Public Mirror News
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
Public Mirror News
No Result
View All Result

मंत्री डॉ. विजयकुमार गावितही करताहेत दूर्गम गावांमधून डॉ. हिना गावित यांच्या प्रचारार्थ धावते दौरे

team by team
May 4, 2024
in राजकीय
0
मंत्री डॉ. विजयकुमार गावितही करताहेत दूर्गम गावांमधून डॉ. हिना गावित यांच्या प्रचारार्थ धावते दौरे

नंदुरबार l प्रतिनिधी
महायुतीच्या तथा भारतीय जनता पार्टीच्या उमेदवार डॉक्टर हिनाताई विजयकुमार गावित यांच्या प्रचारासाठी त्यांचे पिताश्री तथा महाराष्ट्राचे आदिवासी विकास मंत्री नामदार डॉक्टर विजयकुमार गावित हे स्वतः दुर्गम भागापर्यंत मतदारांशी संपर्क करून आपल्या लेकीसाठी परिश्रम घेत आहेत. तर, डॉक्टर हिना गावित यांच्या लहान भगिनी तथा नंदुरबार जिल्हा परिषदेच्या अध्यक्षा डॉक्टर सुप्रिया गावित या सुद्धा गावागावात संपर्क करण्यात मग्न असलेल्या दिसत आहे.

 

दरम्यान मंत्री डॉक्टर विजयकुमार गावित यांनी काल दिनांक 2 मे 2024 रोजी शिरपूर तालुक्यातील बोराडी, पळासनेर आणि अन्य गावपट्ट्यात प्रत्यक्ष संपर्क केला. तसेच आज दिनांक 3 मे 2024 रोजी अक्कलकुवा तालुक्यातील वेली, काकड खुंट आणि अन्य दुर्गम गावांमध्ये प्रचारार्थ भेटी दिल्या.

 

 

स्थानिक कार्यकर्त्यांच्या आणि ग्रामस्थांच्या भेटीगाठी घेणे, बैठका घेणे, स्थानिक समस्यांवर चर्चा करणे यावर त्यांनी भर दिला. या दरम्यान झालेल्या कॉर्नर सभांमधून त्यांनी काँग्रेस कडून केला जात असलेल्या खोट्या प्रचाराचा समाचार घेतला. आमचे विरोधक कधीही स्वतः ठोस विकास काम करू शकले नाही त्यामुळे येता जाता खोट्या गोष्टींचा आधार घेत आहेत.

 

 

भाजपाचे प्रमुख नेते अमित शहा यांच्या खोडसाळपणा करून बनवलेल्या खोट्या व्हिडिओ क्लिपचा आधार घेत आरक्षणाला धोका असल्याचे वारंवार खोटं सांगत आहेत. संविधानाला धोका असल्याचे सांगून दिशाभूल करतात. वास्तविक काँग्रेस राजवटीतच शेकडो वेळा संविधानामध्ये त्यांनी पाहिजे तसे बदल केले आहेत, असे डॉक्टर विजयकुमार गावित म्हणाले. सर्वाधिक काळ सत्तेत राहून सुद्धा काँग्रेस पक्षाने कधीही आदिवासींना खरा न्याय मिळवून दिला नाही त्यांना साधे वनपट्टे सुद्धा वेळेवर दिले नाही.

 

 

मोदी सरकारच्या काळात मात्र वनगावे वनपट्टे सगळ्यांचेच प्रश्न सुटले. नंदुरबार लोकसभा मतदारसंघातील लाखो घरांना आम्ही घरे दिली, लहान गावात सुद्धा काँक्रिटीकरण केले, महिलांना रोजगार आणि पाण्याची सुविधा दिली.

 

 

मतदारांनी वारंवार संधी देऊन सुद्धा ज्यांना कधी विकास करता आला नाही, ते काँग्रेस नेते खोटं बोलून लोकांची दिशाभूल करीत आहे आणि आता आरक्षण, संविधान आणि त्यासारखे मुद्दे घेऊन पुन्हा मतं मागायला येत आहेत. खोटारडेपणा करून दिशाभूल करणाऱ्या अशा नेत्यांना जागा दाखवा; अशा घणाघाती शब्दात मंत्री डॉक्टर विजयकुमार गावित यांनी विरोधकांवर हल्लाबोल केला.

बातमी शेअर करा
Previous Post

लोकसभा निवडणुकीच्या काळात जिल्हा पोलीसांनी विविध कारवाईत 3 कोटीचा मुद्देमाल केला जप्त

Next Post

राज्यस्तरीय कराटे स्पर्धेत मुलींनी मारली बाजी

Next Post
राज्यस्तरीय कराटे स्पर्धेत मुलींनी मारली बाजी

राज्यस्तरीय कराटे स्पर्धेत मुलींनी मारली बाजी

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

द फ्युचर स्टेप इंग्लिश मीडियम स्कूलमध्ये प्रवेश उत्सव उत्साहात

द फ्युचर स्टेप इंग्लिश मीडियम स्कूलमध्ये प्रवेश उत्सव उत्साहात

June 12, 2026
बँक खात्यांच्या ‘म्युल अकाऊंट’ रॅकेटचा नंदुरबारात पर्दाफाश

गुजरातमधून एचटीबीटी बियाण्यांची महाराष्ट्रात प्रतीकात्मक एंट्री, सीमेवर शेकडो शेतकरी उपस्थित

June 12, 2026
बँक खात्यांच्या ‘म्युल अकाऊंट’ रॅकेटचा नंदुरबारात पर्दाफाश

बँक खात्यांच्या ‘म्युल अकाऊंट’ रॅकेटचा नंदुरबारात पर्दाफाश

June 12, 2026
शेतकरी व नागरिकांना इंधनाची कमतरता भासू देऊ नका

शेतकरी व नागरिकांना इंधनाची कमतरता भासू देऊ नका

June 5, 2026
ड्रोन तंत्रज्ञानामुळे दुर्गम भागातील नागरिकांपर्यंत आरोग्य सेवा

ड्रोन तंत्रज्ञानामुळे दुर्गम भागातील नागरिकांपर्यंत आरोग्य सेवा

June 5, 2026
शेतकऱ्यांनी पुरेसा पाऊस झाल्याशिवाय पेरणीची घाई करू नये

शेतकऱ्यांनी पुरेसा पाऊस झाल्याशिवाय पेरणीची घाई करू नये

June 5, 2026

Total Views

  • 4,142,612 hits

मुख्य संपादक

श्री. शांताराम पी. पाटील
8275590450

At.post.Umarde Khurde ta.dist Nandurbar
मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458

  • Home
  • Sample Page

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

कॉपी करू नका.
WhatsApp-Add