मोरे, नरहर मोरे व परिसरातील सरपंच , उपसरपंच व ग्रामस्थ, तरूण वर्ग मोठ्या संख्येने उपस्थित होते. सूत्र संचालन योगेश मराठे यांनी तर आभार प्रदर्शन संजय पाटील यांनी केले. यावेळी काही रोपे गावातील व परीसरात शाळा आणि कॉलेज मध्ये ही वाटप करण्यात आले.