Public Mirror News
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
Public Mirror News
No Result
View All Result

शिवसैनिकांवर अन्याय होणार नाही; पुन्हा नवा अध्याय सुरू करा : मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी घेतली गॅरंटी

team by team
May 10, 2024
in राजकीय
0
शिवसैनिकांवर अन्याय होणार नाही; पुन्हा नवा अध्याय सुरू करा : मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी घेतली गॅरंटी

नंदुरबार l प्रतिनिधी
शिवसेना पदाधिकाऱ्यांच्या मतदारसंघांमध्ये निधीबाबत दुरावा निर्माण झाल्याची भावना निर्माण झाली होती. याबाबत उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस,मंत्री डॉ. विजयकुमार गावित व माजी आ.चंद्रकांत रघुवंशी यांच्यात मोकळेपणाने चर्चा करण्यात आलेली आहे. यापुढे शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांवर अन्याय होणार नाही याची आम्ही जबाबदारी घेतलेली आहे.मागचं झालं गेलेलं आलेलं विसरून पुन्हा नवा अध्याय सुरू करून पंतप्रधान मोदींना पंतप्रधान करण्याचे आवाहन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केले.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या सभेनंतर आमदार कार्यालयात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या प्रमुख उपस्थितीत शिवसेना (शिंदे गट) पदाधिकाऱ्यांची बैठक घेण्यात आली त्या प्रसंगी त्यांनी शिवसैनिकांना मार्गदर्शन केले. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे माजी नगराध्यक्षा सौ.रत्ना रघुवंशी यांनी औक्षण करून स्वागत केले. बैठकीचे प्रास्ताविक शिवसेनेचे नेते तथा माजी आमदार चंद्रकांत रघुवंशी यांनी केले.

यावेळी मुख्यमंत्री शिंदे म्हणाले, नंदुरबार जिल्ह्यात शिवसेनेचे मोठ्या प्रमाणावर ताकद आहे. मंत्री डॉ. विजयकुमार गावित व माजी आ.चंद्रकांत रघुवंशी यांच्यातील दुराव्याची चर्चा या अगोदरच व्हायला पाहिजे होती. परंतु, त्याला उशीर झाला होता.पण आता योग्य वेळी स्पष्ट व मोकळेपणाने चर्चा झालेली आहे. शिवसेनेच्या कार्यकर्त्यांनी कालपर्यंत झालेलं विसरून जावं. जे कार्यकर्ते इकडे तिकडे गेलेले असतील त्यांना जिल्हाप्रमुखांनी पुन्हा बैठक घेऊन बोलवावे.

यावेळी जिल्हाप्रमुख आ. निर्मला गावित,ॲड.राम रघुवंशी,किरसिंग वसावे, माजी नगराध्यक्षा रत्ना रघुवंशी,महिला आघाडी जिल्हाप्रमुख ज्योती राजपूत, धुळ्याचे जिल्हाध्यक्ष सतीश महाले यांच्यासह शिवसेनेचे सर्व पदाधिकारी, नगरसेवक,विविध गावातील सरपंच तसेच कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

 

 

आमदार कार्यालयाला दिली भेट

आमदार कार्यालयात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सदिच्छा भेट दिली. यावेळी ढोल ताशांच्या गजर व फटाक्यांची आतिषबाजी करण्यात आली होती. प्रसंगी माजी आमदार चंद्रकांत रघुवंशी यांनी आमदार कार्यालयात लावण्यात आलेले संग्रहित फोटोंची भित्ती पत्रिका मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना दाखवण्यात आली.

बातमी शेअर करा
Previous Post

डॉ. हिना गावित यांच्या प्रचारार्थ आज नंदुरबार येथे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची महाविजय संकल्प सभा

Next Post

वंचितचा जो अधिकार आहे, त्याचे आम्ही चौकीदार : पंतप्रधान नरेंद्र मोदी

Next Post
वंचितचा जो अधिकार आहे, त्याचे आम्ही चौकीदार : पंतप्रधान नरेंद्र मोदी

वंचितचा जो अधिकार आहे, त्याचे आम्ही चौकीदार : पंतप्रधान नरेंद्र मोदी

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

राजर्षी छत्रपती शाहू महाराज जयंती उत्साहात साजरी

राजर्षी छत्रपती शाहू महाराज जयंती उत्साहात साजरी

June 28, 2026
३२ दुचाकी चोरीचा पर्दाफाश; तीन सराईत जेरबंद, तब्बल ३०लाखांचा मुद्देमाल जप्त

३२ दुचाकी चोरीचा पर्दाफाश; तीन सराईत जेरबंद, तब्बल ३०लाखांचा मुद्देमाल जप्त

June 28, 2026
मोलगीतील स्टंटबाजावर पोलिसांची कारवाई;  गुन्हा दाखल

मोलगीतील स्टंटबाजावर पोलिसांची कारवाई; गुन्हा दाखल

June 28, 2026
नवापूर पोलिसांची कारवाई; ३५ लाखांचा प्रतिबंधित गुटखा, सुगंधी तंबाखू व कंटेनर जप्त

नवापूर पोलिसांची कारवाई; ३५ लाखांचा प्रतिबंधित गुटखा, सुगंधी तंबाखू व कंटेनर जप्त

June 28, 2026
कोपर्ली इंदाणी विद्यालयात जागतिक योग दिन उत्साहात साजरा

कोपर्ली इंदाणी विद्यालयात जागतिक योग दिन उत्साहात साजरा

June 24, 2026
आंतरराज्यीय टोळी जेरबंद, १५ गुन्हे उघड

आंतरराज्यीय टोळी जेरबंद, १५ गुन्हे उघड

June 24, 2026

Total Views

  • 4,142,612 hits

मुख्य संपादक

श्री. शांताराम पी. पाटील
8275590450

At.post.Umarde Khurde ta.dist Nandurbar
मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458

  • Home
  • Sample Page

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

कॉपी करू नका.
WhatsApp-Add