नंदुरबार l प्रतिनिधी
नंदुरबार येथे ॲड.गोवाल पाडवी यांच्या प्रचारार्थ प्रियंका गांधी यांची 9 मे रोजी प्रचार सभेचे आयोजन करण्यात आले आहे.
महाविकास आघाडीचे नंदुरबार लोकसभा मतदार संघाचे उमेदवार ॲड.गोवाल के.पाडवी यांच्या प्रचारार्थ भारतीय काँग्रेसच्या महासचिव काँग्रेस नेत्या प्रियंकाजी गांधी यांची 9 मे 2024 रोजी सकाळी 9 वा. विलासराव देशमुख ट्रक टर्मिनल समोरील मैदान ,
बायपास रोड, नंदुरबार येथे जाहीर सभा आयोजित करण्यात आली आहे.त्यांच्या सभेची जिल्हा वासियांना उत्सुकता लागली आहे. जाहीर सभेला मोठ्या संख्येने उपस्थित राहण्याचे आवाहन आमदार ॲड. के. सी पाडवी यांनी केले आहे.