नंदुरबार l प्रतिनिधी
नंदुरबार लोकसभेच्या 11 उमेदवारांसाठी उद्या 13 मे रोजी मतदान होणार आहे.मतदानासाठी 2 हजार 115 मतदान केंद्र आहे.यात 19 लाख 58 हजार मतदार आपला मतदानाचा हक्क बजावणार आहेत.मतदान केंद्राच्या 100 मीटर परिसरात मोबाईल घेऊन जाण्यास बंदी असल्याची माहिती जिल्हाधिकारी मनीषा खत्री यांनी दिली.
सोमवारी होणाऱ्या मतदानासाठी रविवारी सकाळपासूनच मतदान कर्मचाऱ्यांना मतदान साहित्याचे वाटप करून त्यांना त्याच्या नियुक्त मतदान केंद्रावर रवाना करण्यात आले. त्यासाठी त्या त्या विधानसभा मतदारसंघांतर्गत नियोजन करण्यात आले आहे.
मतदारसंघातील एकूण २,११५ मतदान केंद्रांवर कर्मचारी रवाना झाले मतदानासाठी जवळपास साडेआठ हजार कर्मचाऱ्यांची नियुक्ती करण्यात आली आहे. त्या त्या विधानसभा मतदारसंघनिहाय असलेल्या मतदान केंद्रात तेवढेच मतदान केंद्र, कंट्रोल युनिट व व्हीव्हीपॅट दिले.
मुख्यालयी २० टक्के राखीव मतदान यंत्र, कंट्रोल युनिट व व्हीव्हीपॅट सज्ज राहणार आहेत. एखाद्या मतदान केंद्रात संबंधित यंत्रात काही बिघाड झाल्यास अवघ्या काही मिनिटात ते त्या केंद्रावर पोहोचविले जाणार आहे.
मतदान कर्मचाऱ्यांना मतदान केंद्रापर्यंत पोहोचविण्यासाठी जिल्हा प्रशासनाने ११५ बसेस, ४६९ जीप, दोन बार्ज, १३० क्रूझर, १२ ट्रक, २४ स्कूलबस अशी एकूण ७५२ वाहने सज्ज ठेवली आहेत. सर्वाधिक वाहने ही अक्कलकुवा विधानसभा मतदारसंघात ३०१ असून, शहादा १८१, नंदुरबार १४४, तर नवापूर मतदारसंघात १२६ वाहने सज्ज आहेत.
नंदुरबार लोकसभा मतदानासाठी प्रशासनाकडून पूर्ण तयारी झाली असून, आज मतपेट्यांच्या वाटप होत आहे. नंदुरबार लोकसभा मतदानासाठी 2115 मतदान केंद्र आहे तर 600 पेक्षा अधिक वाहन यासाठी लागणार असून, तर मोठ्या प्रमाणावर पोलीस बंदोबस्त देखील तैनात करण्यात आलेला आहे केरला पोलीस एस आर पी आणि नंदुरबार पोलीस असे एकूण दोन हजारापेक्षा अधिक पोलीस जवान या निवडणुकीसाठी तैनात करण्यात आलेले आहेत.
सातपुड्यातील नर्मदा काठावरील पाच मतदान केंद्रात मतदान कर्मचारी आपल्या मतदान साहित्यासह स्वाना झाले. या कर्मचाऱ्यांना गुजरातमधील केवडीया येथे रवाना करण्यात आले. तेथून ते बार्जने नर्मदेच्या पाण्यातून मतदान केंद्राकडे निघाले. सायंकाळी कर्मचारी आपापल्या मतदान केंद्रात पोहचले, राज्यातील पहिले मतदान केंद्र मनिबेली केंद्रात कर्मचारी रवाना करण्यात आले.
नंदुरबार लोकसभेच्या 11 उमेदवारांसाठी उद्या 13 मे रोजी मतदान होणार आहे.मतदानासाठी 2 हजार 115 मतदान केंद्र आहे.यात 19 लाख 58 हजार मतदार आपला मतदानाचा हक्क बजावणार आहेत.मतदान केंद्राच्या 100 मीटर परिसरात मोबाईल घेऊन जाण्यास बंदी असल्याची माहिती जिल्हाधिकारी मनीषा खत्री यांनी दिली.