नंदुरबार l प्रतिनिधी
येथील भोई समाजाचे श्री संत भीमा भोई यांच्या जन्मोत्सव निमित्त रक्तदान शिबिरासह विविध धार्मिक व सामाजिक उपक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. गुरुवारी सकाळी आयोजित रक्तदान शिबिरास भोई समाजातील रक्तदात्यांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला.
शहरातील नवी भोई गल्ली परिसरातील सामाजिक सभागृहात रक्तदान शिबिराचा सकाळी शुभारंभ करण्यात आला. याप्रसंगी प्रमुख अतिथी म्हणून नंदुरबार नगरपालिकेचे माजी आरोग्य अधिकारी डॉक्टर अर्जुन लालचंदाणी, सामाजिक कार्यकर्ते मोहितसिंग राजपूत, संतोष वसईकर, उपस्थित होते. श्री संत भीमा भोई जन्मोत्सव समिती, भोई समाज सेवा मंडळ व पंचकमिटी नंदुरबार, आणि समस्त भोई समाज नगर शहर व उपनगर यांच्यातर्फे विविध सामाजिक उपक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे.
सामाजिक उपक्रमांतर्गत स्पर्धा, वैज्ञानिक दृष्टिकोन, शुक्रवार दि. 24 मे रोजी वृक्षारोपण व रोपवाटप कार्यक्रम, शनिवार पंचवीस मे रोजी महिलांसाठी रांगोळी स्पर्धा सकाळी 11 वाजता प्रतिमापूजन समारंभ होईल. 25 मे रोजी सायंकाळी सात वाजता सुंदर कांड व महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले आहे. कार्यक्रमाचे संयोजन भोई समाज कार्यकर्ते इंजिनीयर रामकृष्ण मोरे, डॉ.गणेश ढोले, सुरेश वाडीले, ॲड.प्रकाश भोई,, जितेंद्र भोई, प्रमोद मोरे, ग्रामसेवक राहुल वाडीले, विशाल भोई, राजू भोई, नवनीत वानखेडे, अनिल मोरे, पावभा भोई, नितीन मोरे, हेमराज साठे, प्रभाकर खेडकर, अजय साठे, सागर कन्हेरे, जन्म संयोजन केले आहे. जनकल्याण रक्तपेढीच्या सहकार्याने रक्तदान शिबिर यशस्वी पार पडले.
यावेळी डॉक्टर लालचंदाणी, सचिन जोशी, मधुसूदन वाघमारे, अशी जैन, शेखर पाटील, संजय सूर्यवंशी, तेजस पाटील यांचे सहकार्य लाभले.