Public Mirror News
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
Public Mirror News
No Result
View All Result

अनधिकृत कंपन्यांचे बोगस बियाणे खरेदी करू नये,कृषि विभागाकडून भरारी पथकाची नेमणूक

Mahesh Patil by Mahesh Patil
May 3, 2024
in राज्य
0
अनधिकृत कंपन्यांचे बोगस बियाणे खरेदी करू नये,कृषि विभागाकडून भरारी पथकाची नेमणूक

नंदुरबार l प्रतिनिधी

नंदुरबार जिल्ह्यातील खरीप हंगामात मोठया प्रमाणावर कापूस पिकाची लागवड करण्यात येते. बीटी कापसाच्या परवानगी नसलेले व तणनाशकाला सहनशिल असणारे बोगस बियाणे अनेक अनधिकृत कंपन्यामार्फत उत्पादित करून शेतकऱ्यांना अवैधरित्या छुप्या पद्धतीने विक्री केले जाते. मात्र या बियाण्यामुळे निसर्गाला व जमिनीला हानी पोहचते. त्यामुळे शेतकरी बांधवांनी अशा प्रकारच्या बियाण्याचा वापर करू नये. असे आवाहन जिल्हा अधिक्षक कृषि अधिकारी. राकेश वाणी यांनी केले आहे.

 

एटीबीटी या अवैध कापूस बियाण्यापासून पर्यावरणास असलेला धोका, जमिनीची सुपिकता व मानवी शरीरावर होणारे परिणााम लक्षात घेता येत्या खरीप हंगामात शेतकरी बांधवांनी या वाणाची लागवड करू नये. तसेच अशा प्रकारचे कापूस बियाणे विक्री करत असतांना आढळून आल्यास संबंधितावर बियाणे कायदा 1966, महाराष्ट्र कापूस बियाणे नियंत्रण कायदा 2009, बियाणे नियंत्रण आदेश 1983, पर्यावरण संरक्षण अधिनियम 1986, अन्वये गुन्हा दाखल करण्यात येईल. अशा प्रकारचे अनधिकृत कापूस बियाणे विक्री होत असल्याचे निर्देशनास आल्यास कृषि विभागाच्या जिल्हा नियंत्रण कक्षास किंवा तालुका नियंत्रण कक्षास कळवावे.

 

जिल्ह्यामध्ये शेतकऱ्यांना बियाणे, रासायनिक खते, किटकनाशके गुणवत्तापूर्ण व रास्त भावात उपलब्ध होण्यासाठी तसेच समस्या निराकरणासाठी जिल्हास्तरावर एक व तालुकास्त्तरावर 6 असे एकूण 7 भरारी पथकांची व 7 नियंत्रण कक्षाची स्थापना करण्यात आली आहे. तसेच भरारी पथकाने वेळोवेळी कृषि निविष्ठा विक्री केंद्राना भेटी देवून तपासणी करून ज्यादा दराने विक्री करणाऱ्या विक्रेत्यावर वेळीच योग्य ती कारवाई करावी नेमलेल्या भरारी पथकाने रासायनिक खते व किटकनाशके बाबत उगमप्रमाणपत्र तपासणी, मुदतबाह्य निविष्ठाची रोखणे तसेच पॉस मशीनवरील खताचा ताळमेळ व त्रुटी आढळल्यास अनधिकृत बियाणे साठयाचा शोध घेवून जप्तीची कार्यवाही करावी असे श्री. वाणी यांनी शासकीय प्रसिद्धी पत्रकाद्वारे कळविले आहे.

 

 

*एच.टी.बी.टी बियाण्यामुळे होणारे नुकसान*
 अत्यंत कमी उगवण क्षमता.
 कमी उत्पादन.
 बियाणे बोगस निघाल्यास खरेदी पावत्या नसल्यामुळे नुकसानीची हमी नाही.
 तणनाशक अतिवापरामुळे उत्पादन खर्चात वाढ.
 जमिनीची सुपिकता कमी होते.
 अत्यंत महत्वाचा मानवी शरीरावर कर्करोग सारख्या आजारास आमंत्रण देते
*बोगस बियाणे कसे ओळखाल*
 शासनाचा परवाना व बियाणे प्रमाणीत नसणे.
 बियाण्याच्या पाकिटावर कोणत्याही प्रकारचे तंत्रज्ञान व कोणत्या क्षेत्रासाठी वापर करावा याचा उल्लेख नसतो.

 

 पाकिटावर मालाच्या गुणवत्तेचे विवरण नसते.
*बियाणे खते, किटकनाशके खरेदी करतांना शेतकऱ्यांनी घ्यावयाची काळजी*
 बियाणे अधिकृत परवानाधारक यांच्याकडून खरेदी करावे, न चुकता पक्के बिल घ्यावे.
 बिलात पिक, वाण, लॅाट क्रमांक, वजन, अंतिम मुदत कंपनीचे नमुद करावे
 खरेदी केलेल्या बियाणाचे वेष्टन/ पिशवी, टॅग, खरेदीची पावती व त्यातील थेडे बियाणे पिकाची कापणी होईपर्यंत जपून ठेवावे
 भेसळीची शंका दुर करण्यासाठी बियाणेची पाकिट सिलबंद/ मोहारबंद असल्याची खात्री करावी.
 बियाण्याच्या व किटकनाशकांची अंतिम मुदत तपासुन घ्यावी
 छापील किमतीपेक्षा जास्त किमतीने विक्री अथवा इतर तक्रारीसाठी जवळच्या कृषि विभागाच्या कर्मचाऱ्यांशी संपर्क साधावा

बातमी शेअर करा
Previous Post

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा नंदुरबार दौरा निश्चित; 10 मे रोजी डॉ. हिना गावित यांच्या प्रचारासाठी होणार भव्य जाहीर सभा

Next Post

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची प्रचार सभा मैदानाची डॉ. विजयकुमार गावित यांनी केली पाहणी

Next Post
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची प्रचार सभा मैदानाची डॉ. विजयकुमार गावित यांनी केली पाहणी

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची प्रचार सभा मैदानाची डॉ. विजयकुमार गावित यांनी केली पाहणी

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणूक 2025, मतदार यादीचा कार्यक्रम जाहीर : डॉ. मित्ताली सेठी

नायलॉन मांजा: वापरासाठी 50 हजार, तर विक्रीसाठी अडीच लाखांचा दंड प्रस्तावित

December 31, 2025
जुगार अड्ड्यावर धाड, 14 लाखाचा मुद्देमाल जप्त, दोन राज्यातील 40 जणांविरुद्ध गुन्हा दाखल

जुगार अड्ड्यावर धाड, 14 लाखाचा मुद्देमाल जप्त, दोन राज्यातील 40 जणांविरुद्ध गुन्हा दाखल

December 31, 2025
नंदुरबारात शिवसेना शिंदे गटाचा महाविजयी सभेत ‘लाव रे तो व्हिडिओ

नंदुरबारात शिवसेना शिंदे गटाचा महाविजयी सभेत ‘लाव रे तो व्हिडिओ

December 29, 2025
द फ्युचर स्टेप स्कूलमध्ये संस्कार, कला व गुणवत्तेचा उत्सव, सांस्कृतिक महोत्सव व पारितोषिक वितरण समारंभ उत्साहात

द फ्युचर स्टेप स्कूलमध्ये संस्कार, कला व गुणवत्तेचा उत्सव, सांस्कृतिक महोत्सव व पारितोषिक वितरण समारंभ उत्साहात

December 29, 2025
बांगलादेशावर निर्बंध घालण्यासह तेथील कट्टरतावादी गटांवर कारवाईची हिंदू संघटनांनी मागणी

बांगलादेशावर निर्बंध घालण्यासह तेथील कट्टरतावादी गटांवर कारवाईची हिंदू संघटनांनी मागणी

December 27, 2025
शहरातील नागरिकांच्या आरोग्याशी तडजोड खपवून घेतली जाणार नाही,लोकनियुक्त नगराध्यक्ष अभिजीत पाटील यांच्या इशारा

शहरातील नागरिकांच्या आरोग्याशी तडजोड खपवून घेतली जाणार नाही,लोकनियुक्त नगराध्यक्ष अभिजीत पाटील यांच्या इशारा

December 27, 2025

Total Views

  • 4,142,612 hits

मुख्य संपादक

श्री.महेश शांताराम पाटील
9404747458

At.post.Umarde Khurde ta.dist Nandurbar
मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458

  • Home
  • Sample Page

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

कॉपी करू नका.
WhatsApp Group