Public Mirror News
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
Public Mirror News
No Result
View All Result

जिल्ह्यातील पहिला उपक्रम: श्रीमती क.पू .पाटील माध्यमिक विद्यालयात लर्निंग मॅनेजमेंट सिस्टमचे उद्घघाटन

Mahesh Patil by Mahesh Patil
April 27, 2024
in राज्य, शैक्षणिक
0
जिल्ह्यातील पहिला उपक्रम: श्रीमती क.पू .पाटील माध्यमिक विद्यालयात लर्निंग मॅनेजमेंट सिस्टमचे उद्घघाटन

नंदुरबार l प्रतिनिधी

ग्रामिण भागात शिक्षणाच्या गूणवत्तेबाबत अनेकदा प्रश्नचिन्ह उभे केले जाते व ते काही अंशी खरे पण आहे. बहुसंख्य पालक हे गरीब असल्याने कूटूंबाची काळजी घेण्यासाठी विद्यार्थी हे गैरहजर असतात व त्यामूळे ते शैक्षणीक प्रवाहापासून काहीसे दूर होतात व विद्यार्थ्यांची शैक्षणीक प्रगतीला काहीसा आळा बसतो. जे विद्यार्थी नियमीत शाळेत येतात त्यांनाही ३५ मिनीटाच्या तासात शिकवलेला सर्वच पाठ्यक्रम पूर्णता समजतो असेही नाही अश्या व अनेक समस्या असतात.

https://publicmirrornews.com/wp-content/uploads/2024/04/VID-20240426-WA0028.mp4
https://publicmirrornews.com/wp-content/uploads/2024/04/VID-20240427-WA0007.mp4

वर्गातील सर्व पाठ रेकॅार्ड करून व लर्नींग मॅनेजमेंट सिस्टीम द्वारे मोबाईल ॲपवर विद्यार्थ्याला उपलब्ध करून दिल्यास ही समस्या बऱ्याच प्रमाणात सोडवण्यास मदत होईल. या प्रणाली द्वारे विद्यार्थी शाळेतील सर्व पाठ पून्हा पून्हा बघू शकेल व जो भाग समजला नाही तो समजवून घेवू शकेल यामूळे त्याच्या प्रगतीचा आलेख उंचावण्यास मदत होईल. या प्रणालीमूळे खाजगी शिकवणी लावण्याची गरज नाही त्यामूळे पालकांच्या खिश्याला कात्री बसनार नाही . अश्या प्रकारची लर्नींग मॅनेजमेंट सिस्टीम अमेरीका , ब्रिटनसारख्या अनेक प्रगत देशात सूरू आहे व त्याचे फायदेही आता सर्वांना दिसत आहेत.

 

का. वि. प्र. संस्था संचलित श्रीमती क. पू .पाटील माध्यमिक विद्यालय भालेर येथे संस्थापक अध्यक्ष भास्कर हिरामण पाटील कार्याध्यक्ष विजय भास्कर पाटील यांच्या संकल्पनेतील लर्निंग मॅनेजमेंट सिस्टमचे उद्घघाटन करण्यात आले. संस्थेचे कार्याध्यक्ष विजय बोरसे यांनी भविष्यवेधी शिक्षण व नवीन तंत्रज्ञानाचे महत्त्व व फायदे आपल्या मनोगतून व्यक्त केले. या उपक्रमा अंतर्गत आजपासून लर्निंग मॅनेजमेंट सिस्टम (Learning Management System) तयार करण्याचे काम सूरू झाले. यामूळे विद्यार्थ्याला शाळेतून घरी गेल्यावर शिकवलेले तास परत बघता येतील व न समजलेला भाग परत समजण्यास मदत होईल. हा उपक्रम ऊस तोडीसाठी किंवा काही कारणास्तव बाहेरगावी गेलेल्या विद्यार्थ्यांसाठी एक वरदान ठरेल व त्यांचा शैक्षणीक विकास जलद गतीने होण्यास मदत होईल . यासाठी सर्व टेक्निकल सहयोग एकसिलांस एक्सीलान्सीया डिजिटल टेक्नॉलॉजी (Excellencea Digital Technology पूरवेल. ग्रामीण भागात अशी सिस्टीम प्रथमच लागू होतेय.

 

प्राचार्या सौ विद्या चव्हाण यांनी या अध्यापन पद्धतीचे फायदे आपल्या मनोगतातून व्यक्त केले तसेच लर्निंग मॅनेजमेंट सेटिंग च्या रूमचे उद्घाटन विद्यालयाचे इयत्ता दहावीचे विद्यार्थी विवेक राहुल पाटील, अनुराज ईश्वर खोंडे यांच्या हस्ते करण्यात आले याप्रसंगी प्रत्यक्ष व्हिडिओ लेक्चरचे डेमो सादरीकरण शिक्षक ए .व्हीं. कुवर, ए . एस. पटेल, व्हि व्ही ईशी यांनी केले. विजयजी भास्कर बोरसे संस्थेचे उपाध्यक्ष चंद्रशेखर पाटील, सचिव भिका पाटील, बी के. पाटील, देविदास पाटील, सुनील पाटील, शाना भाऊ धनगर ,महादुपुरी गोसावी, डॉ. विजय बोरसे ,डॉ दिलीप धनगर ,रमेश पाटील, वासुदेव पाटील, प्रताप पाटील, शंभू पाटील आदी कार्यक्रमास उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व्ही.व्हि.ईशी यांनी केले . कार्यक्रमास प्राचार्य विद्या चव्हाण, प्राध्यापक ,प्राध्यापिका शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी वृंद मोठ्या संख्येने उपस्थित होते .

कार्यक्रमात हजर असलेल्या पालकांनी याबाबत शाळेचे अभिनंदन केले व विद्यार्थ्यांच्या प्रगती साठी काकेश्वर विद्याप्रसारक संस्था घेत असलेल्या प्रयत्नाबद्दल आंनद व्यक्त केला.

लर्निंग मॅनेजमेंट सिस्टम मुळे विद्यार्थी शाळेत गैरहजर राहिला किंवा शाळेत त्याला शिकवलेला पाठ समजला नाही तरी तो शिकवलेला पाठ त्याला मोबाईलवर पाहून त्या पाठाची पुनरावृत्ती करणे शक्य होईल त्यामुळे विद्यार्थ्यांच्या गुणवत्तेत वाढ होईल सध्या दहावीच्या वर्गापासून सुरुवात केली आहे. ही सिस्टम कन्या विद्यालयातील सर्व वर्गात राबविण्याचा मानस आहे.

सौ विद्या चव्हाण.प्राचार्य,श्रीमती क.पू. पाटील माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय, भालेर .

बातमी शेअर करा
Previous Post

यशवंत विद्यालयाची राजश्री करणार जागतिक स्पर्धेत भारताचे प्रतिनिधित्व मा.आ.रघुवंशींतर्फे सत्कार; नं.ता.वि.स.तर्फे २५ हजाराची मदत

Next Post

मराठे कालीन तोफेला प्राप्त झाले गतवैभव, हिंदु सेवा सहाय्य समितीचा लढ्याला यश

Next Post
मराठे कालीन तोफेला प्राप्त झाले गतवैभव, हिंदु सेवा सहाय्य समितीचा लढ्याला यश

मराठे कालीन तोफेला प्राप्त झाले गतवैभव, हिंदु सेवा सहाय्य समितीचा लढ्याला यश

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

दीपकभाई पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त खान्देश स्तरीय पुरुषोत्तम चषक उत्साहात

दीपकभाई पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त खान्देश स्तरीय पुरुषोत्तम चषक उत्साहात

October 15, 2025
महाराष्ट्र बांबू उद्योग धोरण २०२५ जाहीर,५० हजार कोटींची गुंतवणूक, पाच लाखांवर रोजगार निर्मिती

महाराष्ट्र बांबू उद्योग धोरण २०२५ जाहीर,५० हजार कोटींची गुंतवणूक, पाच लाखांवर रोजगार निर्मिती

October 15, 2025
जंगल नसलेल्या, ५० टक्क्यांपेक्षा जास्त आदिवासी लोकसंख्येच्या गावांचाही ‘पेसा’मध्ये समावेश करावा : उपमुख्यमंत्री अजित पवार

जंगल नसलेल्या, ५० टक्क्यांपेक्षा जास्त आदिवासी लोकसंख्येच्या गावांचाही ‘पेसा’मध्ये समावेश करावा : उपमुख्यमंत्री अजित पवार

October 15, 2025
राजकारण करतांना भाऊबंदकी कायम ठेवा; आ. चंद्रकांत रघुवंशींच्या शिवसैनिकांना सल्ला

राजकारण करतांना भाऊबंदकी कायम ठेवा; आ. चंद्रकांत रघुवंशींच्या शिवसैनिकांना सल्ला

October 13, 2025
जिल्ह्यात 5 बोगस डॉक्टरांविरुद्ध गुन्हा दाखल, नऊ जणांना दिल्या नोटीस

जिल्ह्यात 5 बोगस डॉक्टरांविरुद्ध गुन्हा दाखल, नऊ जणांना दिल्या नोटीस

October 13, 2025
पूज्य साने गुरुजी विद्या प्रसारक मंडळाचे अध्यक्ष  दीपकबापू पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त आज विविध कार्यक्रम

पूज्य साने गुरुजी विद्या प्रसारक मंडळाचे अध्यक्ष दीपकबापू पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त आज विविध कार्यक्रम

October 13, 2025

Total Views

  • 4,142,612 hits

मुख्य संपादक

श्री.महेश शांताराम पाटील
9404747458

At.post.Umarde Khurde ta.dist Nandurbar
मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458

  • Home
  • Sample Page

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

कॉपी करू नका.
WhatsApp Group