Public Mirror News
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
Public Mirror News
No Result
View All Result

वंचितचा जो अधिकार आहे, त्याचे आम्ही चौकीदार : पंतप्रधान नरेंद्र मोदी

team by team
May 10, 2024
in राजकीय
0
वंचितचा जो अधिकार आहे, त्याचे आम्ही चौकीदार : पंतप्रधान नरेंद्र मोदी

नंदुरबार | प्रतिनिधी
गेल्या ४० ते ५० वर्षांपासून महाराष्ट्राचे एक दिग्गज नेते राजकारणात सक्रीय आहेत. ते सध्या काहीही बोलत आहेत. बारामतीच्या निवडणुकीनंतर ते चिंतेत गेले असून लोकसभा निवडणुकीच्या निकालानंतर काही प्रादेशिक पक्ष काँग्रेसमध्ये विलीन होतील असे म्हणत आहेत. लोकसभेच्या निवडणुकीनंतर शरद पवारांनी एकनाथ शिंदे, अजित पवारांसोबत एनडीएमध्ये यावं, त्यांची सगळी स्वप्न पूर्ण होतील अशी ऑफर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देत काँग्रेसवर प्रहार करीत वंचितचा जो अधिकार आहे, त्याचे आम्ही चौकीदार आहोत.

 

 

 

नंदुरबार येथे महायुतीच्या उमेदवार डॉ.हिना गावीत यांच्या प्रचारार्थ नंदुरबार येथे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची महाविजय संकल्प सभेत मार्गदर्शन करत होते त्या प्रसंगी ते बोलत होते. श्री.मोदी पुढे म्हणाले की, गेल्या ४० ते ५० वर्षांपासून महाराष्ट्राचे एक दिग्गज नेते राजकारणात सक्रीय आहेत. ते सध्या काहीही बोलत आहेत. बारामतीच्या निवडणुकीनंतर ते चिंतेत गेले असून त्यांनी अनेक लोकांसोबत विचार करुन असे वक्तव्य केले असावे असे मला वाटते. चार जूननंतर सार्वजनिक आणि राजकीय जीवनामध्ये टिकून राहायचे असेल तर छोट्या-छोट्या पक्षांना काँग्रेसमध्ये विलीन व्हावे लागेल असे त्यांना वाटत आहे.

 

https://publicmirrornews.com/wp-content/uploads/2024/05/VID-20240510-WA0161.mp4

 

 

असे सांगत शरद पवारांनी एकनाथ शिंदे, अजित पवारांसोबत एनडीएमध्ये यावं, त्यांची सगळी स्वप्न पूर्ण होतील” अशी ऑफर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दिली . पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सुरुवातीला मराठीतून संवाद साधत. देवमोगरा मातेची भुमिला नमन करीत.अक्षय तृतीयेच्या शुभेच्छा देत अक्षय तृतीयेला मिळालेला आशीर्वाद अक्षय आशीर्वाद असतो असे सांगत.काँग्रेस खतरनाक अजेंडा राबवित आहेत धर्माच्या आधारावर आरक्षण हे बाबासाहेब आंबेडकर आणि संविधानाच्या भावनेच्या विरोधात आहे. दलित, मागास, आदिवासी यांचे आरक्षण काढून आपल्या वोटबँकला देण्याचा काँग्रेसचा एजेंडा आहे” असा आरोप पंतप्रधान मोदी यांनी केला.काँग्रेस संविधान व आरक्षणाबाबत खोटे प्रचार करीत आहेत असे सांगत चोर मचाये शोर असा टोला हाणला बाबसाहेब आंबेडकर यांच्या विरोधात पाप काँग्रेस करीत आहेत.काँग्रेसवर प्रहार करीत वंचितचा जो अधिकार आहे, त्याचे आम्ही चौकीदार आहोत” असे सांगत कोणी आईचे दूध पिले असेल त्याने आरक्षणाला हात लावून दाखवावे असे आव्हान पंतप्रधान मोदी यांनी या वेळी दिले.

 

 

 

 

काँग्रेसच्या शहजादेचे गुरु देशातील वर्ण देशाची तिप्पटी करतात असे सांगत काँग्रेसने आदिवासींना सन्मान दिला नाही.राष्ट्रपती द्रोपती मुर्मु यांच्या निवडीलाही विरोध केला असे सांगत आम्ही शबरी मातेचे पूजन करणारे असून देशाला स्वातंत्र्य मिळवून देण्यासाठी अनेक आदिवासी क्रांतिकारकांनी बलिदान दिले.मात्र काँग्रेसला एकच परिवाराचे बलिदान दिसते असे सांगत आदिवासी क्रांतिकारकांची आठवण पुढील पिढीला रहावी यासाठी म्युझियम उभारणार आहोत असे सांगत आदिवासींची चिंता आम्हाला असल्याने कुपोषण सिकलसेल मुक्तीसाठी आम्ही प्रयत्न करीत आहोत असे श्री.मोदी यांनी सांगितले.पुढे ते म्हणाले की, नकली शिवसेना व नकली राष्ट्रवादी यांच्या सोबत बॉम्बस्फोट मधील अतिरेकी प्रचार करीत आहेत तर बिहारमध्ये चारा घोटाळ्याचे आरोपी सोबत आहेत अशा लोकांच्या खांद्यावर काँग्रेस चालत आहेत असा घनाघात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केला.

 

 

 

 

यावेळी सभेला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस पालकमंत्री अनिल पाटील आदिवासी विकास मंत्री डॉ. विजयकुमार गावित आमदार आमश्या पाडवी आमदार राजेश पाडवी काशीराम पावरा मंजुळा गावित अमरीशभाई पटेल, चंद्रकांत रघुवंशी महामंत्री विजय चौधरी, माजी मंत्री पद्माकर व्हावी जिल्हा परिषद अध्यक्ष सुप्रिया गावित, महायुतीच्या उमेदवार डॉक्टर हिना गावित, डॉ.अभिजीत मोरे महायुतीतील पक्षाचे पदाधिकारी आदी उपस्थित होते.

 

 

 

 

यावेळी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी अहिराणी भाषेतून सुरुवात केली ते पुढे म्हणाले की संविधान बदलण्याचे खोटे प्रचार विरोधी पक्षातर्फे सुरू आहे आदिवासी ही वोट बँक नाहीतर देशाचा गौरव आहे असे सांगत बाबा साहेबांचा काँग्रेस अपमान करत आहे काँग्रेस पाकिस्तानची भाषा बोलू लागला आहे भाकरी खायची भारताची चाकरी करायची पाकिस्तानची असा एजेंडा काँग्रेस राबवत आहे. ही निवडणूक म्हणजे महासत्ता घडवणारी निवडणूक आहे असे यावेळी एकनाथ शिंदे यांनी सांगितले.

 

 

 

 

उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले की नंदुरबार जिल्ह्यातील मागासलेपणा दूर करण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आकांक्षा जिल्हा म्हणून मान्यता दिली भाजपाकडे पूर्ण बहुमत असतानाही दोन पंचवार्षिक मध्ये आरक्षणाला कुठलाही धक्का लावला नाही असे सांगत काँग्रेसच्या पोपाट मिठू मिठू बोलायला लागला आहे. भाजपाने संविधान मजबूत केले आहे बाबासाहेबांचे संविधान होते त्यामुळे चाय वाला पंतप्रधान होऊ शकला असे सांगत नंदुरबार जिल्ह्यातील तापी बुराई योजनेला मान्यता देण्यात आली असून 800 कोटी मंजुर करण्यात आले आहे असे सांगत नर्मदा तापी वळण बंधारा सिंचन करण्याचा संकल्प आहे ऊकाई बॅक वॉटरद्वारे नंदुरबारात सिंचनाची सोय होणार आहे असे देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले.

 

 

 

* पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे मराठीतून तर एकनाथ शिंदे यांची अहिराणीतून भाषणाला सुरुवात.

*11.33 ला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे स्टेजवर आगमन

*पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे 37 मिनट 45 सेकंद भाषण

*सुमारे एक लाखाची उपस्थिती, मोठा पोलीस बंदोबस्त

बातमी शेअर करा
Previous Post

शिवसैनिकांवर अन्याय होणार नाही; पुन्हा नवा अध्याय सुरू करा : मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी घेतली गॅरंटी

Next Post

उमर्दे खुर्द येथे श्री खंडेराव महाराज यात्रोत्सवानिमित्त हजारोंच्या उपस्थितीत ओढण्यात आल्या बारा गाड्या

Next Post
उमर्दे खुर्द येथे श्री खंडेराव महाराज यात्रोत्सवानिमित्त हजारोंच्या उपस्थितीत ओढण्यात आल्या बारा गाड्या

उमर्दे खुर्द येथे श्री खंडेराव महाराज यात्रोत्सवानिमित्त हजारोंच्या उपस्थितीत ओढण्यात आल्या बारा गाड्या

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

शहाद्याच्या सार्थक पाटीलला रोबोटिक्स ऑलिंपियाडमध्ये सुवर्णपदक

शहाद्याच्या सार्थक पाटीलला रोबोटिक्स ऑलिंपियाडमध्ये सुवर्णपदक

January 22, 2026
शाश्वत शेतीसाठी जैविक कीड नियंत्रण काळाची गरज; नंदुरबार कृषी महाविद्यालयात प्रशिक्षण

शाश्वत शेतीसाठी जैविक कीड नियंत्रण काळाची गरज; नंदुरबार कृषी महाविद्यालयात प्रशिक्षण

January 22, 2026
अविश्वास प्रस्तावावर निर्णय घेण्यासाठी, 27 जानेवारीला विशेष ग्रामसभेचे आयोजन

अविश्वास प्रस्तावावर निर्णय घेण्यासाठी, 27 जानेवारीला विशेष ग्रामसभेचे आयोजन

January 22, 2026
सहकार आयुक्त दिपक तावरे यांनी केली, पतसंस्थांच्या संगणकीकरणाच्या कामाची पाहणी

सहकार आयुक्त दिपक तावरे यांनी केली, पतसंस्थांच्या संगणकीकरणाच्या कामाची पाहणी

January 22, 2026
नंदुरबार जिल्हास्तरीय विज्ञान प्रदर्शनाचा दिमाखदार समारोप; विद्यार्थ्यांच्या वैज्ञानिक प्रतिभेचा गौरव

नंदुरबार जिल्हास्तरीय विज्ञान प्रदर्शनाचा दिमाखदार समारोप; विद्यार्थ्यांच्या वैज्ञानिक प्रतिभेचा गौरव

January 22, 2026
हिंदुत्वाचे सैनिक बनून संघटित व्हा आणि हिंदू मतांची वोट बँक स्थापन करा :  कालीचरण महाराज

हिंदुत्वाचे सैनिक बनून संघटित व्हा आणि हिंदू मतांची वोट बँक स्थापन करा : कालीचरण महाराज

January 22, 2026

Total Views

  • 4,142,612 hits

मुख्य संपादक

श्री. शांताराम पी. पाटील
8275590450

At.post.Umarde Khurde ta.dist Nandurbar
मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458

  • Home
  • Sample Page

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

कॉपी करू नका.
WhatsApp-Add