Public Mirror News
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
Public Mirror News
No Result
View All Result

ज्यांना मी घडवले त्यांनीच धोका दिला, आमच्या त्या विरोधकांना लोक नक्की जागा दाखवतील : मंत्री डॉ. विजयकुमार गावित

team by team
May 5, 2024
in राजकीय
0
ज्यांना मी घडवले त्यांनीच धोका दिला, आमच्या त्या विरोधकांना लोक नक्की जागा दाखवतील : मंत्री डॉ. विजयकुमार गावित

नंदुरबार l प्रतिनिधी
युतीधर्म निभवायला सोबत येण्याच्या गप्पा मारायच्या आणि धक्का देण्याचे कारस्थानही रचायचे, असे दुटप्पी मित्र मला राजकारणात आल्यापासून लाभले आहेत. ज्यांची नगरसेवक म्हणून निवडून येण्याची पात्रता नव्हती त्यांना आम्ही नगराध्यक्ष केले. ज्यांची ताकद झेडपी गटाच्या पलीकडे नव्हती त्यांना जिल्हास्तरावर नावाजून दिलं,

ते लोक आमच्या विरोधात सभा घेतात. परंतु जनतेला हे सगळे माहीत असल्यामुळे आज जनता आमच्या पाठीशी असून त्यांच्या विरोधाला कोणताही जनाधार उरलेला नाही; या शब्दात महाराष्ट्राचे आदिवासी विकास मंत्री डॉ.विजयकुमार गावित यांनी आपल्या विरोधकांचा खरपूस समाचार घेतला.

नंदुरबार तालुक्यातील पथराईसह दहा-बारा गावांमधील ग्रामस्थांशी मंत्री डॉक्टर विजयकुमार गावित यांनी प्रत्यक्ष संपर्क केला. तसेच काही गावांमध्ये प्रचारार्थ भेटी दिल्या. स्थानिक कार्यकर्त्यांच्या आणि ग्रामस्थांच्या भेटीगाठी घेणे, बैठका घेणे, स्थानिक समस्यांवर चर्चा करणे यावर त्यांनी भर दिला.

या दरम्यान झालेल्या कॉर्नर सभांमधून त्यांनी काँग्रेस कडून होत असलेल्या खोट्या प्रचाराचा समाचार घेतला. आमचे विरोधक कधीही स्वतः ठोस विकास काम करू शकले नाही त्यामुळे येता जाता खोट्या गोष्टींचा आधार घेत आहेत. सर्वाधिक काळ सत्तेत राहून सुद्धा काँग्रेस पक्षाने कधीही आदिवासींना खरा न्याय मिळवून दिला नाही त्यांना साधे वनपट्टे सुद्धा वेळेवर दिले नाही.

मोदी सरकारच्या काळात मात्र वनगावे वनपट्टे सगळ्यांचेच प्रश्न सुटले. नंदुरबार लोकसभा मतदारसंघातील लाखो घरांना आम्ही घरे दिली, लहान गावात सुद्धा काँक्रिटीकरण केले, महिलांना रोजगार आणि पाण्याची सुविधा दिली. मतदारांनी वारंवार संधी देऊन सुद्धा ज्यांना कधी विकास करता आला नाही, ते काँग्रेस नेते खोटं बोलून लोकांची दिशाभूल करीत आहे आणि आता आरक्षण, संविधान आणि त्यासारखे मुद्दे घेऊन पुन्हा मतं मागायला येत आहेत. खोटारडेपणा करून दिशाभूल करणाऱ्या अशा नेत्यांना जागा दाखवा; अशा घणाघाती शब्दात मंत्री डॉक्टर विजयकुमार गावित यांनी विरोधकांवर हल्लाबोल केला.

बातमी शेअर करा
Previous Post

लोकसभा निवडणुकीच्या अनुषंगाने म्हसावद गावात करण्यात आला रूट मार्च

Next Post

नंदुरबार येथे ॲड.गोवाल पाडवी यांच्या प्रचारार्थ प्रियंका गांधी यांची 9 मे रोजी जाहीर सभा

Next Post
नंदुरबार येथे ॲड.गोवाल पाडवी यांच्या प्रचारार्थ  प्रियंका गांधी यांची 9 मे रोजी जाहीर सभा

नंदुरबार येथे ॲड.गोवाल पाडवी यांच्या प्रचारार्थ प्रियंका गांधी यांची 9 मे रोजी जाहीर सभा

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

अवैध दारूचा साठा व वाहतूक करणाऱ्यांवर स्थानिक गुन्हे शाखेची कारवाई, तब्बल ५६ लाखांचं मुद्देमाल जप्त

अवैध दारूचा साठा व वाहतूक करणाऱ्यांवर स्थानिक गुन्हे शाखेची कारवाई, तब्बल ५६ लाखांचं मुद्देमाल जप्त

May 23, 2026
पेट्रोल-डिझेलचा कोणताही तुटवडा नाही : जिल्हाधिकारी डॉ. मित्ताली सेठी

पेट्रोल-डिझेलचा कोणताही तुटवडा नाही : जिल्हाधिकारी डॉ. मित्ताली सेठी

May 23, 2026
राष्ट्रीय मानवाधिकार आयोगाचे सदस्य प्रियांक कानूनगो यांच्या अध्यक्षतेखाली बैठक

राष्ट्रीय मानवाधिकार आयोगाचे सदस्य प्रियांक कानूनगो यांच्या अध्यक्षतेखाली बैठक

May 21, 2026
माझी लाडकी बहीण योजनेच्या ई-केवायसी बाबतच्या अफवांवर विश्वास ठेवू नका

माझी लाडकी बहीण योजनेच्या ई-केवायसी बाबतच्या अफवांवर विश्वास ठेवू नका

May 21, 2026
भालेर येथे भव्य महारोजगार मेळाव्यास उत्स्फूर्त प्रतिसाद

भालेर येथे भव्य महारोजगार मेळाव्यास उत्स्फूर्त प्रतिसाद

May 21, 2026
20 मे रोजी औषध दुकाने बंद राहण्याची शक्यता

20 मे रोजी औषध दुकाने बंद राहण्याची शक्यता

May 19, 2026

Total Views

  • 4,142,612 hits

मुख्य संपादक

श्री. शांताराम पी. पाटील
8275590450

At.post.Umarde Khurde ta.dist Nandurbar
मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458

  • Home
  • Sample Page

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

कॉपी करू नका.
WhatsApp-Add